Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Ecclesiastes 4 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Again I looked and saw all the oppression under the sun: the oppressed were in tears, with no one to comfort them; their oppressors held the power, and still no comforter. मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.
2 So I declared the dead, who had already died, happier than the living, who are still alive. यावरून मी घोषित केले, मृत असलेल्या व्यक्ती, जिवंत असलेल्या माणसांपेक्षा अधिक संतुष्ट आहेत.
3 Better than both is the one not yet born, who hasn't seen the evil done under the sun. परंतु त्या दोघांपेक्षाही जो जन्मालाच आला नाही तो अधिक बरा. सूर्याखाली असलेले जे वाईट ते त्यांच्या पाहण्यात आले नाही.
4 I saw all labor and skill come from one neighbor's envy of another. This too is fleeting, a chasing after wind. आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्‍याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्‍यामागे धावल्यासारखे आहे.
5 The fool folds his hands and ruins himself. मूर्ख तर हात बांधून बसतात आणि स्वतःचा नाश करून घेतात.
6 Better one handful with tranquility than two handfuls with toil and a chasing after the wind. अधिक कष्ट करून वार्‍याच्या मागे धावून, दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे.
7 Again I saw something fleeting under the sun: पुन्हा एकदा या सूर्याखाली निरर्थक असे काहीतरी मी पाहिले:
8 A man alone, no companion, no son or brother; his labor has no end, yet his eyes never fill with wealth. "For whom am I working," he asks, "denying myself good?" This too is a breath—a bad task. एक एकटाच मनुष्य होता; त्याला ना मुलगा होता ना भाऊ. त्याच्या श्रमाला अंत नव्हता, तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती. तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,” “आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?” हे सुद्धा व्यर्थ आहे— ही दैन्यावस्था आहे.
9 Two are better than one, because they have a good return for their labor: एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
10 If one falls, the other lifts him up. But pity the one who falls alone, with no one to help him up. दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे.
11 Also, if two lie down together, they will keep warm. But how can one keep warm alone? जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील, पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?
12 One alone can be overpowered; two can resist. A cord of three strands is not quickly broken. एकट्या व्यक्तीवर मात करता येते, दोघे स्वतःचा बचाव करू शकतात, तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.
13 Better a poor, wise youth than an old, foolish king who no longer knows to take warning. मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले.
14 The youth may have come from prison to reign, or he may have been born poor within that same kingdom. तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल.
15 I saw all the living who move about under the sun following the youth, the king's successor. मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत.
16 Countless were all the people who came before him. Yet those who came later were not pleased with him. This too is fleeting, a chasing after wind. त्यांच्या पूर्वी असंख्य लोक होते. परंतु जे नंतर आले ते त्या उत्तराधिकाऱ्याशी संतुष्ट नव्हते. हे सर्वसुद्धा व्यर्थच, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे आहे.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]