Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Micah 5 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

बेथलेहेमातून अधिपती देण्याचे अभिवचन

1हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा,कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे.ते काठीने इस्राएलाच्याशासकाच्या गालावर मारतील.

2“परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा,तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस,तरी तुझ्यातून माझ्यासाठीइस्राएलचा शासक उदय पावेल,ज्याची उत्पत्तीप्राचीन काळातील आहे.”

3म्हणून प्रसूती वेदनेत असलेलीएका मुलाला जन्म देईपर्यंतआणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंतइस्राएलचा त्याग केला जाईल.

4तो याहवेहच्या सामर्थ्याने,याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाच्या वैभवात उठेलआणि आपल्या कळपाचा मेंढपाळ होईल आणि ते सुरक्षित राहतील,कारण तेव्हा पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या लोकांनायाहवेहची महानता कळेल.

5ते पुरुष आपली शांती असतीलजेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करतीलआणि आपल्या किल्ल्यांमध्ये प्रवेश करतील,तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध सात मेंढपाळ,आठ देखील सेनापती उभे करू,

6अश्शूर देशावर तलवारीने,निम्रोदाच्या देशावर उपसलेल्या तलवारीने कोण शासन करेल.अश्शूरचे लोक जेव्हा आपल्या देशावर आक्रमण करतीलआणि आपली सीमा ओलांडतीलतेव्हा याहवेह आपल्याला त्यांच्यापासून सोडवतील.

7याकोबाचे उरलेले लोकअनेक लोकांमध्ये असतील,ते याहवेहने पाठविलेल्या दहिवराप्रमाणे,गवतावर पडणाऱ्या पावसाप्रमाणे असतील,जे कोणाचीही वाट पाहत नाहीआणि कोणा मनष्यावर अवलंबून राहत नाही.

8याकोबाचे अवशेष राष्ट्रांमध्येआणि अनेक लोकांमध्ये असणार,जंगली श्वापदांमध्ये सिंहासारखेआणि मेंढरांच्या कळपामध्ये तरुण सिंहासारखे असतील,ते त्यांच्यावर झेप घेतील आणि त्यांना ठार करीत पुढे जातीलआणि कोणीही त्यांना वाचवू शकत नाही.

9तुझ्या शत्रूंवर विजय मिळवून तुझा हात उंच होईलआणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल.

10“त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात,“मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेनआणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन.

11मी तुझ्या देशातील शहरांचा नाश करेनआणि तुझे किल्ले उद्ध्वस्त करेन.

12मी तुमच्यातील चेटके नष्ट करेनआणि यापुढे तुझ्यामध्ये कोणीही शकुन पाहणार नाही.

13मी तुमच्या मूर्तीआणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन;तुमच्या हस्तकृतींनातुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही.

14जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन,तेव्हा तुझे अशेरा स्तंभ उपटून टाकीन.

15ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही,त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.”

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]