Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Hosea 2 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

1“तुमच्या बंधूंना, ‘माझे लोक’ आणि तुमच्या भगिनींना, ‘माझी प्रिय व्यक्ती.’ असे म्हणा.

इस्राएलास शिक्षा आणि पुनर्स्थापना

2“तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच,कारण ती माझी पत्नी नाही,आणि मी तिचा पती नाही.ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूपआणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो.

3नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन,जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती;तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन,निर्जल भूमीसारखी ठेवेनव तिला तहानेने जिवे मारीन.

4मी तिच्या मुलांच्या प्रती आपली प्रीती दाखविणार नाही,कारण ती मुले व्यभिचाराची आहेत.

5कारण त्यांची आई अविश्वासू आहेआणि तिने लाजिरवाणी गोष्ट करून त्यांचे गर्भधारणा केली आहे.ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकरांच्या मागे जाईन,जे मला माझे अन्न आणि माझे पाणी,माझी लोकर आणि माझे ताग, माझे जैतुनाचे तेल आणि माझे पेय देतात.’

6म्हणून मी तिच्या मार्गात काटेरी झाडांचे कुंपण घालेन;मी तिच्यापुढे अशी आडभिंत उभी करेन की तिला तिच्या वाटा सापडणार नाही.

7ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही.ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत.मग ती म्हणेल,‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन,कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’

8तिने ओळखले नाही की, तो मीच होतोज्याने तिला धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल दिले,ज्याने उदारहस्ते तिला चांदी आणि सोने दिले;जे त्यांनी बआलसाठी वापरले.

9“म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन,आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन.तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी,मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.

10म्हणून मी आता तिची अश्लीलतातिच्या प्रियकरांसमोर उघडी करेन;माझ्या हातून तिला कोणीही वाचवू शकणार नाही.

11मी तिचे सर्व उत्सव:तिचे वार्षिक सण, तिचे नवीन चंद्रदर्शन,तिचे शब्बाथाचे दिवस—नेमून दिलेले तिचे सर्व सण बंद करेन.

12मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन,जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे;मी त्यांचे गर्द झाडी करेनव वनपशू ते खाऊन टाकतील.

13जेव्हा तिने बआलसाठी धूप जाळला,तिला मी त्या दिवसांसाठी शिक्षा करेन;तिने स्वतःला अंगठ्यांनी आणि दागिन्यांनी सजविले,आणि तिच्या प्रियकरांच्या मागे गेली,परंतु मला मात्र ती विसरून गेली,” असे याहवेह घोषित करतात.

14“म्हणून तिला मी भुलविणार;तिला रानात घेऊन जाईनआणि तिच्याबरोबर कोमलतेने बोलेन.

15तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन,आणि अखोरचे खोरे तिला आशेचे द्वार असे देईन.जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसातजसे उत्तर देत होती तसेच उत्तर देईल.

16“त्या दिवशी, तुम्ही मला ‘माझा पती’ असे म्हणाल;यापुढे तुम्ही मला ‘माझे बआल’ असे म्हणणार नाही,याहवेह असे घोषित करतात.

17मी तिच्या मुखातून बआलची नावे काढून टाकीन;यापुढे त्यांची नावे कधीही घेतली जाणार नाही.

18त्या दिवशी मी त्यांच्यासाठीरानातील पशू, आकाशातील पक्षीआणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन.धनुष्य आणि तलवार आणि लढायामी देशातून काढून टाकेन,म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल.

19मी तुला माझ्याबरोबर कायमचे वाग्दत्त असे करेन;मी तुम्हाला नीतिमत्व आणि न्याय,प्रीती आणि करुणा यामध्ये वाग्दत्त करेन.

20विश्वासूपणाने तुला वाग्दत्त करून घेईन,आणि याहवेहची ओळख तुला होईल.

21“त्या दिवशी मी प्रतिसाद देईन;मी आकाशाला प्रतिसाद देईनआणि ते पृथ्वीला प्रतिसाद देतील;”याहवेह अशी घोषणा करतात.

22“आणि पृथ्वी धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतून तेलयांना प्रतिसाद देईल,आणि ते येज्रीलास प्रतिसाद देतील.

23मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन;‘माझी प्रिया नाही’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन.जे ‘माझे लोक नाहीत,’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन;आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]