Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 27 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Do not boast about tomorrow, for you do not know what a day may bring. उद्याविषयी आज बढाई मारू नका; कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही.
2 Let someone else praise you, and not your own mouth; a stranger, and not your own lips. दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको; बाहेरील व्यक्तीला ती करू द्या, पण तुम्ही स्वतःच्या ओठांनी करू नये.
3 A stone is heavy and the sand a burden, but a fool's provocation is heavier than both. दगड जड आहे आणि वाळू वजनदार असते, परंतु मूर्खाने दिलेली चिथावणी या दोन्हींपेक्षाही जड असते.
4 Wrath is cruel and anger is overwhelming, but who can stand before jealousy? क्रोध क्रूर असतो आणि राग पूरासमान असतो; पण मत्सरापुढे कोण उभा राहू शकेल?
5 Open rebuke is better than love that stays hidden. उघडपणे कान उघाडणी करणे, गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे.
6 A friend's wounds are faithful, but an enemy's kisses are deceitful. मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात, परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.
7 A well-fed person tramples honeycomb, but to the hungry even what is bitter tastes sweet. एखाद्याला भरल्यापोटी मधसुद्धा बेचव लागतो, परंतु भुकेल्या मनुष्याला कडू अन्नसुद्धा गोड लागते.
8 A man who strays from his home is like a bird that strays from its nest. घर सोडून भटकणारा मनुष्य घरटे सोडून भटकणार्‍या पक्ष्यासारखा आहे.
9 Oil and incense gladden the heart, and the sweetness of a friend comes from heartfelt counsel. अत्तर आणि सुगंध मनाला आनंद देतात, आणि अंतःकरणापासून दिलेल्या सल्ल्यातून मित्राचा आनंद उसळून येतो.
10 Do not forsake your friend or your father's friend, and do not go to your brother's house when disaster strikes; better a neighbor nearby than a brother far off. तुमचा मित्र किंवा तुमच्या कुटुंबाच्या मित्राला कधीही सोडू नका, आणि संकटसमयी नातेवाईकांच्या घरी जावू नका— दूर राहणाऱ्या नातेवाईकांपेक्षा जवळचा शेजारी बरा.
11 Be wise, my son, and make my heart glad, so that I can answer anyone who taunts me. माझ्या मुला, शहाणा हो आणि माझे हृदय आनंदित कर; म्हणजे जे मला तिरस्काराने वागवितात, मी त्यांना उत्तर देऊ शकेन.
12 The prudent sees danger and takes cover, but the simple keep going and pay the price. सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
13 Take the garment of one who puts up security for a stranger; hold it as collateral when he does so for a foreign woman. जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे; जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.
14 Whoever blesses his neighbor with a loud voice early in the morning, it will be taken as a curse. जर कोणी आपल्या शेजाऱ्याला भल्या पहाटे ओरडून अभिवादन केले, तर ते त्याला शापासारखे वाटेल.
15 A quarrelsome wife is like a constant dripping on a rainy day. भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.
16 Restraining her is like restraining the wind, or grasping oil with the right hand. तिला ताब्यात ठेवणे म्हणजे वार्‍याला ताब्यात ठेवण्यासारखे, किंवा हाताने तेल धरण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
17 Iron sharpens iron, and one person sharpens another. जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्‍याला सुधारतो.
18 Whoever tends a fig tree will eat its fruit, and whoever guards his master will be honored. जो अंजिराच्या झाडाची राखण करतो, तो त्या झाडाचे फळ खाईल. आणि जे त्यांच्या मालकाचे संरक्षण करतात त्यांचा सन्मान होईल.
19 As water reflects the face, so the heart reflects the person. पाणी जसे चेहर्‍याचे प्रतिबिंब दर्शविते, तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते,
20 The grave and Destruction are never satisfied, and a person's eyes are never satisfied. मृत्यू आणि विध्वंस यांचे कधीही समाधान होत नाही, तसेच मनुष्याच्या नेत्रांचेही नव्हे.
21 The crucible is for silver and the furnace for gold, and a person is tested by the praise he receives. चांदी मुशीत आणि सोने भट्टीत पारखले जाते, तशी लोकांची पारख, त्यांच्या प्रशंसेद्वारे होते.
22 Though you grind a fool in a mortar with a pestle, along with the grain, his foolishness will not leave him. मूर्खाचा तुम्ही कुटणीमध्ये भुगा केला, मुसळात त्याला धान्यासारखे भरडले, तरी त्याची मूर्खता तुम्हाला वेगळी करता येणार नाही.
23 Know well the condition of your flocks, and give careful attention to your herds. आपल्या कळपाच्या स्थितीची योग्य जाणीव ठेवा, तुमच्या पशूंकडे काळजीपूर्वक लक्ष द्या;
24 For riches do not last forever, nor does a crown endure to every generation. कारण संपत्ती सर्वकाळ टिकत नाही, आणि मुकुट पिढ्यान् पिढ्या सुरक्षित नसतो.
25 When the grass is gone and the new growth appears and the mountain herbs are gathered, वाळलेले गवत काढून टाकले तेव्हा नवीन वाढ दिसून येते आणि टेकड्यांवरील गवत एकत्रित केले जाते,
26 the lambs will provide your clothing, and the goats will provide the price of a field; तेव्हा मेंढ्या तुम्हाला कपडे पुरवतील, आणि शेतातील पैशाने शेळ्या मिळतील.
27 and there will be enough goats' milk for your food, for the food of your household and to sustain your servant girls. तुझ्या कुटुंबाला खाण्यासाठी आणि तुझ्या दासींचे पोषण करण्यासाठी तुझ्याकडे शेळ्यांचे पुष्कळ दूध असेल.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]