Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Mark 5 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 They came to the other side of the sea, to the region of the Gerasenes. ते सरोवराच्या पलीकडे गरसेकरांच्या प्रांतात आले.
2 As Jesus left the boat, a man with an unclean spirit met him at once, from the tombs. येशू होडीतून उतरले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरस्तानातून धावत बाहेर आला.
3 He lived among the tombs, and no one could bind him anymore, not even with a chain. हा मनुष्य स्मशानभूमीत राहत होता आणि त्याला बांधून ठेवणे अशक्य होते, साखळदंडाने बांधणेही शक्य नव्हते.
4 For he'd often been bound with shackles and chains, but tore the chains apart and shattered the shackles—no one had strength to subdue him. बरेचदा त्याचे हात व पाय साखळदंडाने बांधले असतानाही त्याने साखळदंड तोडून टाकले व पायातील लोखंडाच्या बेड्यांचे तुकडे केले. त्याला ताब्यात ठेवण्याची ताकद कोणातही नव्हती.
5 Night and day, among the tombs and on the mountains, he cried out constantly, cutting himself with stones. दिवस आणि रात्र तो स्वतःला दगडांनी ठेचून घेई व थडग्यामध्ये आणि डोंगरामधून मोठमोठ्याने ओरडत असे.
6 And when he saw Jesus from a distance, he ran and fell down before him. येशूंना त्याने दूर अंतरावरून पाहिले व तो धावत आला आणि त्यांच्यासमोर गुडघे टेकून पाया पडला,
7 Shouting loudly, he said, "What do you want with me, Jesus, Son of the Most High God? I beg you by God, don't torment me!" तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुला माझ्याशी काय काम? परमेश्वराची शपथ मला छळू नकोस.”
8 For Jesus had been saying to him, "Come out of the man, you unclean spirit!" कारण येशूंनी त्याला म्हटले होते, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून बाहेर ये.”
9 Jesus asked, "What is your name?" "Legion," he said, "we are many." “तुझे नाव काय?” येशूंनी विचारले, त्याने उत्तर दिले, “माझे नाव लेगियोन आहे, कारण आम्ही पुष्कळजण आहोत.
10 He kept begging him not to send them out of the region. आम्हाला या प्रांतातून घालवून देऊ नकोस,” अशी त्यांनी येशूंना पुन्हा विनंती केली.
11 Now a great herd of pigs was feeding there on the hillside. त्याचवेळी डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता.
12 And they begged him, "Send us to the pigs; let us enter them." “आम्हाला त्या डुकरांमध्ये जाण्याची परवानगी दे.” अशी भुतांनी येशूंना विनंती केली.
13 He gave permission. The unclean spirits came out and entered the pigs; the herd—about 2,000—rushed down the cliff into the sea and drowned in the sea. येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली, लगेच अशुद्ध आत्मे त्या मनुष्यातून बाहेर निघाले आणि डुकरांमध्ये शिरले व त्या दोन हजार डुकरांचा कळप डोंगराच्या उतरंडी वरून धावत सुटला आणि सरोवराच्या पाण्यात पडला व बुडाला.
14 The herders fled and told it in town and country; people came to see what happened. डुकरांचे कळप राखणारे जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात जाऊन ही घटना सांगितली, काय घडले हे पाहावे म्हणून लोक बाहेर आले.
15 They came to Jesus and saw the man who had been possessed by the demons, the one who'd had the legion, sitting there, dressed and thinking clearly—and they were afraid. जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले जो भुताच्या सैन्याने पछाडलेला होता तो बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले.
16 Eyewitnesses told them what had happened to the demon-possessed man, and about the pigs. प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले आणि डुकरांच्या बाबतीत काय झाले, ते सर्वांना सांगितले.
17 And they began to beg Jesus to leave their region. तेव्हा येशूंनी आमच्या भागातून निघून जावे अशी लोकांनी त्यांना विनंती केली.
18 As he was getting into the boat, the once-possessed man begged to be with him. येशू पुन्हा होडीत चढत असताना, जो मनुष्य पूर्वी भूतग्रस्त होता, त्याने आपल्यालाही बरोबर न्यावे, अशी येशूंना विनंती केली.
19 But Jesus refused, telling him instead, "Go home to your own people and tell them how much our Father has done for you, and how he has had mercy on you." पण येशूंनी ती मान्य केली नाही, परंतु ते त्याला म्हणाले, “आपल्या प्रियजनांकडे घरी जा आणि प्रभूने तुझ्यासाठी जे काही केले आणि तुझ्यावर किती मोठी दया केली हे त्यांना सांग.”
20 He went and began proclaiming in the Decapolis all Jesus had done for him, and everyone was amazed. त्याप्रमाणे तो मनुष्य गेला आणि त्या भागात असलेल्या दकापलीस येथे येशूंनी त्याच्यासाठी किती मोठ्या गोष्टी केल्या हे सांगू लागला आणि प्रत्येकजण विस्मयाने थक्क झाला.
21 When Jesus crossed again by boat to the other side, a large crowd gathered around him by the sea. जेव्हा येशू होडीत बसून पलीकडच्या तीरावर गेले, तेव्हा त्यांच्याभोवती खूप मोठा समुदाय गोळा झाला, त्यावेळी ते सरोवराच्या किनार्‍याजवळ होते.
22 One of the synagogue leaders, named Jairus, came, saw Jesus, and fell at his feet, त्यावेळी याईर नावाचा सभागृहाचा एक पुढारी आला, येशूंना पाहून त्यांच्या पाया पडला.
23 and begged him urgently, "My little daughter is dying. Come, lay your hands on her, so she may be healed and live." त्यांना आग्रहाने विनंती करू लागला, “माझी लहान मुलगी मरणाच्या पंथाला लागली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती बरी होईल व वाचेल.”
24 So Jesus went with him. And a great crowd followed him and pressed around him. म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. सभोवतालचा जमावही त्यांच्याबरोबर निघाला व गर्दी करू लागला.
25 And there was a woman with a discharge of blood that had gone on for twelve years. आणि तिथे एक स्त्री होती, जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती.
26 She had suffered much under many doctors, spent all she owned, gained nothing, and only grew worse. याकाळात तिने अनेक वैद्यांच्या उपचारांमुळे पुष्कळ दुःख सहन केले होते व ती कंगाल झाली होती आणि एवढे करूनही बरी न होता उलट तिचा आजार अधिकच बळावला होता.
27 Hearing about Jesus, she came up behind him in the crowd and touched his cloak. जेव्हा तिने येशूंबद्दल ऐकले, तेव्हा तिने मोठ्या गर्दीतून त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.
28 For she kept saying, "If I just touch his garments, I will be made well." “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन,” असे तिला वाटत होते.
29 Her flow of blood dried up instantly, and she felt in her body that she was healed of her suffering. तत्काळ तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण आजारातून मुक्त झालो आहोत याची तिला शरीरात जाणीव झाली.
30 At once Jesus, aware that power had left him, turned around in the crowd and asked, "Who touched my clothes?" तत्क्षणी येशूंनी आपल्यामधून शक्ती बाहेर पडली असे जाणले आणि समुदायाकडे मागे वळून त्यांनी विचारले, “माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला?”
31 His disciples said to him, "You see the crowd crushing you, yet you ask, 'Who touched me?'" “यावर त्यांचे शिष्य म्हणाले, एवढी मोठी गर्दी तुमच्याभोवती असताना तुम्ही विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’ ”
32 And he looked around to see who had done it. तरी आपल्याला कोणी स्पर्श केला, हे पाहण्यासाठी ते आजूबाजूला शोधू लागले.
33 But the woman, afraid and trembling, knowing what had happened to her, came, fell before him, and told him the whole truth. तेव्हा भयभीत झालेली ती स्त्री आपल्या बाबतीत काय घडले हे लक्षात घेऊन थरथर कापत आली आणि त्यांच्या पाया पडून तिने त्यांना सर्व खरे सांगितले.
34 He told her, "Daughter, your faith made you well. Go in peace, healed of your suffering." येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा आणि आपल्या पीडेपासून मुक्त राहा.”
35 While he was still speaking, people came from the synagogue leader's house, saying, "Your daughter has died. Why bother the Teacher any longer?" येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घरून काही लोक आले. ते म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे, आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.”
36 But Jesus overheard what they said and told the synagogue leader, "Don't fear, only believe." त्यांचे बोलणे ऐकून येशू सभागृहाच्या अधिकार्‍याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”
37 And he allowed no one to follow him except Peter, James, and John the brother of James. येशूंनी पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणासही बरोबर येऊ दिले नाही.
38 They came to the synagogue leader's house and Jesus saw chaos—people weeping, wailing loudly. ते सभागृहाच्या अधिकार्‍याच्या घरी आले, तेव्हा गडबड व उच्च स्वरात लोकांची रडारड, आक्रोश त्यांना दिसून आला.
39 Entering, he said to them, "Why this commotion and crying? The child isn't dead, just asleep." ते आत गेले आणि लोकांना म्हणाले, “हा गोंधळ आणि आक्रोश कशासाठी? ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.”
40 They laughed at him. But he sent them all out, took the child's father and mother and his companions, and entered where the child was. परंतु ते त्याला हसू लागले. त्या सर्वांना बाहेर घालविल्यावर, तिचे आईवडील आणि आपले शिष्य यांना घेऊन त्या बालिकेला ज्या खोलीत ठेवले होते तिथे गेले.
41 He took her hand and said to her, "Talitha koum," which means, "Little girl, I say to you, get up!" तिच्या हाताला धरून येशू तिला म्हणाले, “तलीथा कूम!” (म्हणजे “छोट्या मुली, मी तुला सांगतो, ऊठ!”)
42 At once the girl got up and walked—for she was twelve—and they were instantly overwhelmed with great amazement. ते ऐकताच ती उठून उभी राहिली आणि चालू फिरू लागली. तिचे वय बारा वर्षाचे होते. यावरून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले.
43 He strictly ordered them to tell no one of this, and said to give her something to eat. येशूंनी त्यांना कडक आदेश दिला की, याविषयी कोणाला सांगू नका व मुलीला काहीतरी खावयास द्यावे असे सांगितले.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]