Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Amos 4 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Hear this word, you cows of Bashan who are on the mountain of Samaria, you who oppress the poor, who crush the needy, who say to your masters, "Bring us something to drink!" शोमरोनच्या डोंगरावर राहणार्‍या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्‍यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”
2 The Sovereign Father has sworn by his holiness: "The days are coming upon you when they will drag you away with hooks, and the last of you with fishhooks. सार्वभौम याहवेहने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन म्हटले आहे: “खचितच अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला आकड्यांनी आणि तुमच्यातील शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील.
3 You will go out through the breaches in the wall, each one straight ahead, and you will be flung out toward Harmon," declares our Father. तुमच्यातील प्रत्येक भिंतीच्या भगदाडातून सरळ निघून जाल. तुम्ही हर्मोनात आपणाला टाकाल.” असे याहवेह म्हणतात.
4 "Come to Bethel and rebel; to Gilgal, and rebel all the more! Bring your sacrifices every morning, your tithes every three days. “बेथेलास जा आणि पाप करा; गिलगालास जाऊन आणि अधिक पाप करा. रोज सकाळी आपली अर्पणे, दर तीन वर्षांनी आपला दशांश आणा.
5 Burn leavened bread as a thank offering, announce your freewill offerings, proclaim them aloud—for this is what you love to do, people of Israel!" declares the Sovereign Father. उपकारस्तुती म्हणून खमिराची भाकरी जाळून टाका आणि तुमच्या स्वैच्छिक अर्पणांची फुशारकी मारा; इस्राएली लोकहो तुम्ही याविषयी बढाई मिरवा, कारण असेच करणे तुम्हाला आवडते.” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
6 "I gave you empty stomachs in every city and a lack of bread in every place, yet you did not return to me," declares our Father. “मी तुम्हाला प्रत्येक शहरात उपाशी पोटी ठेवले आणि प्रत्येक नगरात भाकरीची कमतरता केली, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.
7 "I also withheld the rain from you while there were still three months to the harvest. I would send rain on one city and withhold it from another; one field would be rained on, and the field with no rain would dry up. “हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्‍यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.
8 So two or three cities would stagger to another city for water but not have enough to drink, yet you did not return to me," declares our Father. पाण्यासाठी लोक नगरोनगरी भटकले परंतु त्यांना पिण्यास पुरेसे मिळाले नाही, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.
9 "I struck you with blight and mildew; the locust devoured your many gardens and vineyards, your fig trees and your olive trees, yet you did not return to me," declares our Father. “मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा आणि भेरड हे रोग पाठविले; टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
10 "I sent a plague against you like the one in Egypt; I killed your young men with the sword and carried off your horses. I made the stench of your camp rise into your nostrils, yet you did not return to me," declares our Father. “इजिप्तमध्ये पाठविल्या तशा पीडा मी तुमच्यामध्ये पाठविल्या. मी तुमच्या तरुणांना तुमच्या लुटलेल्या घोड्यांसहित तलवारीने मारून टाकले. तुमच्या छावणीतील दुर्गंध तुमच्या नाकात भरला, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
11 "I overthrew some of you as I overthrew Sodom and Gomorrah, and you were like a stick snatched from the fire, yet you did not return to me," declares our Father. “तुमच्यातील काहींचा नाश असा केला जसा मी, परमेश्वराने, सदोम आणि गमोराचा केला. तुम्ही अग्नीच्या भट्टीतून ओढून काढलेल्या जळत्या काठीप्रमाणे होता, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
12 "Therefore this is what I will do to you, Israel; and because I will do this to you, prepare to meet your Father, O Israel!" “म्हणून हे इस्राएला, मी तझ्यासोबत असेच करणार आहे, कारण मी तुझ्याशी असे करणार आहे, म्हणून तुझ्या परमेश्वराला भेटण्यास तयार हो.”
13 For it is he who forms the mountains and creates the wind, who reveals his thoughts to mankind, who turns the dawn to darkness and treads on the heights of the earth—the Father of heaven's armies is his name. ज्यांनी पर्वतांची रचना केली, ज्यांनी वारे निर्माण केले, आणि जे आपले विचार मानवजातीला प्रकट करतात, जे प्रभात समयाला अंधकारात बदलतात आणि पर्वताला आपल्या पायाखाली तुडवितात; याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, हे त्यांचे नाव आहे.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]