Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Mark 1 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The beginning of the gospel of Jesus Christ, the Son of our Father. परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ.
2 As written in Isaiah the prophet: "Look, I send my messenger ahead of you, who will prepare your way. यशायाह संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन, तो तुझा मार्ग तयार करेल,”
3 A voice calling out in the wilderness: 'Prepare the way of the Lord, make his paths straight.'" “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ”
4 John appeared, baptizing in the wilderness and proclaiming a baptism of repentance for the forgiveness of sins. आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला.
5 All Judea and everyone in Jerusalem went out to him, and he baptized them in the Jordan River as they confessed their sins. यहूदीया प्रांतातील आणि सर्व यरुशलेमातील लोक त्याच्याकडे आले. त्यांनी पापे कबूल केल्यानंतर, यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा होत असे.
6 John was dressed in camel's hair, with a leather belt around his waist, eating locusts and wild honey. योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कापडाचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे.
7 He announced: "After me comes one stronger than I; I'm not worthy to stoop and untie his sandal strap. त्याचा संदेश हा होता: “माझ्यानंतर एकजण येत आहे, जे माझ्यापेक्षा फार सामर्थ्यवान आहेत व त्यांच्या पादत्राणाचे बंद सोडणारा एक गुलाम होण्याची सुद्धा माझी पात्रता नाही.
8 I have baptized you with water, but he will baptize you with the Holy Spirit." मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण ते तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करतील.”
9 In those days Jesus came from Nazareth of Galilee and was baptized by John in the Jordan. त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला.
10 Immediately, as he came up out of the water, he saw the heavens split open and the Holy Spirit come down on him like a dove. येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले
11 And a voice came from heaven: "You are my beloved Son; in you I delight." त्याचवेळी स्वर्गातून एक वाणी झाली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे.”
12 And immediately the Holy Spirit drove him out into the wilderness. नंतर लगेच पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात पाठविले,
13 He was in the wilderness forty days, tempted by Satan, with the wild animals, and the angels served him. रानात चाळीस दिवस असताना, सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. त्यांच्या सोबतीला जंगली प्राणी होते आणि देवदूतांनी त्यांची सेवा केली.
14 Now after John was arrested, Jesus came into Galilee, proclaiming the gospel of our Father, योहानाला बंदिवासात टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले.
15 and saying, "The time is fulfilled, and our Father's kingdom is near; repent and believe the good news." ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!”
16 Passing the Sea of Galilee, he saw Simon and his brother Andrew casting a net in the sea, for they were fishermen. एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते.
17 And Jesus said to them, "Follow me, and I will make you become fishers of people." येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.”
18 And immediately they left their nets and followed him. लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
19 Going a little farther, he saw James son of Zebedee and John his brother in their boat, mending the nets. थोडे पुढे जाताच, त्यांनी जब्दीचे पुत्र याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना होडीत बसून आपली जाळी तयार करताना पाहिले.
20 At once he called them; leaving their father Zebedee in the boat with the hired hands, they followed him. त्यांनी उशीर न करता त्यांना बोलाविले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले.
21 They went to Capernaum. At once, on the Sabbath, he entered the synagogue and began teaching. ते कफर्णहूम येथे गेले, आणि शब्बाथ आला तेव्हा सभागृहामध्ये जाऊन शिक्षण देण्यास सुरुवात केली.
22 They were amazed at his teaching, for he taught them with authority, not like the scribes. त्यांच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण ते नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे नव्हे तर ज्याला अधिकार आहे असे त्यांना शिकवीत होते.
23 And immediately there was in their synagogue a man with an unclean spirit, and he cried out. इतक्यात, सभागृहामध्ये अशुद्ध आत्म्याने पछाडलेला एक मनुष्य ओरडला,
24 Why meddle with us, Jesus of Nazareth? Have you come to destroy us? I know who you are—God's Holy One! “हे नासरेथकर येशू, तुम्हाला आमच्याशी काय काम? तुम्ही आमचा नाश करावयास आले काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन आहेस!”
25 But Jesus rebuked him, saying, "Be silent, and come out of him!" “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!”
26 And the unclean spirit, convulsing him and crying out with a loud voice, came out of him. त्या अशुद्ध आत्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला.
27 All were amazed, and they questioned each other: "What is this? A new teaching with authority - he commands even the unclean spirits, and they obey him!" हे पाहून सर्व लोक चकित झाले आणि आपसात म्हणू लागले, “हे काय आहे? नवी शिकवण आणि काय हा अधिकार! ते अशुद्ध आत्म्यांना आदेश करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.”
28 And at once his fame spread everywhere throughout all the surrounding region of Galilee. त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली.
29 Immediately he left the synagogue and went to Simon and Andrew's house, with James and John. सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले.
30 Now Simon's mother-in-law lay sick with a fever, and immediately they told him about her. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले.
31 He came, took her hand, raised her up. The fever left her, and she served them. येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली.
32 That evening, when the sun set, they brought him all who were sick and those oppressed by demons. त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले.
33 And the whole city was gathered together at the door. संपूर्ण शहर दारात गोळा झाले होते,
34 He healed many sick with various diseases and drove out many demons, not letting the demons speak, since they knew him. तेव्हा येशूंनी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांनी ग्रासलेल्या पुष्कळांना बरे केले व अनेक दुरात्म्यांना हाकलून दिले, परंतु दुरात्म्यांना बोलण्यास सक्त मनाई केली, कारण ते कोण आहेत, हे त्यांना माहीत होते.
35 Long before dawn, while still dark, he got up, went out to a deserted place, and prayed there. अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तिथे त्यांनी प्रार्थना केली.
36 And Simon and those who were with him searched for him, शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तिथे गेले.
37 and they found him and said to him, "Everyone is looking for you." ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहे!”
38 He said, "Let us go elsewhere, to the neighboring towns, so I can preach there too, for that is why I came." येशूंनी म्हटले, “आपण दुसरीकडे कुठेतरी आसपासच्या गावात जाऊ म्हणजे मला तिथे प्रवचन देता येईल कारण त्यासाठीच मी आलो आहे.”
39 And he went throughout all Galilee, preaching in their synagogues and casting out demons. मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले.
40 A man with leprosy came, knelt, and begged him, "If you're willing, you can make me clean." एक कुष्ठरोगी येशूंकडे आला आणि गुडघे टेकून विनंती करून म्हणाला, “तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”
41 Moved with deep compassion, he stretched out his hand, touched him, and said to him, "I am willing; be clean." येशूंना कळवळा आला. त्यांनी आपला हात लांब करून त्याला स्पर्श केला म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो!”
42 And immediately the leprosy left him, and he was made clean. त्याचा कुष्ठरोग निघून गेला आणि तो शुद्ध झाला.
43 Sternly warning him, he sent him away at once, येशूंनी त्याला निक्षून सांगितले:
44 and told him, "Make sure you tell no one—but go, show yourself to the priest, and offer what Moses commanded for your cleansing, as proof to the people." “पाहा हे कोणाला सांगू नकोस. परंतु जा, स्वतःस याजकाला दाखव आणि मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे, कुष्ठरोग बरे झाल्यानंतर जे अर्पण करावयाचे असते, ते कर, म्हणजे तू शुद्ध झाला आहेस याचे हे प्रमाण प्रत्येकाला पटेल.”
45 But he went out, proclaiming it freely and spreading the news, so Jesus could no longer enter a town openly, but stayed in lonely places. Yet people came to him from everywhere. याउलट, त्याने ही बातमी जाहीरपणे सांगून पसरविली की त्यामुळे येशूंना उघडपणे गावात प्रवेश करता येईना, म्हणून ते एकांतस्थळी राहिले. पण तिथेही चहूकडून लोक त्यांच्याकडे आले.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]