Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 61 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

याहवेहच्या कृपेचे वर्ष

1सार्वभौम याहवेहचा आत्मा मजवर आहे,कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठीयाहवेहने माझा अभिषेक केला आहे.भग्नहृदयी लोकांचे सांत्वन करण्यासाठी,कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठीव अंधकारातून बंदिवानांना मुक्त करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

2याहवेहच्या कृपेचे वर्षआणि परमेश्वराचा सूड घेण्याचा दिवस आला आहे, हे जाहीर करण्यास,आणि जे सर्व विलाप करतात त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांनी मला पाठविले आहे.

3सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना—राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट,विलापाऐवजीआनंदाचे तेल,निराशेच्या आत्म्याऐवजीस्तुतीचे वस्त्रबहाल करण्यासाठी.कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठीते नीतिमत्तेचे एला वृक्षयाहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.

4ते प्राचीन भग्नावशेषाची पुनर्बांधणी करतीलफार पूर्वी उद्ध्वस्त झालेल्या शहरांची डागडुजी करतील;ते पुरातन पडीक नगरांचा,जी पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त झाली होती, त्यांचा जीर्णोद्धार करतील.

5अपरिचित लोक तुमचे कळप राखतील;विदेशी तुमची शेते व द्राक्षमळ्यांची निगा राखतील.

6तुम्हाला याहवेहचे याजक म्हणतीलतुम्ही आमच्या परमेश्वराचे सेवक म्हणून संबोधले जाल.राष्ट्रांच्या संपत्तीतून तुमचे पोषण होईल,व तुम्ही त्यांच्या समृद्धीचा अभिमान बाळगाल.

7लज्जेच्या ऐवजीतुम्ही दुपटीने सन्मान मिळवाल,आणि अप्रतिष्ठे ऐवजीतुम्हाला तुमच्या वतनात आनंद प्राप्त होईल.आणि तुम्ही दुपटीने तुमच्या वतनभूमीचे वारसदार व्हाल,आणि तुम्ही अनंतकाळचा आनंद प्राप्त कराल.

8“कारण मी याहवेह, मी न्याय प्रिय आहे;चोरी आणि अन्यायाचा मला तिटकारा आहे.माझ्या विश्वासूपणाने मी माझ्या लोकांना मोबदला देईनआणि त्यांच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन.

9राष्ट्रांमध्ये त्यांच्या वंशजांचा लौकिक होईल,आणि त्यांची संतती लोकांमध्ये बहुमानीत होतील.जे सर्व त्यांना बघून हे कबूल करतील कीते याहवेहचे आशीर्वादित लोक आहेत.”

10मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो;माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो.जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते,किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते,तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेतआणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.

11जशी माती अंकुराला उगवितेआणि बाग बीज वाढवितेतसे सार्वभौम याहवेह नीतिमत्वआणि प्रशंसा सर्व राष्ट्रासमोर अंकुरित करतील.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]