Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 5 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Let me sing now for the one I love a song of my beloved about his vineyard. My beloved had a vineyard on a very fertile hillside. माझी ज्यांच्यावर प्रीती आहे त्यांच्या द्राक्षमळ्याबद्दल मी गीत गाईन: सुपीक डोंगराळ भागावर माझ्या प्रियाचा एक द्राक्षमळा होता.
2 He dug it and cleared it of stones and planted it with the choicest vines. He built a watchtower in the middle of it and also carved out a winepress in it. Then he waited for it to yield good grapes, but it yielded only wild ones. त्याने ते खोदले आणि त्यातील दगड काढून ते स्वच्छ केले आणि मनपसंद द्राक्षवेलींचे तिथे रोपण केले. त्याने त्यामध्ये एक टेहळणी बुरूज बांधला आणि त्याचबरोबर द्राक्षकुंडही तयार केला. नंतर त्याने उत्तम द्राक्षांच्या पिकांची वाट पाहिली, परंतु तिथे फक्त वाईट फळे उपजली.
3 "And now, you who live in Jerusalem and you people of Judah, judge between me and my vineyard. “आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा.
4 What more was there to do for my vineyard that I have not done in it? Why, when I waited for it to yield good grapes, did it yield only wild ones? माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी जे काही केले आहे त्यापेक्षा जास्त मी काय करू शकलो असतो? मी जेव्हा चांगल्या द्राक्षांची अपेक्षा केली, तेव्हा तिथे फक्त वाईट फळे का उपजली?
5 And now let me tell you what I am about to do to my vineyard: I will take away its hedge, and it will be devoured; I will break down its wall, and it will be trampled. आता मी तुम्हाला सांगेन, मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे: मी त्याचे कुंपण काढून टाकेन, आणि त्याचा नाश होईल; मी त्याची भिंत पाडेन, आणि ते तुडविले जाईल.
6 I will make it a wasteland; it will not be pruned or hoed, and briers and thorns will grow up over it. And I will command the clouds to send no rain upon it." मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”
7 For the vineyard of the Father of heaven's armies is the house of Israel, and the people of Judah are his cherished planting. He looked for justice, but found only bloodshed; for righteousness, but heard only an outcry. इस्राएल राष्ट्र सर्वसमर्थ याहवेहचा द्राक्षमळा आहे, आणि यहूदीयाचे लोक, त्यांना प्रसन्न करणाऱ्या द्राक्षलता आहेत, ज्यामध्ये त्यांना आनंद होतो. आणि त्यांनी न्यायाची अपेक्षा केली, परंतु त्यांना रक्तपातच दिसून आला; नीतिमत्वाची अपेक्षा केली, परंतु पीडेचे रुदन ऐकू आले.
8 Woe to those who add house to house and join field to field, until there is no room left and you live alone in the middle of the land. तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.
9 With my own ears I heard the Father of heaven's armies swear: "Surely many houses will become desolate, great and beautiful ones left without anyone to live in them. माझ्या ऐकण्यात आले, सर्वसमर्थ याहवेहनी असे जाहीर केले आहे: “मोठमोठी घरे निश्चितच निर्जन होतील, उत्तम महालांमध्ये कोणी रहिवासी नसेल.
10 For ten acres of vineyard will yield only about six gallons of wine, and ten baskets of seed will yield only one basket of grain." दहा एकर द्राक्षमळ्यातून फक्त एक बथ द्राक्षारस निघेल; एक होमेर बियाणे फक्त एक एफा धान्याचे पीक देईल.”
11 Woe to those who rise early in the morning to chase strong drink, who linger late into the evening till wine inflames them. जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!
12 At their feasts there are lyre and harp, tambourine and flute and wine, but they pay no regard to the deeds of our Father, and they do not see the work of his hands. त्यांच्या मेजवानीत त्यांच्याकडे वीणा आणि सारंगी आहेत, वाद्ये आणि डफ आणि द्राक्षमद्य आहे, परंतु याहवेहनी केलेल्या कृत्यांकडे त्यांचे लक्ष नाही. याहवेहच्या हातांनी केलेल्या कार्यांचा ते आदर करीत नाहीत.
13 Therefore my people go into exile for lack of knowledge; their honored men are starved, and the common people are parched with thirst. म्हणून असमजंसपणामुळे माझे लोक बंदिवासात नेले जातील; उच्च पदावरील लोक भुकेने मरतील आणि सर्वसाधारण लोक तहानेने कोरडे पडतील.
14 Therefore the grave has enlarged its appetite and opened its mouth wide, and down go her splendor and her crowds, her uproar and all who rejoice in her. म्हणून मृत्यू त्याचे जबडे पसरवितो, त्याचे तोंड मोठे करून उघडतो. त्यांचे उच्चकुलीन आणि जनसमूह, त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व भांडखोर आणि चंगळ करणारे त्यामध्ये उतरतील.
15 So mankind is humbled, and each person is brought low, and the proud eyes of the arrogant are cast down. म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल.
16 But the Father of heaven's armies is exalted in justice, and our holy Father shows himself holy in righteousness. परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील, आणि पवित्र परमेश्वर त्यांच्या नीतिमान कृत्यांद्वारे पवित्र ठरतील.
17 Then lambs will graze as in their own pasture, and strangers will feed among the ruins of the rich. तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील; श्रीमंतांच्या अवशेषांमध्ये कोकरे चरतील.
18 Woe to those who drag their wickedness along with cords of lies, and sin as with cart ropes, धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.
19 who say, "Let him hurry; let him speed his work, so we may see it. Let the plan of the Holy One of Israel draw near and come, so we may know it." धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या; त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या म्हणजे आपल्याला ते पाहता येईल. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना— ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या, म्हणजे आम्हाला ती कळेल.”
20 Woe to those who call evil good and good evil, who call darkness light and light darkness, who call bitter sweet and sweet bitter. धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात आणि चांगल्याला वाईट म्हणतात, जे अंधाराला प्रकाश आणि प्रकाशाला अंधार, जे गोड त्याला कडू आणि कडू त्याला गोड असे म्हणतात.
21 Woe to those who are wise in their own eyes and clever in their own sight. धिक्कार असो, जे स्वतःच्या दृष्टीत शहाणे आहेत आणि स्वतःच्या नजरेत हुशार आहेत.
22 Woe to those who are heroes at drinking wine and champions at mixing strong drink, धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,
23 who acquit the guilty for a bribe and strip away the rights of the innocent. लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.
24 Therefore, as a tongue of fire devours the stubble and dry grass shrivels in the flame, so their roots will rot and their blossom go up like dust; for they have rejected the instruction of the Father of heaven's armies, and despised the word of the Holy One of Israel. म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, तशीच त्यांची मुळे कुजून जातील, आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.
25 Therefore the anger of our Father burned against his people, and he stretched out his hand against them and struck them. The mountains quaked, and their corpses lay like garbage in the streets. For all this his anger has not turned away, and his hand is still stretched out. म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे; त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात. पर्वत डगमगतात, आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत. हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
26 He will raise a signal for the nations far away and whistle for them from the ends of the earth, and swiftly, speedily they come. दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!
27 Not one of them is weary or stumbles, not one drowses or sleeps; not a belt is loosened at the waist, not a sandal strap is broken. त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही.
28 Their arrows are sharpened and all their bows are drawn; their horses' hooves seem like flint and their wheels like a whirlwind. त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांच्या सर्व धनुष्यांच्या तारा ताणून तयार आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे वाटतात, त्यांच्या रथाची चाके वावटळीसारखी दिसतात.
29 Their roar is like a lion; they roar like young lions. They growl and seize the prey and carry it off, with no one to rescue the victims. त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.
30 On that day they will growl over it like the growling of the sea. And if anyone looks across the land, there is only darkness and distress; even the light is darkened by its clouds. त्या दिवशी ते त्याच्यावर समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील. आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर, तिथे फक्त अंधार आणि संकट आहे; ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]