Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Luke 1 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Since many have undertaken to compile an ordered account of what has been accomplished among us. आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले.
2 Just as eyewitnesses from the beginning and servants of the word handed these accounts to us, या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्‍यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत.
3 I too, having traced everything accurately from the start, decided to write it in order for you, most excellent Theophilus, सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे.
4 so that you may know the certainty of the things you have been taught. यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.
5 In the days of Herod, king of Judea, a priest named Zechariah was in Abijah's priestly division. His wife Elizabeth descended from Aaron. यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्‍याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती.
6 They were both righteous before our Father, walking blamelessly in all his commandments and ordinances. दोघेही परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान असून प्रभूच्या आज्ञा व नियम पालन करण्यामध्ये निर्दोष होते.
7 But they had no child, because Elizabeth was barren, and both were very old. त्यांना मूलबाळ नव्हते, कारण अलीशिबा गर्भधारण करू शकत नव्हती आणि ती दोघेही खूप वयस्कर झालेली होती.
8 Now while he was serving as priest before our Father when his division was on duty, एकदा आपल्या गटाच्या अनुक्रमाने जखर्‍याह परमेश्वरापुढे याजक म्हणून सेवा करीत असताना,
9 by priestly custom, lot chose him to enter his sanctuary and burn incense. परमेश्वराच्या मंदिरात जाऊन धूप जाळण्यासाठी याजकांच्या रीतीप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली.
10 And the whole crowd of the people were praying outside at the hour of incense. आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते.
11 Then an angel of our Father appeared to him, standing at the right of the altar of incense. तेव्हा जखर्‍याहच्या समोर प्रभूचा एक दूत प्रगट झाला, तो धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा राहिला.
12 Zechariah was shaken when he saw him, and fear came over him. त्याला पाहताच जखर्‍याह चकित आणि भयभीत झाला.
13 The angel said to him, "Don't be afraid, Zechariah—your prayer has been heard. Your wife Elizabeth will bear you a son; name him John. पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्‍याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव.
14 You will have joy and gladness; many will rejoice at his birth. तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल.
15 He will be great before our Father, must never drink wine or other alcoholic drinks, and he will be filled with the Holy Spirit even from his mother's womb. तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.
16 And he will turn many of the children of Israel back to their Father. तो अनेक इस्राएली लोकांना प्रभू त्यांच्या परमेश्वराकडे परत घेऊन येईल.
17 He will go before our Father in Elijah's spirit and power, turning fathers' hearts to their children, and the disobedient to the wisdom of the righteous, to prepare a people ready for our Father." तो एलीयाहच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभूच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळवेल व अवज्ञा करणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल व लोकांना प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करेल.”
18 Zechariah said to the angel, "How will I know this? I'm old, and my wife is well along in years." जखर्‍याह देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वयस्क मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचेही वय होऊन गेले आहे.”
19 The angel answered him, "I am Gabriel, who stands in our Father's presence, sent to speak to you and bring you this good news. यावर देवदूत म्हणाला, “मी गब्रीएल आहे. मी प्रत्यक्ष परमेश्वराच्या समक्षतेत उभा असतो आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही शुभवार्ता तुला सांगण्यासाठी मला पाठविण्यात आले आहे,
20 And now you will be silent, unable to speak, until the day these things happen, because you did not believe my words, which will come true in their time." आणि आता हे पूर्ण होईल त्या दिवसापर्यंत तू मुका होशील व तुला बोलता येणार नाही, कारण नेमलेल्या समयी माझे शब्द खरे होतील या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाही.”
21 Meanwhile the people waited for Zechariah, wondering why he stayed so long in the sanctuary. इकडे लोक जखर्‍याहची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले.
22 When he came out, he could not speak to them, and they knew he had seen a vision in the sanctuary. He kept motioning to them and stayed mute. तो बाहेर आला तेव्हा त्याला त्यांच्याशी बोलता येईना. यावरून त्याने मंदिरात दृष्टान्त पाहिला असेल हे त्यांनी ओळखले, मात्र बोलू न शकल्यामुळे तो त्यांना खुणा करीत होता.
23 And when his days of service were ended, he went home. मग त्याच्या सेवाकार्याचा काळ संपला व तो घरी परतला.
24 After these days his wife Elizabeth became pregnant, and for five months she kept herself hidden, saying, त्यानंतर त्याची पत्नी अलीशिबा गर्भवती झाली आणि पाच महिने एकांतवासात राहिली.
25 "This is what our Father did for me, in the days he looked on me, to remove my disgrace among people." ती म्हणाली, “प्रभूने हे माझ्यासाठी केले आहे, या दिवसांमध्ये त्यांची कृपादृष्टी मजवर करून लोकांमध्ये होणारी माझी मानहानी दूर केली आहे.”
26 In month six our Father sent the angel Gabriel to a Galilee town called Nazareth, अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावात,
27 to a virgin engaged to a man named Joseph, of the house of David; the virgin's name was Mary. एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते.
28 And he came to her and said, "Greetings, favored one! Our Father is with you." गब्रीएल देवदूत मरीयेपुढे प्रगट झाला आणि तिला म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रिये, अभिवादन! प्रभू तुझ्याबरोबर आहेत.”
29 But she was greatly troubled by his words, and wondered what kind of greeting this might be. देवदूताच्या शब्दांनी मरीया फारच अस्वस्थ झाली आणि हे अभिवादन कशाप्रकारचे असावे, याविषयी ती विचार करू लागली.
30 The angel said to her, "Don't be afraid, Mary, for you have found favor with our Father. देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे.
31 You will conceive in your womb and bear a son, and you will call his name Jesus. तू गर्भधारण करून पुत्राला जन्म देशील आणि त्याचे नाव येशू ठेवावे.
32 He will be great and called Son of the Most High, and our Father will give him the throne of his father David, ते परमथोर होतील आणि त्यांना परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू परमेश्वर त्यांना त्यांचा पूर्वज दावीदाचे सिंहासन देतील.
33 and he will reign over Jacob's house forever; his kingdom will never end." ते याकोबाच्या संतानांवर सदासर्वकाळ राज्य करतील व त्यांच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”
34 And Mary said to the angel, "How will this be, since I am a virgin?" मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!”
35 The angel answered her, "The Holy Spirit will come over you, and the Most High's power will shadow you; so the holy child born will be called the Son of our Father. यावर देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर उतरेल आणि सर्वोच्च परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्यामुळे जो पवित्र पुत्र तुला होणार आहे त्यांना परमेश्वराचा पुत्र म्हणतील.
36 Look, your relative Elizabeth has also conceived a son in her old age—this is the sixth month for her called barren. तुझी नातलग अलीशिबा हिलासुद्धा तिच्या वृद्धापकाळात बाळ होणार आहे आणि जी गर्भधारणा करू शकत नव्हती, तिला आता सहावा महिना आहे.
37 For nothing will be impossible with our Father." कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही.”
38 Mary said, "I am the servant of our Father; let it happen to me as you said." Then the angel left her. मरीया म्हणाली, “मी प्रभूची दासी आहे, तुम्ही जे वचन मला दिले आहे त्याची पूर्तता होवो.” आणि मग देवदूत तिला सोडून गेला.
39 In those days Mary got up and hurried to the hill country, to a town in Judah, त्या दिवसात मरीया लगेच तयारी करून यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावाकडे घाईघाईने गेली.
40 and she entered the house of Zechariah and greeted Elizabeth. तिने जखर्‍याहच्या घरात प्रवेश करून अलीशिबेला अभिवादन केले.
41 When Elizabeth heard Mary's greeting, her baby leaped in her womb, and she was filled with the Holy Spirit. जेव्हा मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले, तेव्हा तिच्या गर्भाशयातील बालकाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली.
42 She cried out with a loud voice, "Blessed are you among women, blessed is the fruit of your womb! अलीशिबा मोठ्या आवाजात म्हणाली: “तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य आहेस आणि जे बाळ तुझ्या पोटी जन्म घेईल ते धन्य असो.
43 And why is this granted to me, that the mother of my Lord should come to me? परंतु माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे ही माझ्यावर किती मोठी कृपा आहे?
44 For the moment I heard your greeting, the baby in my womb leaped for joy. ज्या क्षणाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानाने ऐकला, त्याच क्षणाला बाळाने माझ्या गर्भात आनंदाने उडी मारली.
45 Blessed is she who believed that there would be a fulfillment of what our Father spoke to her." धन्य आहे ती, कारण प्रभूने तिला दिलेल्या वचनाची ते पूर्णता करतील असा तिने विश्वास ठेवला.”
46 And Mary said, "My soul magnifies our Father, मरीया म्हणाली: “माझा आत्मा प्रभूचे गौरव करतो
47 and my spirit rejoices in our Father, my Savior, माझा आत्मा माझ्या तारणार्‍या परमेश्वरामध्ये आनंद करतो,
48 for he has looked on the humble estate of his servant. For from now on all generations will call me blessed; कारण आता त्यांनी त्यांच्या दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे. यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.
49 for the Mighty One has done great things for me, and holy is his name. कारण ज्या सर्वशक्तिमान परमेश्वराने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत, त्यांचे नाव पवित्र आहे.
50 And his mercy is for those who fear him from generation to generation. त्यांचे भय बाळगणार्‍यांवर त्यांची करुणा एका पिढीपासून दुसर्‍या पिढीपर्यंत टिकून राहते.
51 He has shown strength with his arm; he has scattered the proud in the thoughts of their hearts; त्यांनी आपल्या बाहूने महान कार्य केले आहेत; जे अंतर्मनातील विचारांमध्ये गर्विष्ठ आहेत, त्यांना त्यांनी विखुरले आहे.
52 he has brought down the mighty from their thrones and lifted up the humble; त्यांनी शासकांना त्यांच्या सिंहासनावरून खाली आणले आहे. पण नम्रजनांस उच्च केले आहे.
53 he has filled the hungry with good things, and the rich he has sent away empty. भुकेल्यास त्यांनी उत्तम गोष्टींनी तृप्त केले आहे. परंतु श्रीमंतांना रिकामे पाठविले आहे.
54 He has helped his servant Israel, in remembrance of his mercy, त्यांचा सेवक इस्राएलास दयाळू ते असल्याचे आठवून त्याला साहाय्य पाठविले,
55 just as he spoke to our fathers, to Abraham and to his offspring forever." जसे आपल्या पूर्वजांना त्यांनी वचन दिले होते, ते अब्राहाम आणि त्यांच्या संततीवर सदासर्वकाळ राहील.”
56 And Mary remained with her about three months and then returned to her home. मरीया अलीशिबेजवळ सुमारे तीन महिने राहिली आणि नंतर ती तिच्या घरी परत गेली.
57 Now the time came for Elizabeth to give birth, and she bore a son. अलीशिबेच्या प्रसूतीची वेळ आली, तेव्हा तिने पुत्राला जन्म दिला.
58 Her neighbors and relatives heard our Father had shown her great mercy, and rejoiced with her. प्रभूने तिच्यावर किती मोठी दया दाखविली हे ऐकून तिचे शेजारी व नातेवाईक तिच्या आनंदात सामील झाले.
59 On the eighth day they came to circumcise the child, and were going to call him Zechariah after his father, मग आठव्या दिवशी जे बाळाची सुंता करण्यासाठी आले, ते त्याच्या वडिलांचे जखर्‍याह हेच नाव त्याला देणार होते,
60 but his mother answered, "No; he will be called John." पण त्याची आई अलीशिबा म्हणाली, “नाही, त्याचे नाव योहान आहे.”
61 And they said to her, "None of your relatives is called by this name." तेव्हा त्यांनी तिला म्हटले पण, “हे नाव तुमच्या नातलगात सापडत नाही.”
62 And they made signs to his father, asking what Zechariah wanted the child to be called. नंतर त्यांनी हातांनी खुणा करून त्याच्या वडिलांना, बाळाचे नाव काय ठेवायचे आहे असे विचारले.
63 He asked for a tablet and wrote, "His name is John." And everyone was amazed. वडिलांनी एक पाटी मागवून त्यावर, “त्याचे नाव योहान आहे” असे लिहिले आणि प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला.
64 And immediately his mouth was opened and his tongue loosed, and he spoke, blessing our Father. तत्क्षणी जखर्‍याहचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व परमेश्वराची स्तुती करू लागला.
65 Fear fell on all their neighbors, and all these things were talked about throughout Judea's hill country. आणि सर्व शेजारी भयभीत झाले व डोंगराळ यहूदीया प्रदेशात राहणारे, येथील सर्व गोष्टींविषयी बोलू लागले.
66 And all who heard kept these things in their hearts, saying, "What then will this child become?" For our Father's hand was with him. ज्या प्रत्येकाने याविषयी ऐकले व नवल करून म्हटले, “हा बालक पुढे कोण होणार?” कारण प्रभूचा हात त्याजबरोबर होता.
67 And his father Zechariah was filled with the Holy Spirit and prophesied, saying, नंतर बालकाचा पिता जखर्‍याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:
68 "Blessed be our Father of Israel, for he has visited and redeemed his people, “प्रभूची स्तुती करा! इस्राएलाच्या परमेश्वराची स्तुती करा, कारण ते आपल्या लोकांकडे आले आहेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी खंडणी भरली आहे.
69 and has raised up a mighty Savior for us in the house of his servant David, त्यांनी आपला सेवक दावीदाच्या घराण्यातून आपल्यासाठी तारणाचे शिंग उभारले आहे.
70 as he spoke through the mouth of his holy prophets long ago, जसे त्यांनी फार पूर्वी आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते—
71 that we should be saved from our enemies and from the hand of all who hate us; आमच्या शत्रूपासून आणि आमचा द्वेष करणार्‍या सर्वांच्या हातातून आमचा उद्धार करावा,
72 to show the mercy promised to our fathers and to remember his holy covenant, आमच्या पूर्वजांवर दया करावी आणि त्यांच्या पवित्र कराराची आठवण करावी.
73 the oath that he swore to our father Abraham, to grant us, आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले:
74 that we, being delivered from the hand of our enemies, might serve him without fear, आमच्या शत्रूंच्या हातून आमची सुटका करावी, आणि समर्थ होऊन निर्भयतेने त्यांची सेवा करावी,
75 in holiness and righteousness before him all our days. पवित्रपणाने आणि नीतिमत्त्वाने आमचे सर्व दिवस त्यांच्यासमोर घालवावेत.
76 And you, child, will be called the prophet of the Most High; for you will go before the Lord to prepare his ways, “आणि तू, माझ्या बाळा, तुला परात्पराचा संदेष्टा असे म्हणतील; कारण तू प्रभूच्या पुढे जाऊन त्यांचा मार्ग तयार करशील,
77 to give his people the knowledge of salvation through the forgiveness of their sins, त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे, त्याच्या लोकांना तारणाचे ज्ञान देशील.
78 because of the tender mercy of our Father, by which the sunrise from on high will visit us, कारण परमेश्वराच्या करुणेमुळे, आपल्यावर स्वर्गातून दिव्य प्रभातेचा उदय होण्याची वेळ आली आहे.
79 to give light to those who sit in darkness and in the shadow of death, to guide our feet into the way of peace." जे अंधारात जगत आहेत, जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि, आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”
80 The child grew, became strong in spirit, and lived in the wilderness until the day he appeared publicly to Israel. तो बालक वाढत गेला आणि आत्म्यात बलवान झाला व त्याची वाढ झाली आणि तो इस्राएली लोकांस जाहीरपणे प्रकट होईपर्यंत अरण्यात राहिला.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]