Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Ecclesiastes 7 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 A good name is better than fine perfume, and the day of death than the day of birth. सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे, आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे.
2 It is better to go to the house of mourning than to go to the house of feasting, for that is the end of everyone, and the living should take it to heart. मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी; मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे.
3 Sorrow is better than laughter, for a sad face is good for the heart. विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे.
4 The heart of the wise is in the house of mourning, but the heart of fools is in the house of pleasure. सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते, परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते.
5 It is better to hear the rebuke of the wise than to hear the song of fools. सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे.
6 For like the crackling of thorns under a pot, so is the laughter of the fool. This too is fleeting. मूर्खाचे हसणे हे पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे, हे सुद्धा व्यर्थ आहे.
7 Surely oppression turns a wise person into a fool, and a bribe corrupts the heart. पिळवणूक सुज्ञानी मनुष्याला मूर्ख बनविते, आणि लाच हृदयाला भ्रष्ट करते.
8 The end of a matter is better than its beginning, and a patient spirit is better than a proud spirit. एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी.
9 Do not be quick in your spirit to become angry, for anger settles in the lap of fools. क्रोधित होण्यास तुझ्या अंतःकरणात घाई करू नकोस, क्रोध तर मूर्खाच्या मांडीवर वास करतो.
10 Do not say, "Why were the former days better than these?" For it is not from wisdom that you ask this. असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?” कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे.
11 Wisdom is good with an inheritance, an advantage to those who see the sun. सुज्ञान, हे वतन प्राप्तीप्रमाणे चांगले आहे, आणि ज्यांना सूर्य दिसतो त्यांच्यासाठी ते लाभदायक आहे.
12 For wisdom is a shelter, just as money is, but the advantage of knowledge is this: wisdom preserves the life of the one who has it. जसे धन तसेच सुज्ञान हे एक आश्रयस्थान आहे, परंतु सुज्ञानाचा फायदा हा आहे: ज्ञान ज्यांच्या मालकीचे आहे, त्यांचे रक्षण करते.
13 Consider the work of God: who can straighten what he has made crooked? परमेश्वराच्या कामावर मनन करा: त्यांनी जे वाकडे केले आहे ते कोण सरळ करू शकतो?
14 In the day of prosperity be joyful, and in the day of adversity consider: God has made the one as well as the other, so that no one can find out anything that will come after them. जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा; परंतु जेव्हा वेळ प्रतिकूल असते, तेव्हा हे लक्षात घ्या: परमेश्वराने जशी अनुकूल वेळ निर्माण केली तशी प्रतिकूल वेळही त्यांनीच निर्माण केली, म्हणून कोणा व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेता येत नाही.
15 In my fleeting days I've seen it all: a righteous man dying in his righteousness, a wicked man living long in his evil. या व्यर्थ जीवनामध्ये मी दोन्ही गोष्टी पाहिल्या आहेत: नीतिमान व्यक्ती त्यांच्या नीतिमत्वात नाहीसे होतात, आणि दुष्ट त्यांच्या दुष्टपणात दीर्घायुष्य जगतात.
16 Do not be excessively righteous, and do not make yourself overly wise; why should you destroy yourself? अति नीतिमान होऊ नका, किंवा अति सुज्ञानीही असू नका— तुम्ही स्वतःचा नाश का करून घ्यावा?
17 Don't be too wicked, and don't be foolish—why die before your time? अति दुष्ट होऊ नका, आणि मूर्खही असू नका— तुमची वेळ येण्यापूर्वी का मरावे?
18 Good to grasp this, and not let go of that too, for whoever fears God comes through both. पहिल्याला घट्ट धरून ठेवणे, आणि दुसर्‍यालाही सोडून न देणे हे बरे. जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील.
19 Wisdom makes the wise person stronger than ten rulers who are in a city. सुज्ञान एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला एका शहराच्या दहा शासकांपेक्षा अधिक शक्तिशाली बनवते.
20 Surely there is no one righteous on earth who does good and never sins. खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही, असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही.
21 Also, do not take to heart everything people say, or you may hear your servant cursing you, लोकांच्या प्रत्येक शब्दांकडे लक्ष देऊ नका, नाहीतर तुमचा चाकरसुद्धा तुम्हाला शाप देताना तुम्ही ऐकाल—
22 for your own heart knows that many times you yourself have cursed others. कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला हे तुम्हाला तुमच्या मनातच ठाऊक आहे.
23 I tested all this by wisdom. I said, "I am determined to be wise"—but it was beyond me. सुज्ञानाने मी या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या आणि म्हटले, “मी सुज्ञानी होण्याचे ठरविले आहे”— परंतु हे माझ्या शक्तीच्या पलीकडे होते.
24 Whatever exists is far off and deep, very deep—who can discover it? जे काही अस्तित्वात आहे ते खूपच दूर आणि सखोल आहे, त्याचा शोध कोणाला घेता येईल?
25 I turned my heart to know, explore, and seek wisdom and the sum of things, and to know the evil of foolishness and the foolishness that is madness. ज्ञान व रचनेच्या पध्दती जाणून व त्याच शोध घेण्यासाठी आणि दुष्टतेची मूर्खता व मूर्खतेचा वेडेपणा समजण्यासाठी मी माझे मन वळविले.
26 I find the woman more bitter than death: her heart is snares and nets, her hands chains. One good before God escapes her; the sinner is caught by her. मरणापेक्षाही अति कटू गोष्ट मला दिसून आली की, एक स्त्री जी एक पाश आहे, जिचे हृदय एक सापळा आहे जिचे हात साखळीप्रमाणे आहेत. जे परमेश्वराला प्रसन्न करतात ते तिच्यापासून निसटतील, परंतु पापींना ती पाशात अडकवेल.
27 "See, this is what I found," says the Teacher, "adding one to another to find the sum, “पाहा,” शिक्षक असे म्हणतो, “या गोष्टींचा मी शोध लावला आहे: “रचनेच्या पध्दती समजण्यासाठी मी एक गोष्ट दुसरीत मिळविली—
28 which my soul kept seeking but didn't find. One man in 1,000 I found, but a woman among all these I didn't find. जेव्हा मी शोध घेत होतो मला काही निष्पन्न झाले नाही— हजारांमध्ये एक नीतिमान मनुष्य होता. परंतु त्या सर्वांमध्ये एकही स्त्री नीतिमान नव्हती.
29 Look, this alone I found: God made humanity upright, but they sought many schemes." एकच गोष्ट माझ्या लक्षात आली: परमेश्वराने मानवजात नीतिमान अशी निर्माण केली, परंतु ते अनेक योजनांचा शोधच करीत राहिले.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]