Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Micah 3 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

पुढारी आणि संदेष्टे यांना फटकारणे

1तेव्हा मी म्हणालो,याकोबाच्या पुढार्‍यांनो,इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका.तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय,

2तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता;तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता,आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता;

3तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता,त्यांची कातडी सोलताआणि त्यांची हाडे मोडता,आणि पातेल्यात शिजविण्यासाठीमांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता.

4मग ते याहवेहचा धावा करतील,पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही.त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळेयाहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील.

5याहवेह असे म्हणतात:“माझ्या लोकांनाचुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे,त्यांना काही खायला मिळाल्यासते ‘शांती’ ची घोषणा करतात.परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतोत्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.

6म्हणूनच तुझ्यावर रात्र येईल, दृष्टान्त दिसणार नाही,आणि अंधार येईल, तुम्ही दैवप्रश्न पाहिल्याशिवाय!या संदेष्ट्यांसाठी सूर्यास्त होईलआणि दिवस असता त्यांच्यावर अंधार पडेल.

7द्रष्ट्यांना लाज वाटेलआणि दैवप्रश्न करणारे फजीत होतील.ते सर्व आपली मुखे झाकतीलकारण त्यांना परमेश्वराकडून उत्तर आलेले नाही.”

8परंतु माझ्याबाबतीत म्हणाल,तर याकोबाला त्याचे अपराधआणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठीमी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्यानेपरिपूर्ण आहे.

9अहो याकोबाच्या पुढार्‍यांनो,इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, माझे ऐका,तुम्ही न्यायाला तुच्छ लेखताआणि चांगल्या गोष्टी विकृत करता;

10सीयोनला रक्तपातानेआणि यरुशलेमला दुष्टपणाने बांधले आहे.

11तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात,तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात,व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात.तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात,“याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय?आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”

12म्हणून तुमच्यामुळे,सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल,यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल,मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]