Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Philemon 1 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Paul, a prisoner of Christ Jesus, and Timothy our brother, to Philemon, our dear friend and co-worker, ख्रिस्त येशूंचा बंदिवान पौल आणि आपला बंधू तीमथ्य, आमचा प्रिय मित्र आणि सहकारी फिलेमोन—
2 and to our sister Apphia, our fellow soldier Archippus, and the church that meets in your house: आमची बहीण अप्फिया आणि आमचा सहसैनिक अर्खिप—आणि जी मंडळी तुमच्या घरात एकत्र भेटतात त्यांना:
3 Grace and peace to you from our Father and the Lord Jesus Christ. परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
4 I always thank my Father as I remember you in my prayers, मी माझ्या प्रार्थनांमध्ये तुझी आठवण करून माझ्या परमेश्वराचे सतत आभार मानतो,
5 because I hear of your love and faith in the Lord Jesus and for all his holy people. कारण त्यांच्या सर्व पवित्र लोकांवरील तुझी प्रीती आणि प्रभू येशूंवरील तुझा विश्वास याविषयी मी ऐकले आहे.
6 I pray your shared faith becomes effective as you come to understand every good thing we have in Christ. तुला ख्रिस्तात प्राप्त होणार्‍या सर्व चांगल्या गोष्टींचे सखोल ज्ञान होण्यासाठी तुझी आमच्याबरोबर विश्वासामध्ये असलेली भागीदारी कार्यरत व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
7 Your love has brought me great joy and comfort, brother, since you've refreshed the hearts of his holy people. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व प्रोत्साहन प्राप्त झाले आहे, कारण बंधू, तू प्रभूच्या लोकांची अंतःकरणे ताजीतवानी केली आहेस.
8 Therefore, although in Christ I am bold enough to command you to do what is right, यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे,
9 instead, for love's sake I appeal—I, Paul, an old man, now also a prisoner of Christ Jesus. तरी मी पौल—वयस्क मनुष्य आणि आता ख्रिस्त येशूंचा बंदिवान, तुला प्रीतीस्तव विनंती करण्याचे पसंत करतो.
10 I appeal to you for my child Onesimus, whose father I became while I was in chains. माझी विनंती माझा पुत्र अनेसिम जो मी बंधनात असताना माझा आत्मिक पुत्र झाला त्याच्या संदर्भात आहे.
11 He was once useless to you, but now is useful to you and me. तो यापूर्वी तुला उपयोगी नव्हता, परंतु आता तो आपल्या दोघांनाही, तुला व मला उपयोगी आहे.
12 I am sending him back to you—and in doing so I am sending my very heart. तो माझा प्राण आहे—त्याला मी तुझ्याकडे—परत पाठवित आहे.
13 I wanted to keep him with me, to serve me on your behalf while I'm in chains for the gospel. शुभवार्तेमुळे मी या बंधनात असताना माझी मदत करण्यासाठी त्याने तुझी जागा घेतली असती आणि त्याला येथेच ठेवणे मला आवडले असते.
14 But I wanted to do nothing without your consent, so your good deed would not be forced, but voluntary. परंतु तुझ्या संमतीशिवाय काहीही करणे मला योग्य वाटले नाही, यासाठी की जे काही औदार्य तू करशील ते बळजबरीने केल्यासारखे नसावे परंतु स्वेच्छेने केलेले असावे.
15 Perhaps this is why he was separated from you briefly, so you'd have him back forever. कदाचित या कारणासाठी तो थोडा काळ तुझ्यापासून वेगळा झाला असेल, जेणेकरून तू त्याला सर्वकाळासाठी प्राप्त करून घ्यावे.
16 No longer as a slave, but more than a slave—a beloved brother, especially to me, but even more to you, both in the flesh and in the Lord. परंतु येथून पुढे दास नव्हे, तर दासापेक्षा योग्य असा प्रिय बंधू व्हावे. तो मला अतिशय प्रिय आहे, परंतु व्यक्तिगत रीतीने आणि प्रभूमध्ये बंधू या दोन्हीही नात्याने तो तुला अधिक प्रिय आहे.
17 So if you consider me a partner, welcome him as you would welcome me. यास्तव जर तू मला भागीदार समजत असशील, तर जसे तू माझे स्वागत केले असते, तसेच त्याचे कर.
18 If he wronged you at all, or owes anything, put it on my account. जर त्याने काही अयोग्य कृत्य केले असेल अथवा तो तुझा कर्जदार असेल तर ते मूल्य माझ्या हिशोबी मांड.
19 I, Paul, write this with my own hand: I'll repay it—not to mention you owe me yourself as well. हे, मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी लिहित आहे. मी त्याची परतफेड करेन—वास्तविक तू स्वतः माझा ॠणी आहेस, परंतु मी त्याचा उल्लेख करणार नाही.
20 Yes, brother, do me this favor in the Lord—refresh my heart in Christ. बंधू, माझी इच्छा आहे की प्रभूमध्ये मला तुझ्याकडून काही लाभ व्हावा; माझ्या ह्रदयाला ख्रिस्तामध्ये ताजेतवाने कर.
21 Trusting you'll obey, I write to you, knowing you'll do even more than I ask. तू आज्ञापालन करशील याची खात्री बाळगून मी तुला हे लिहिले आहे आणि जे मी तुला सांगत आहे त्यापेक्षा तू कितीतरी अधिक करशील हे मला माहीत आहे.
22 Also prepare a guest room for me—I hope through your prayers to be graciously given back to you. आणखी एक गोष्ट: माझ्यासाठी पाहुण्यांची खोली तयार ठेव, कारण तुझ्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून माझ्या येण्याने तुझी भरपाई होईल अशी मी आशा करतो.
23 Epaphras, my fellow prisoner in Christ Jesus, sends you greetings, ख्रिस्त येशूंमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास तुला शुभेच्छा पाठवितो.
24 and so do Mark, Aristarchus, Demas, and Luke, my fellow workers. आणि मार्क, अरिस्तार्ख, देमास व लूक हे माझे सहकारी देखील तुला शुभेच्छा पाठवितात.
25 The grace of the Lord Jesus Christ be with your spirit. Amen. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्यासह असो.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]