Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Genesis 11 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Now the whole earth had one language and a common speech. त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती.
2 And as they migrated eastward, they found a plain in the land of Shinar and settled there. पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली.
3 They said to each other, "Come, let's make bricks and fire them hard." They used brick for stone, tar for mortar. ते एकमेकास म्हणाले, “चला आपण विटा तयार करून त्याला पक्क्या भाजू या.” त्याप्रमाणे त्यांनी दगडाऐवजी विटा तयार केल्या आणि चुना म्हणून डांबर वापरले.
4 Then they said, "Come, let's build us a city and tower with its top in the sky, and make us a name, so we don't scatter over the face of the whole earth." मग ते म्हणाले, “आपण स्वतःसाठी एक मोठे शहर आणि आकाशाला भिडणारा अतिउंच बुरूज बांधू म्हणजे आपण प्रसिद्ध होऊ; नाहीतर पृथ्वीतलावर आपली पांगापांग होईल.”
5 But our Father came down to see the city and the tower that the people were building. परंतु जेव्हा मानव बांधत असलेले शहर आणि बुरूज पाहण्यास याहवेह खाली आले,
6 And our Father said, "Look, they are one people with one language, and this is only the start of what they will do. Now nothing they plan to do will be impossible for them. तेव्हा याहवेह म्हणाले, “हे सर्व एक असून त्यांची भाषा ही एकच आहे, जर ही योजना साध्य झाली तर मानवांना असाध्य असे काहीही राहणार नाही.
7 Come, let's go down there and scramble their language, so no one understands a neighbor's language." चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.”
8 So our Father scattered them from there across all the earth's face, and they stopped building the city. अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले.
9 So it was called Babel, for there our Father confused all the earth's language, and from there scattered them over all the earth's face. म्हणून त्या शहराला बाबिलोन म्हणतात, कारण याहवेहने मानवांना गोंधळात पाडून अनेक भाषा दिल्या आणि सर्व पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली.
10 This is Shem's account: at 100, he fathered Arpachshad, two years after the flood. शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.
11 Shem lived 500 years after he fathered Arpachshad, and had other sons and daughters. अर्पक्षदाचा पिता झाल्यानंतर शेम आणखी 500 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
12 When Arpachshad had lived thirty-five years, he fathered Shelah. अर्पक्षद 35 वर्षांचा असताना तो शेलाहचा पिता झाला.
13 Arpachshad lived 403 years after he fathered Shelah, and had other sons and daughters. शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
14 When Shelah had lived thirty years, he fathered Eber. जेव्हा शेलाह 30 वर्षांचा झाला तेव्हा तो एबरचा पिता झाला.
15 Shelah lived 403 years after he fathered Eber, and had other sons and daughters. आणि एबरचा पिता झाल्यावर शेलाह आणखी 403 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
16 When Eber had lived thirty-four years, he fathered Peleg. एबरचा पुत्र पेलेग जन्मला तेव्हा एबर 34 वर्षांचा होता.
17 Eber lived 430 years after he fathered Peleg, and had other sons and daughters. पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
18 When Peleg had lived thirty years, he fathered Reu. पेलेगचा पुत्र रऊ जन्मला तेव्हा पेलेग 30 वर्षांचा होता.
19 Peleg lived 209 years after he fathered Reu, and had other sons and daughters. रऊच्या जन्मानंतर पेलेग आणखी 209 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
20 When Reu had lived thirty-two years, he fathered Serug. रऊचा पुत्र सरूग जन्मला तेव्हा रऊ 32 वर्षांचा होता.
21 Reu lived 207 years after he fathered Serug, and had other sons and daughters. सरूगच्या जन्मानंतर रऊ आणखी 207 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
22 When Serug had lived thirty years, he fathered Nahor. सरूगचा पुत्र नाहोर जन्मला तेव्हा तो 30 वर्षांचा होता.
23 Serug lived 200 years after he fathered Nahor, and had other sons and daughters. नाहोरच्या जन्मानंतर सरूग आणखी 200 वर्षे जगला, आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
24 When Nahor had lived twenty-nine years, he fathered Terah. नाहोर 29 वर्षांचा होता तेव्हा त्याला तेरह झाला.
25 Nahor lived 119 years after he fathered Terah, and had other sons and daughters. तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.
26 When Terah had lived seventy years, he fathered Abram, Nahor, and Haran. तेरह 70 वर्षांचा होईपर्यंत त्याला अब्राम, नाहोर व हारान हे तीन पुत्र झाले.
27 Now these are the generations of Terah. Terah fathered Abram, Nahor, and Haran; and Haran fathered Lot. तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला.
28 Haran died in his birthplace, Ur of the Chaldeans, before his father Terah. पण हारान त्याच्या पिता तेरह जिवंत असताना, आपल्या जन्मस्थानी, खाल्डियनांच्या ऊर गावी मरण पावला.
29 Abram and Nahor married; Abram's wife was Sarai, and Nahor's wife was Milcah, daughter of Haran, who was also the father of Iscah. अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता.
30 Now Sarai was unable to conceive; she had no children. सारायला मूलबाळ नव्हते कारण ती वांझ होती.
31 Terah took his son Abram, his grandson Lot son of Haran, and his daughter-in-law Sarai, Abram's wife, and left Ur of the Chaldeans for Canaan; they reached Haran and settled there. मग आपला पुत्र अब्राम, आपला नातू म्हणजे हारानाचा पुत्र लोट आणि आपली सून साराय, यांना बरोबर घेऊन कनान देशात जाण्यासाठी तेरहाने खाल्डियनांचे ऊर गाव सोडले; पण कनान देशात जाण्याऐवजी ते हारान शहरीच स्थायिक झाले.
32 Terah lived 205 years, and died in Haran. तेरहाचे वय 205 वर्षांचे होऊन, हारान येथे तो मरण पावला.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]