Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 2 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 My son, if you receive my words and store up my commandments within you, माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात साठवून ठेवशील,
2 making your ear attentive to wisdom and turning your heart toward understanding; सुज्ञानाच्या वाणीकडे लक्ष देशील, तुझे मन समंजसपणाकडे लावशील—
3 yes, if you call out for insight and raise your voice for understanding, मग निश्चितच, अंतर्ज्ञानाचा धावा करशील, आणि शहाणपण आत्मसात करण्यासाठी आक्रोश करशील,
4 if you seek it like silver and search for it as for hidden treasure, आणि जसा चांदीचा शोध घेतात तसा तू त्याचा शोध घेशील आणि गुप्त खजिना शोधतात तसा त्याचा शोध घेशील,
5 then you will understand the fear of our Father and find the knowledge of our Father. तेव्हा याहवेहचे भय काय आहे हे तुला समजेल आणि परमेश्वराविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.
6 For our Father gives wisdom; from his mouth come knowledge and understanding. कारण याहवेह सुज्ञान देतात; त्यांच्या मुखातून ज्ञान आणि शहाणपण येते.
7 He stores up sound wisdom for the upright; he is a shield to those who walk in integrity, नीतिमानांसाठी ते यश साठवून ठेवतात, जे निर्दोषपणाने वागतात त्यांच्यासाठी ते ढाल आहेत.
8 guarding the paths of justice and watching over the way of his faithful ones. कारण ते न्यायींच्या मार्गाचे रक्षण करतात आणि त्यांच्या भक्तांचे मार्ग सुरक्षित ठेवतात.
9 Then you will understand righteousness and justice and fairness—every good path. तेव्हा कोणते योग्य व कायदेशीर, आणि निष्पक्ष आहे—प्रत्येक सन्मार्ग तुला समजेल.
10 For wisdom will enter your heart, and knowledge will be pleasant to your soul; सुज्ञान तुझ्या अंतःकरणात प्रवेश करेल, आणि ज्ञान तुझ्या जीवाला सुखदायक वाटेल,
11 discretion will watch over you, and understanding will guard you, तेव्हा विवेक तुझे रक्षण करेल, आणि सुज्ञता तुझे राखण करेल.
12 rescuing you from the way of evil, from men who speak twisted things, सुज्ञान तुला दुष्ट माणसांच्या मार्गापासून आणि शब्द विकृत करणार्‍या माणसांपासून दूर ठेवील.
13 who abandon the paths of uprightness to walk in the ways of darkness, ज्यांनी अंधाराच्या मार्गाने जाण्यासाठी सरळपणाच्या वाटा सोडून दिल्या आहेत,
14 who delight in doing evil and rejoice in the perversity of evil, ज्यांना दुष्कर्म करण्यात आनंद वाटतो आणि दुष्टांच्या कुटिलपणात जे उल्हासतात,
15 whose paths are crooked, and who are devious in their ways. ज्यांचे मार्ग विकृत आहेत आणि ज्यांच्या वाटा विपरीत आहेत!
16 Wisdom will rescue you also from the forbidden woman, from the stranger with her smooth words, सुज्ञान तुला व्यभिचारी स्त्रीपासूनसुद्धा वाचवेल, तिच्या लाडिक बोलण्याने तुला मोहात पाडणार्‍या स्त्रीपासून,
17 who forsakes the companion of her youth and forgets the covenant of her Father. जिने आपला तारुण्यातील सहचारी सोडला आहे, आणि परमेश्वरासमोर केलेल्या कराराकडे दुर्लक्ष केले आहे.
18 For her house sinks down to death, and her paths to the dead. निश्चितच तिच्या घराची वाट मृत्यूकडे नेते आणि तिचे मार्ग मृतांच्या आत्म्यांकडे घेऊन जातात.
19 None who go to her return, nor do they reach the paths of life. तिच्याकडे जाणारा परत येत नाही किंवा जीवनाच्या मार्गावर येत नाही.
20 So you will walk in the way of the good and keep to the paths of the righteous. यासाठी तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालशील, आणि नीतिमानांच्या मार्गांचे अवलंबन करशील.
21 For the upright will live in the land, and those of integrity will remain in it; कारण सरळ मनाचे लोकच देशात वस्ती करतील, आणि निर्दोष लोक त्यात टिकून राहतील;
22 but the wicked will be cut off from the land, and the treacherous will be torn away from it. परंतु दुष्ट लोकांचा देशातून समूळ नायनाट होईल आणि तेथील अविश्वासू लोकांचे उच्चाटन केले जाईल.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]