Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Leviticus 6 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Our Father spoke to Moses: याहवेह मोशेला म्हणाले:
2 "If anyone sins, unfaithful to your Father, by deceiving his neighbor about a deposit, a pledge, or stolen goods, or by cheating him, “जर कोणी त्याच्या शेजारच्या मनुष्यावर त्याने सोपविलेल्या काही गोष्टीबाबत फसवणूक करून किंवा त्याची काळजी न घेता किंवा काहीतरी चोरी करून किंवा त्यांच्या शेजार्‍याला फसवून याहवेहविरुद्ध विश्वासघात केला असेल, तर तो पाप करतो
3 or if he finds lost property and lies about it, swearing falsely—any such act by which a person sins. किंवा जर कोणाला हरवलेली वस्तू सापडली आणि त्याबद्दल ते खोटे बोलतील आणि तिच्याविषयी खोटी शपथ वाहतील किंवा जर लोकांनी केलेल्या अशा पापाबद्दल ते खोटे बोलतील,
4 When he sins and is guilty, he must return what he stole, or extorted, or the deposit entrusted to him, or the lost item he found, अशा कोणत्याही प्रकारे जर ते पाप करतील आणि त्यांच्या पापांची त्यांना जाणीव होईल, तेव्हा त्यांनी ती चोरलेली वस्तू किंवा बळजबरीने जे घेतले असेल ते किंवा जे काही त्यांच्यावर सोपविलेले असेल किंवा हरवलेली संपत्ती सापडल्यास ती परत करावी—
5 or whatever he swore falsely about, he must repay it in full, add a fifth to it, and give it to its owner on the day he admits his guilt. किंवा अशा कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांनी खोटी शपथ घेतली असेल तर, ज्या दिवशी दोषार्पण आणतील, त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या गुन्ह्याबद्दल वीस टक्के अधिक दंड म्हणून त्या वस्तूच्या मालकाला द्यावा.
6 He must bring his guilt offering to your Father: a ram without defect from the flock, at your valuation, as a guilt offering, to the priest. आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.
7 The priest will atone for him before your Father, and he'll be forgiven for whatever he did that made him guilty." याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”
8 Then our Father spoke to Moses: याहवेह मोशेला म्हणाले,
9 "Command Aaron and his sons: This is the law for the burnt offering. It stays on the altar's hearth all night until morning, and the altar fire must keep burning on it. “अहरोन आणि त्याच्या पुत्रांना अशी आज्ञा कर, होमार्पणासाठी पाळावयाचे नियम हे आहेत: होमार्पण रात्रभर वेदीवर ठेवून ते सकाळपर्यंत राहू द्यावे आणि त्या वेदीवरील अग्नी जळत ठेवावा.
10 The priest is to wear his linen garment, with linen undergarments against his skin, then remove the ashes left after the fire consumes the burnt offering on the altar, and place them beside the altar. नंतर याजकाने त्याची तागमिश्रित वस्त्रे, त्याचबरोबर त्याची अंतर्वस्त्रे अंगावर घालावी आणि वेदीवरील अग्नीत भस्म झालेली होमार्पणाची राख काढावी आणि ती वेदीच्या बाजूला ठेवावी.
11 Then he removes his garments, puts on others, and carries the ashes outside the camp to a clean place. मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी.
12 The altar fire must keep burning; it must not go out. Every morning the priest adds wood on it, arranges the burnt offering on it, and burns the fat of the peace offerings on it. वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा, तो विझू देऊ नये. तो पेटलेला ठेवण्यासाठी याजकाने रोज सकाळी वेदीवर लाकडे ठेवावी व त्यावर होमबली रचून शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या चरबीचे हवन करावे.
13 The fire must be kept burning on the altar continually; it must not go out. वेदीवरील अग्नी सतत पेटलेला ठेवावा; तो कधीही विझू देऊ नये.
14 "This is the law of the grain offering: Aaron's sons must bring it before your Father, in front of the altar. “अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे.
15 The priest takes a handful of the grain offering's fine flour and oil, with all its frankincense, and burns this memorial portion on the altar as a pleasing aroma to your Father. मग याजकांनी सुगंधी मसाले व जैतुनाचे तेल व धूप घ्यावा आणि मळलेला अन्नार्पणातील मूठभर सपीठ घ्यावे व संपूर्ण अर्पणाचा स्मरणभाग म्हणून वेदीवर त्याचे हवन करावे. हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असेल.
16 Aaron and his sons eat what remains; it must be eaten without yeast in a holy place, eaten in the courtyard of the tent of meeting. उर्वरित भाग अहरोन आणि त्याचे पुत्र खातील, परंतु त्यांनी ते खमीर न घालता पवित्रस्थानात खावे; त्यांनी ते सभामंडपाच्या अंगणात खावे.
17 Do not bake it with yeast. I've given it as their share of my food offerings, like the sin and guilt offerings; it is most holy. तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे.
18 Every male of Aaron's descendants may eat it—a lasting portion through your generations from your Father's food offerings. Whatever touches them becomes holy." अहरोनाच्या संतानांतील फक्त पुरुषांनी ते खावे आणि याहवेहला अर्पिलेला अन्नार्पणाचा हा भाग त्यांच्यासाठी पिढ्यान् पिढ्या कायमचा वाटा राहावा. जे कोणी यास स्पर्श करतील, ते पवित्र गणले जातील.”
19 Our Father said to Moses: याहवेह मोशेला हे देखील म्हणाले,
20 "This is Aaron and his sons' offering to your Father on the day he is anointed: about two quarts of fine flour as a regular grain offering, half in the morning, half in the evening. “ज्या दिवशी अहरोन व त्याच्या पुत्रांचा याजकीय सेवेसाठी अभिषेक होईल, त्या दिवशी त्यांनी एफाचा दहावा हिस्सा उत्तम सपीठ, अर्धे सकाळी व अर्धे सायंकाळी, अन्नार्पण म्हणून नेमाने याहवेहला अर्पावे.
21 Prepare it with oil on a griddle, bring it well-kneaded, present the grain offering in broken pieces—a pleasing aroma to your Father. ते अन्नार्पण तव्यावर तेलात चांगले परतावे आणि मग याहवेहला अर्पण म्हणून आणावे, कारण हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असे अर्पण आहे.
22 The anointed priest who succeeds him from among his sons must prepare it—a lasting decree before your Father: it must be burned completely. त्याच्या पुत्रांपैकी जो पुत्र त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून नियुक्त होईल तो ते तयार करेल. याहवेहचा हा वाटा सर्वकाळचा आहे आणि तो पूर्णपणे जाळून टाकावा.
23 Every grain offering of a priest is to be burned completely; it must not be eaten." याजकाचे प्रत्येक धान्यार्पण पूर्णपणे जाळून टाकले जाईल; ते खाऊ नये.”
24 Again our Father spoke to Moses: याहवेह मोशेला म्हणाले,
25 "Tell Aaron and his sons: this is the law of the sin offering: slaughter it before your Father, where the burnt offering is slaughtered; it is most holy. “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे.
26 The priest who offers it for sin must eat it; it must be eaten in a holy place, in the tent of meeting's courtyard. ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे.
27 Whatever touches its flesh becomes holy. If its blood spatters a garment, wash the spattered spot in a holy place. जे काही या मांसाला स्पर्श करेल ते पवित्र होईल आणि जर काही रक्त वस्त्रावर उडाले असेल, तर ते तुम्ही पवित्रस्थानी धुवावे.
28 The clay pot it is boiled in must be broken; if boiled in a bronze pot, it must be scoured and rinsed with water. ज्या मातीच्या पात्रात मांस शिजविले असेल, ते पात्र फोडून टाकावे पण तांब्याच्या पात्रात शिजविले असेल; तर ते पात्र घासून पाण्याने धुवावे.
29 Every male among the priests may eat it; it is most holy. याजकीय घराण्यातील कोणीही पुरुष ते खाऊ शकतात; ते परमपवित्र आहे.
30 No sin offering whose blood is brought into the tent of meeting to atone in the Holy Place may be eaten; it must be burned with fire." परंतु कोणतेही पापार्पण, ज्याचे रक्त पवित्रस्थानात प्रायश्चित्त करण्यासाठी सभामंडपात आणले जाते ते खाऊ नये; ते जाळून टाकावे.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]