Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Proverbs 1 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The proverbs of Solomon, son of David, king of Israel: इस्राएलचा राजा दावीदाचा पुत्र शलोमोनाची नीतिसूत्रे:
2 To know wisdom and instruction, to understand words of insight, सुज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी; अंतर्ज्ञानाचे शब्द समजून घेण्यासाठी;
3 to receive instruction in wise conduct, in righteousness, justice, and fairness, समंजसपणाने शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी, जे योग्य आहे आणि न्याय्य आणि वाजवी आहे ते करण्यासाठी;
4 to give prudence to the simple, knowledge and discretion to the young, जे साधे भोळे आहेत त्यांना समंजसपणा देण्यासाठी, तरुणांना ज्ञान आणि विवेकबुद्धी देण्यासाठी—
5 let the wise also hear and increase in learning, and let the one who understands gain guidance, शहाण्यांनी ऐकावे आणि त्यांचे ज्ञान वाढवावे, आणि विवेकी मनुष्याला मार्गदर्शन मिळावे—
6 to understand a proverb and a parable, the words of the wise and their riddles. ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा, प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील.
7 The fear of our Father is the beginning of knowledge; fools despise wisdom and instruction. याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, परंतु मूर्ख माणसे सुज्ञान आणि शिक्षण तुच्छ लेखतात.
8 Listen, my son, to your father's instruction, and don't turn away from your mother's teaching, माझ्या मुला, तुझ्या वडिलांचे शिक्षण ऐकून घे आणि तुझ्या आईची शिकवण विसरू नकोस.
9 for they are a graceful garland for your head and pendants for your neck. ती तुझ्या मस्तकाला अलंकृत करणारी माळ आहे आणि तुझ्या गळ्यातील सुशोभित हार आहे.
10 My son, if sinners entice you, do not give in. माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस.
11 If they say, "Come with us, let us lie in wait for blood, let us ambush the innocent without cause; जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;
12 like the grave let us swallow them alive, and whole, like those who go down to the pit; चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू;
13 we will find all kinds of precious goods, we will fill our houses with plunder; आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू;
14 throw in your lot with us; we will all share one purse," आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—
15 my son, do not walk in the way with them; hold back your foot from their paths, माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;
16 for their feet run to evil, and they hurry to shed blood. कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात.
17 For a net spread out before any bird's eyes catches nothing; जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे!
18 but these lie in wait for their own blood; they ambush their own lives. ही माणसे स्वतःच्याच रक्तपातासाठी टपून बसतात; ते केवळ स्वतःवरच हल्ला करतात!
19 Such are the ways of everyone greedy for unjust gain; it takes away the life of its possessors. गैरमार्गाने प्राप्त केलेल्या मिळकतीचा जे लोभ धरतात, त्या सर्वांचे हे मार्ग आहेत; असे मिळविलेले धन, ते ज्यांच्या मालकीचे आहे त्यांचाच प्राण घेते.
20 Wisdom cries aloud in the street; in the open squares she lifts her voice. बाहेर उघडपणे सुज्ञान मोठ्याने आव्हान करते. भर चौकात ती तिचा आवाज उंचावते;
21 At the head of the noisy streets she calls out; at the entrance of the city gates she speaks: भिंतीच्या उंचीवरून ती ओरडते शहराच्या वेशीजवळ ती भाषण करते:
22 "How long, simple ones, will you love being simple? How long will mockers delight in their mocking and fools hate knowledge? “अहो भोळ्यांनो, तुमच्या भोळेपणावर तुम्ही किती दिवस प्रीती करणार? कुचेष्टा करणारे तुम्ही कुचेष्टा करण्यात किती वेळ आनंद करणार आणि मूर्खांनो, किती काळ तुम्ही ज्ञानाचा द्वेष करणार?
23 If you respond to my correction, I, Wisdom, will pour out my spirit on you; I will make my words known to you. मी केलेली कान उघाडणी लक्षात घेऊन आणि पश्चात्ताप करा! तेव्हा मी माझे विचार तुम्हाला कळवेन, तुम्हाला माझ्या शिक्षणाची माहिती करून देईन.
24 Because I have called and you refused, I stretched out my hand and no one paid attention, परंतु जेव्हा मी बोलाविले तेव्हा तुम्ही ऐकण्याचे नाकारले, आणि जेव्हा मी माझे हात पुढे केले, तेव्हा कोणीही लक्ष दिले नाही.
25 and you ignored all my counsel and rejected all my correction, कारण तुम्ही माझा सल्ला जुमानला नाही. आणि माझे धमकाविणे स्वीकारले नाहीत,
26 I also will laugh at your calamity; I will mock when terror overtakes you, यामुळेच मी देखील तुमच्या संकटकाळी तुम्हाला हसेन; जेव्हा तुमच्यावर आपत्ती येईल तेव्हा मी चेष्टा करेन—
27 when terror overtakes you like a storm and your calamity comes like a whirlwind, when distress and anguish come upon you. जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील.
28 Then they will call on me, but I will not answer; they will seek me earnestly but will not find me, “तेव्हा तुम्ही मला हाक माराल, परंतु मी उत्तर देणार नाही; ते माझा शोध करतील, परंतु मी सापडणार नाही,
29 because they hated knowledge and did not choose the fear of our Father, कारण त्यांनी ज्ञानाचा तिरस्कार केला, आणि याहवेहचे भय धरणे निवडले नाही.
30 they rejected my counsel and despised all my correction. ते माझा सल्ला स्वीकारणार नाहीत; आणि माझ्या दटावणीला झिडकारतील म्हणून,
31 So they will eat the fruit of their own way and have their fill of their own schemes. त्यांना त्यांच्या मार्गाचे प्रतिफळ मिळेल, आणि त्यांच्या वाईट कृत्यांचे पुरेपूर परिणाम मिळतील.
32 For the waywardness of the simple will kill them, and the complacency of fools will destroy them; कारण भोळ्यांचा हट्टीपणा त्यांना मारून टाकेल, आणि मूर्खांचा स्वच्छंदीपणा त्यांचा नाश करेल;
33 but whoever listens to me will dwell secure and be at ease, without dread of disaster." परंतु जे माझे ऐकतात ते सर्वजण सुरक्षित राहतील, आणि निर्भयतेने स्वस्थ जीवन जगतील.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]