Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Numbers 13 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Our Father said to Moses, याहवेह मोशेला म्हणाले,
2 "send men to scout the land of Canaan, which I'm giving Israel's people. Send one man per ancestral tribe, each a leader among them." “मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.”
3 So Moses sent them from the wilderness of Paran at our Father's command; all were leaders of Israel's people. म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते.
4 These were their names: from the tribe of Reuben, Shammua the son of Zaccur; त्यांची नावे ही आहेत: रऊबेन गोत्रातील जक्कूरचा पुत्र शम्मुवा;
5 from the tribe of Simeon, Shaphat the son of Hori; शिमओन गोत्रातील होरीचा पुत्र शाफाट;
6 from the tribe of Judah, Caleb the son of Jephunneh; यहूदाह गोत्रातील यफुन्नेहचा पुत्र कालेब;
7 from the tribe of Issachar, Igal the son of Joseph; इस्साखार गोत्रातील योसेफाचा पुत्र इगाल;
8 from the tribe of Ephraim, Hoshea the son of Nun; एफ्राईमच्या गोत्रातील नूनाचा पुत्र होशा;
9 from the tribe of Benjamin, Palti the son of Raphu; बिन्यामीन गोत्रातील राफूचा पुत्र पालती;
10 from the tribe of Zebulun, Gaddiel the son of Sodi; जबुलून गोत्रातील सोदीचा पुत्र गाद्दीयेल;
11 from the tribe of Joseph (that is, from the tribe of Manasseh), Gaddi the son of Susi; मनश्शेहच्या गोत्रातील (योसेफाचे गोत्र) सुसीचा पुत्र गाद्दी;
12 from the tribe of Dan, Ammiel the son of Gemalli; दान गोत्रातील गमल्लीचा पुत्र अम्मीएल;
13 from the tribe of Asher, Sethur the son of Michael; आशेर गोत्रातील मिखाएलचा पुत्र सेथूर;
14 from the tribe of Naphtali, Nahbi the son of Vophsi; नफताली गोत्रातील वोफसीचा पुत्र नाहबी;
15 from the tribe of Gad, Geuel the son of Machi. गाद गोत्रातील माकीचा पुत्र गऊवेल.
16 These are the names of the men Moses sent to scout the land. Moses named Hoshea son of Nun, Joshua. देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.)
17 Moses sent them to scout the land of Canaan and said to them, "Go up this way into the Negev, go up into the hill country, जेव्हा मोशे त्यांना कनान देश हेरायाला पाठवित होता तेव्हा तो म्हणाला, “नेगेव-दक्षिण-मधून वर डोंगराळ प्रदेशात जा.
18 and see what the land is like, and whether the people living there are strong or weak, few or many, आणि तो देश कसा आहे, तिथे जे लोक राहतात ते बलवान आहेत की दुर्बल आहेत, ते थोडे आहेत की पुष्कळ हे पाहा.
19 and whether the towns they live in are open camps or fortified, and whether the land is good or bad, ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे की वाईट आहे? कोणत्या प्रकारच्या नगरांमध्ये त्यांची वस्ती आहे? ते उजाड आहेत की तटबंदीची आहेत?
20 and whether the land is rich or poor, and whether it has trees or not. Be brave, and bring back fruit from the land." It was the season of the first ripe grapes. तेथील जमीन कशी आहे? ती सुपीक आहे की नापीक? त्यात झाडे आहेत की नाही? तुम्ही परत येताना त्या देशातील काही फळे तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा कसोशीने प्रयत्न करा.” (तो प्रथमपक्व द्राक्षाच्या फळांचा हंगाम होता.)
21 So they went up and explored the land from the wilderness of Zin to Rehob, near Lebo-hamath. मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला.
22 They went up through the Negev to Hebron, where Ahiman, Sheshai, and Talmai, Anak's descendants, lived. Hebron was built seven years before Zoan in Egypt. ते वरती नेगेवमधून गेले आणि हेब्रोनात आले, जिथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते. (हेब्रोन हे इजिप्त देशातील सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले गेले होते.)
23 They reached the Valley of Eshcol and cut a branch with one cluster of grapes, carried on a pole between two men; they also brought pomegranates and figs. ते जेव्हा अष्कोल खोर्‍याजवळ आले. तिथे त्यांनी एक द्राक्षांचा घड असलेली फांदी कापून घेतली. दोन माणसांनी त्यांच्यामध्ये तो एका काठीवर घालून वाहून नेला. त्याचबरोबर त्यांनी काही डाळिंबे आणि अंजिरेही घेतली.
24 That place was named Valley of Eshcol, since the Israelites cut a cluster of grapes there. त्या खोर्‍याचे नाव अष्कोल असे ठेवले कारण इस्राएली लोकांनी तिथून द्राक्षाचा घड कापून घेतला होता.
25 At the end of forty days they returned from exploring the land. देश हेरून चाळीस दिवसानंतर ते परत आले.
26 They came to Moses, Aaron, and the whole community of Israel in the wilderness of Paran, at Kadesh, reported back to them and the whole community, and showed them the land's fruit. पारान रानातील कादेश येथे मोशे आणि अहरोन व सर्व इस्राएली लोकांकडे ते परत आले. तिथे त्यांनी त्यांना व सर्व समुदायाला अहवाल दिला व त्या देशाची फळे दाखविली.
27 They told him, "We went to the land you sent us to. It truly flows with milk and honey; here is its fruit. त्यांनी मोशेला अहवाल दिला तो असा: “जो देश हेरण्यास तुम्ही आम्हाला पाठविले तिथे आम्ही गेलो, त्यात खरोखरच दूध व मध वाहतात! ही पाहा तेथील फळे.
28 Yet the people in the land are strong, the cities fortified and very large—we even saw Anak's descendants there. परंतु तिथे राहत असलेले लोक बलवान आहेत, त्यांची शहरे तटबंदीची व पुष्कळ मोठी आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनाकाचे वंशजही पाहिले.
29 Amalekites live in the Negev. Hittites, Jebusites, and Amorites live in the hills. Canaanites live along the sea and beside the Jordan." नेगेवमध्ये अमालेकी लोक राहतात. डोंगराळ प्रदेशात हिथी, यबूसी आणि अमोरी लोक राहतात. समुद्राच्या किनार्‍यावर आणि यार्देन नदीच्या खोर्‍यात कनानी लोक राहतात.”
30 Caleb silenced the people before Moses and said, "Let's go up now and possess it—we can certainly overcome it." तेव्हा मोशेसमोर कालेबाने लोकांना शांत केले व म्हणाला, “आपण वर जाऊन तो देश ताब्यात घेतला पाहिजे, कारण आपण खचितच ते करू शकतो.”
31 But the men who went up with him said, "We can't go up against the people, for they are stronger than we are." परंतु जे पुरुष त्याच्याबरोबर वर गेले होते ते म्हणाले, “त्या लोकांवर आपण हल्ला करू शकत नाही; ते आपल्यापेक्षा बलवान आहेत.”
32 So they gave Israel a bad report of the land they had explored, saying, "The land we crossed to explore devours its inhabitants, and everyone we saw there is of great size. आणि जो देश ते हेरण्यास गेले होते त्याबद्दल त्यांनी इस्राएली लोकांमध्ये वाईट अहवाल पसरविला. ते म्हणाले, “जो देश आम्ही हेरला तो देश त्यांच्या रहिवाशांना खाऊन टाकणारा आहे. जे लोक आम्ही पाहिले ते धिप्पाड आहेत.
33 There we saw the Nephilim—Anak's descendants come from the Nephilim. We seemed like grasshoppers to ourselves, and so we seemed to them." तिथे आम्ही नेफिलीम (अनाकाचे महाबलाढ्य वंशज नेफिलीम पासून आहेत) लोकांना बघितले. आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनाही आम्ही तसेच भासलो.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]