Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Ecclesiastes 5 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Guard your steps entering the house of God. Draw near to listen, not to offer fools' sacrifice—they don't know they're doing evil. परमेश्वराच्या मंदिरात जाताना तू तुझी पावले सांभाळ. बोध ऐकण्यासाठी परमेश्वराच्या समीप जा, मूर्ख लोकांसारखे यज्ञबली देण्यापेक्षा बरे, कारण आपण चूक करीत आहोत, हे त्यांना कळत नाही.
2 Don't rush your mouth, and don't let your heart hurry to speak before God—God is in heaven, you're on earth, so keep your words few. बोलण्यात उतावळा असू नको, परमेश्वरासमोर काहीही उच्चारण्यास आपल्या मनात घाई करू नकोस. कारण परमेश्वर स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे शब्द थोडकेच असू दे.
3 For a dream comes from too much activity, and a fool's voice from too many words. अनेक चिंता असल्यास स्वप्न पडते, आणि जास्त बडबड करण्याने मूर्ख ओळखला जातो.
4 When you vow a vow to God, don't delay paying it—he has no delight in fools. Pay what you vow. परमेश्वराशी तू नवस केला असेल, तर तो फेडण्यास उशीर करू नकोस, परमेश्वराला मूर्ख मनुष्यात प्रसन्नता वाटत नाही; तुझा नवस फेडून टाक.
5 It is better not to vow than to vow and not fulfill it. नवस करून न फेडण्यापेक्षा, तो न केलेला बरा.
6 Don't let your mouth make you sin, or tell the messenger it was a mistake. Why should God be angry at your voice and destroy your handiwork? तुझ्या मुखाने तुला पाप करावयास लावू नये. “मी चुकून नवस केला” असे मंदिराच्या दूताला सांगून निषेध करू नकोस. तू जे बोलतो त्याबद्दल परमेश्वराने रागावून तुझ्या हाताचे कार्य नष्ट का करावे?
7 For in many dreams and many words there is fleeting vapor. Therefore fear God. पुष्कळ स्वप्ने बघणे व अधिक शब्द वापरणे व्यर्थ आहे. म्हणून परमेश्वराचे भय बाळग.
8 If you see the poor oppressed, and justice and righteousness violated in a province, don't be surprised—one official is watched by a higher one, and higher ones stand over them. आपल्या नगरात गरिबांवर अत्याचार होत असताना किंवा त्यांना न्याय आणि त्यांचे हक्क नाकारले जात असताना दिसल्यास त्याबद्दल आश्चर्य बाळगू नकोस; एक अधिकाऱ्याचे निरीक्षण करणारा वरिष्ठ अधिकारी आहे, आणि दोघांवर त्यांचा उच्चाधिकारी आहे.
9 Yet the profit of the land is for everyone; even the king is served by the field. भूमीचे फळ तर सर्वांसाठी आहे; राजासुद्धा त्याद्वारे नफा मिळवितो.
10 Whoever loves money never has enough; whoever loves wealth never has enough income. This too is fleeting. पैशावर प्रेम असणार्‍याला पैसा कधीच पुरेसा नसतो; जो कोणी संपत्तीवर प्रेम करतो, तो कधीही आपल्या मिळकती मध्ये समाधानी नसतो, हे सुद्धा व्यर्थच आहे.
11 As wealth grows, so do those who consume it—what gain for its owner but watching it with his eyes? संपत्ती वाढली म्हणजे, तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात. आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त त्या मालकाला काय लाभ?
12 A worker's sleep is sweet, whether he eats little or much; the rich man's abundance won't let him sleep. खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो कष्टकर्‍याला सुखाची झोप लागते. परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती त्यांना रात्री झोप येऊ देत नाही.
13 I have seen a sickening evil under the sun: wealth kept by its owner, to his harm. सूर्याखाली मी एक भयंकर गोष्ट पाहिली: जसे मालकाची हानी होण्यासाठी साठविलेली संपत्ती,
14 That wealth was lost in a bad venture, and when he fathered a son he had nothing left to leave him. किंवा काही दुर्दैवी व्यवहारामध्ये तो सर्व पैसा गमावून बसतो आणि शेवटी मुलाबाळांकडे वारसाहक्काने मिळण्यास काहीही शिल्लक नसते.
15 As he came from his mother's womb, naked he returns, going as he came, taking nothing from his labor to carry in his hand. प्रत्येकजण आपल्या आईच्या उदरातून नग्न येतो, आणि जसे सर्वजण येतात, तसेच ते परत जातात. त्यांचे कष्टार्जित असे काहीही त्यांच्या हातात घेऊन ते जाऊ शकत नाहीत.
16 This too is a bitter evil: just as he came, so he goes. What does he gain from toiling for wind? ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे: सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात, आणि वार्‍यासाठी कष्ट करून त्यांना काय मिळते?
17 All his days he eats in darkness, with much frustration, sickness, and anger. त्यांच्या सर्व दिवसांत ते अंधारात राहून अत्यंत निराशा, यातना आणि क्रोधासह अन्न खातात,
18 This I have seen: it is good and fitting to eat, drink, and see good in all the labor one labors at under the sun through the few days of life God gives—for that is one's lot. तरी एक चांगली गोष्ट मी पाहिली: मनुष्याने खावे, प्यावे व परमेश्वराने आपल्याला सूर्याखाली दिलेल्या या थोड्या दिवसाच्या कष्टमय जीवनात जे आहे, त्यात समाधान मानावे—हाच त्यांचा वाटा आहे.
19 Also, when God gives someone wealth, possessions, and power to enjoy them, to accept their portion and find joy in their labor—that is God's gift. आणि याशिवाय परमेश्वराने जर कोणा मनुष्याला संपत्ती आणि तिचा उपभोग घेण्यासाठी आरोग्य दिले असेल, तर त्यांनी त्या परिश्रमात आनंद करावा—हे त्यांना परमेश्वराचे दान आहे. आनंदाने काम करणे व जीवनात जे वाट्याला येईल त्यात समाधान मानणे, ही खरोखर परमेश्वराची देणगी आहे.
20 He will seldom recall the days of his life, since God keeps him busy with the joy of his heart. असे करणार्‍याला आपल्या भूतकाळाचे मनन करावे लागत नाही, कारण परमेश्वर त्याचे अंतःकरण आनंदाने भरून ठेवतो.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]