Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Lamentations 5 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Remember, our Father, what has happened to us; look and see our disgrace. हे याहवेह, आम्हाला काय झाले आहे यांचे स्मरण करा; आमच्या अपमानाकडे लक्ष द्या.
2 Our inheritance has been turned over to strangers, our homes to foreigners. आमचे वतन अपरिचितांना देण्यात आले आहे, आमची घरे परकियांनी दिली आहेत.
3 We have become orphans, fatherless; our mothers are like widows. आम्ही पितृहीन झालो आहोत, आमच्या माता विधवा झाल्या आहेत.
4 We pay for our own water to drink; even firewood costs us money. पिण्याचे पाणीदेखील आम्हाला विकत घ्यावे लागते; किंमत चुकविल्याशिवाय आम्हाला जळण मिळत नाही.
5 Our pursuers are at our necks; we are worn out and given no rest. पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.
6 We submitted to Egypt and Assyria just to get enough bread. पुरेशी भाकरी मिळण्याकरिता आम्ही इजिप्तला आणि अश्शूरला स्वतःचे समर्पण केले आहे.
7 Our ancestors sinned, and are no more; and we bear their punishment. आमच्या पूर्वजांनी पाप केले व ते आता हयात नाहीत. आणि आम्ही त्यांची शिक्षा भोगत आहोत.
8 Slaves rule over us; there is no one to free us from their grip. गुलाम आता आमचे धनी झाले आहेत, त्यांच्या हातातून आम्हाला सोडविणारा कोणीही नाही.
9 We risk our lives to get our bread, because of the sword in the wilderness. भाकरी मिळविण्यासाठी आम्हाला आमचा जीव धोक्यात घालावा लागतो, कारण निर्जन प्रदेशात तलवारीने वध होऊ शकतो.
10 Our skin is hot as an oven, scorched by the burning heat of famine. आमची त्वचा भट्टीप्रमाणे तप्त झाली आहे, कारण भुकेमुळे आम्ही तापाळलेले आहोत.
11 Women are violated in Zion, virgins in the cities of Judah. स्त्रियांना सीयोनात भ्रष्ट करण्यात आले आहे, व कुमारिकांना यहूदीयातील नगरात.
12 Princes are hung up by their hands; the elders receive no respect. आमच्या अधिपतींना त्यांच्या हातांवर लटकविण्यात आले आहे; आमच्या वडीलजनांचा मान राखला जात नाही.
13 Young men toil at the millstones; boys stagger under loads of wood. तरुण गिरणीवर काबाडकष्ट करतात; तर किशोर लाकडाच्या भारी ओझ्यांखाली डळमळतात.
14 The elders have left the city gate, the young men their music. वडीलजनांनी वेशीतील बैठकी सोडून दिल्या आहेत; तरुणांनी त्यांचे संगीत बंद केले आहे.
15 The joy of our hearts has ceased; our dancing has turned to mourning. आमच्या हृदयातील आनंद निघून गेला आहे; आमच्या नृत्यांचे रूपांतर विलापात झाले आहे.
16 The crown has fallen from our head. Woe to us, for we have sinned! आमच्या मस्तकावरील मुकुट धुळीत पडला आहे. धिक्कार असो आमचा, कारण आम्ही पाप केले आहे!
17 Because of this our heart has grown faint; because of these things our eyes have grown dim. याकारणास्तव आमची अंतःकरणे खचली आहेत, या सर्व गोष्टींमुळे आमचे डोळे निस्तेज झाले आहेत.
18 For Mount Zion lies desolate; jackals prowl over it. सीयोन पर्वत आता ओसाड झाला आहे, तिथे आता लांडगे शिकारीसाठी संचार करतात.
19 You, our Father, are enthroned forever; your throne endures from generation to generation. हे याहवेह, तुमचे शासन सदासर्वकाळचे आहे; तुमचे राजासन पिढ्यान् पिढ्या स्थिर आहे.
20 Why do you forget us forever, forsake us for so many days? मग तुम्ही आम्हाला नेहमी का विसरता? तुम्ही आमचा इतक्या दीर्घकालापर्यंत त्याग का केला?
21 Restore us to yourself, our Father, and we will return; renew our days as they once were, याहवेह, तुम्ही आमचा स्वतःशी पुनः संबंध स्थापित करा, म्हणजे आम्ही तुमच्याकडे परत येऊ; पूर्वीच्या दिवसांसारखे आमच्या दिवसांना नवनिर्मित करा,
22 unless you have utterly rejected us, and are angry with us beyond measure. जर तुम्ही आमच्यावर मर्यादेपलिकडे क्रोधित झाला नसाल आणि आमचा कायमचा त्याग केला नसेल तर.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]