Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Isaiah 32 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Look, a king will reign in righteousness, and rulers will govern with justice. पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील.
2 Each will be like a shelter from the wind, a refuge from the storm, like streams of water in a dry place, like the shadow of a great rock in a weary land. प्रत्येकजण वाऱ्यापासून आश्रयस्थान आणि वादळापासून आश्रयस्थान, वाळवंटामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रवाहासारखा आणि तहानलेल्या भूमीमध्ये मोठ्या खडकाच्या सावलीसारखा असेल.
3 Then the eyes of those who see will not be closed, and the ears of those who hear will listen. तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे बंद राहणार नाहीत, आणि ज्यांच्या कानांना ऐकू येते ते ऐकतील.
4 The hasty mind will understand knowledge, and the stammering tongue will speak readily and clearly. भीती बाळगणाऱ्या अंतःकरणाला माहीत होईल आणि ते समजून घेतील आणि अडखळणारी जीभ अस्खलित आणि स्पष्ट अशी होईल.
5 No longer will the fool be called noble, nor the scoundrel said to be honorable. यापुढे मूर्खांना चांगले व बदमाशांना थोर म्हटले जाणार नाही.
6 For the fool speaks foolishness, and his heart plots evil: to practice ungodliness, to speak lies about our Father, to leave the hungry with nothing and to deprive the thirsty of drink. मूर्ख लोक मूर्खपणाच्या गोष्टी करतात, त्यांचे अंतःकरण वाईट कृत्य करण्यावरच केंद्रित असते: ते देवहीनतेची कृत्ये करतात आणि याहवेहविरुद्ध चुकीच्या गोष्टी पसरवितात; भुकेल्यांना ते उपाशी सोडतात आणि व तान्हेल्या जिवांना पाण्यापासून वंचित ठेवतात.
7 The scoundrel's weapons are evil; he devises wicked schemes to destroy the poor with lying words, even when the needy pleads his case justly. बदमाश माणसे दुष्ट पद्धतीचा वापर करतात, गरजवंताची याचना वाजवी असली तरी, ते दुष्टाईच्या योजना बनवितात, ते लबाडीने गरिबांचा नाश करतात.
8 But the noble person plans noble things, and by noble things he stands. परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो.
9 You complacent women, rise up and hear my voice; you carefree daughters, listen to what I say. आळसात लोळत पडणार्‍या स्त्रियांनो, उठा व माझे ऐका; हे निश्चिंत असणाऱ्या कन्यांनो, मी काय सांगतो याकडे लक्ष द्या!
10 "In little more than a year you will tremble, you carefree women, for the grape harvest will fail, and there will be no gathering. एका वर्षाहून अधिक कालावधीत तुम्हाला जे सुरक्षित वाटते ते थरथर कापतील; कारण द्राक्षाचा उपज बुडेल, आणि फळांचा हंगाम येणार नाही.
11 Tremble, you complacent ones; shudder, you carefree ones! Strip yourselves bare and put mourning clothes around your waists. आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! आपली सुंदर वस्त्रे काढून शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.
12 Beat your breasts for the pleasant fields, for the fruitful vine, तुमचे ऊर बडवा, प्रसन्न करणार्‍या तुमच्या शेतांसाठी, फलवंत द्राक्षवेलीसाठी
13 for the land of my people, where thorns and briers grow up; indeed, for all the houses of joy in the jubilant city. आणि माझ्या लोकांच्या भूमीसाठीही कारण शेतात सर्वत्र काटेकुसळे व झुडपे वाढतील— होय, आनंदोत्सव करणाऱ्या तुमच्या घरांसाठी, व चैनबाजी करणार्‍या या शहरांसाठी विलाप करा.
14 For the palace will be abandoned, the bustling city deserted; the hill and the watchtower will become bare places forever, a delight for wild donkeys, a pasture for flocks, गडाचा त्याग करण्यात येईल, गजबजलेली शहरे रिकामी होतील; किल्ले व टेहळणी बुरूज कायमची पडीक स्थाने होतील, जिथे रानगाढवांचे व शेरडेमेंढरांचे कळप आनंदात चरतील,
15 until the Spirit of our Father is poured out on us from on high, and the wilderness becomes a fruitful field, and the fruitful field is regarded as a forest. परंतु जेव्हा उच्च स्थानावरून परमेश्वराचा आत्मा आपल्यावर ओतल्या जाईल, ओसाड भूमी सुपीक होईल, आणि सुपीक भूमी अरण्यासारखी वाटू लागेल.
16 Then justice will dwell in the wilderness, and righteousness will remain in the fruitful field. याहवेहचा न्याय वाळवंटातही वास्तव्य करेल, व त्यांची नीतिमत्ता सुपीक भूमीत नांदेल.
17 The work of righteousness will be peace, and the result of righteousness, quietness and security forever. शांती नीतिमत्तेचे फळ असेल; नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.
18 My people will dwell in a peaceful home, in secure dwellings, in undisturbed resting places. माझ्या लोकांची घरे शांतीने भरलेली आणि सुरक्षित असतील, त्यांची शांतिभंग न होता ते विश्रांती घेतील.
19 Though hail flattens the forest and the city is completely leveled, जरी गारांनी अरण्याचा नाश होईल आणि सर्व शहरे जमीनदोस्त होतील.
20 blessed are you who sow beside all the waters, who let the ox and the donkey range freely." तरी तुम्ही किती आशीर्वादित व्हाल, प्रत्येक झऱ्याजवळ तुमचे बीज पेराल, आणि तुमची गुरे आणि गाढवे मुक्तपणे चरतील.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]