Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 26 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Like snow in summer and like rain at harvest, honor is not fitting for a fool. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात बर्फ पडणे किंवा कापणीच्या वेळी पाऊस येणे जसे विसंगत आहे, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान मिळणे शोभत नाही.
2 Like a fluttering sparrow or a darting swallow, an undeserved curse does not come to rest. जशी फडफडणारी चिमणी निसटून जाते किंवा निळवी उडून जाते, तसाच गैरवाजवीपणे दिलेल्या शापाचा प्रभाव होत नाही.
3 A whip for the horse, a bridle for the donkey, and a rod for the backs of fools. घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला छडी पाहिजे!
4 Do not answer a fool according to his foolishness, or you yourself will be like him. मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील.
5 Answer a fool according to his foolishness, or he will be wise in his own eyes. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल.
6 Whoever sends a message through a fool cuts off his own feet and drinks down violence. मूर्खाच्या हाती निरोप पाठविणे म्हणजे आपलेच पाय तोडून घेणे किंवा विष पिण्यासारखे आहे.
7 Like the legs of a lame man hanging useless is a proverb in the mouth of fools. मूर्खाच्या मुखात नीतिवचने असणे, एखाद्या लंगड्या माणसाच्या निरुपयोगी पायांसारखे आहे.
8 Like binding a stone in a sling is giving honor to a fool. मूर्खाचा सन्मान करणे म्हणजे गोफणीमध्ये दगड बांधून ठेवण्यासारखे आहे.
9 Like a thornbush in the hand of a drunkard is a proverb in the mouth of fools. जसे दारुड्याच्या हातात काटेरी झाडाची फांदी, तसेच मूर्खाच्या मुखात नीतिवचने.
10 Like an archer who wounds everyone is one who hires a fool or hires any passerby. जो मूर्खाला किंवा जवळून जाणार्‍या कोणा अनोळखीलाही कामावर ठेवतो. तो नेम न धरता कोणालाही जखम करणार्‍या धनुर्धारीसारखा आहे.
11 As a dog returns to its vomit, so a fool repeats his foolishness. जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.
12 Do you see someone wise in his own eyes? There is more hope for a fool than for him. आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
13 The lazy person says, "There is a lion in the road! A lion in the streets!" आळशी म्हणतो “बाहेर रस्त्यावर सिंह आहे, एक भयानक सिंह मार्गात फिरत आहे!”
14 As a door turns on its hinges, so the lazy person turns on his bed. दार त्याच्या बिजागर्‍यांवर फिरते तसा आळशी बिछान्यावर कूस बदलत असतो.
15 The lazy person buries his hand in the dish; it wearies him to bring it back to his mouth. आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो; तो हात पुन्हा तोंडापर्यंत नेण्यासाठीही त्याला आळस वाटतो.
16 The lazy person is wiser in his own eyes than seven who answer wisely. स्वदृष्टीत शहाणा असणार्‍या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.
17 Like grabbing a dog by the ears is a passerby who meddles in a quarrel not his own. आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्‍यासारखे असतात.
18 Like a madman shooting firebrands, arrows, and death, जसा एखादा माथेफिरू मृत्यूचे जळते बाण फेकतो,
19 so is the one who deceives his neighbor and says, "I was only joking!" तो अशा मनुष्यासारखा आहे, जो त्याच्या शेजार्‍यांना फसवितो आणि म्हणतो, “मी तर गंमत करीत होतो!”
20 Without wood a fire goes out, and without a gossip a quarrel dies down. लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.
21 As charcoal to embers and wood to fire, so a quarrelsome person kindles strife. जसे कोळसे निखारे आणि लाकूड अग्नी प्रज्वलित करते, तशाच प्रकारे भांडखोर मनुष्य कलह उत्पन्न करतो.
22 The words of a gossip are like choice morsels; they sink down into the inmost parts. अफवा स्वादिष्ट भोजनासारख्या चवदार असतात; अंतःकरणात त्या खोलवर रुजून जातात.
23 Like a glaze covering an earthen pot are smooth lips with an evil heart. गोड शब्द उच्चारणाऱ्या दुष्टाचे अंतःकरण चांदीचा मुलामा दिलेल्या मातीच्या पात्रासारखे आहे.
24 An enemy disguises himself with his lips, but in his heart he harbors deceit. शत्रू त्यांच्या वाणीद्वारे स्वतःला लपवितात, परंतु कपटाला ते त्यांच्या मनात थारा देतात.
25 When he speaks graciously, do not believe him, for seven abominations fill his heart. जरी त्यांचे भाषण प्रसन्न करणारे आहे, तरी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण सात प्रकारच्या वाईट गोष्टींनी त्यांचे अंतःकरण भरलेले असते.
26 Though his hatred is hidden by deceit, his wickedness will be exposed in the assembly. त्यांचा द्वेषभाव लबाडीद्वारे लपविलेला असला तरी, त्यांचा दुष्टपणा सभेमध्ये उघड केला जाईल.
27 Whoever digs a pit will fall into it, and a stone rolls back on the one who rolls it. जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.
28 A lying tongue hates those it crushes, and a flattering mouth works ruin. लबाड बोलणारी जीभ ज्याचा द्वेष करते त्याला दुखविते, आणि खुशामत करणारी जीभ नाशास कारणीभूत होते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]