Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Genesis 46 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 So Israel set out with all he had, came to Beersheba, and sacrificed to our Father, whom his father Isaac had worshiped. अशा रीतीने इस्राएल आपले सर्वस्व घेऊन निघाला आणि बेअर-शेबा येथे पोहोचल्यावर त्याने आपला पिता इसहाक याच्या परमेश्वराला अर्पणे वाहिली.
2 And our Father spoke to Israel in visions of the night, "Jacob, Jacob." He said, "Here I am." त्या रात्री परमेश्वराने इस्राएलला स्वप्नात दर्शन दिले व त्याला म्हटले, “याकोबा! याकोबा!” याकोब म्हणाला, “काय आज्ञा?”
3 He said, "I am your Father, whom your father worshiped. Do not be afraid to go down to Egypt, for there I will make you a great nation. परमेश्वराने म्हटले, “मी परमेश्वर, मी तुझ्या पित्याचा परमेश्वर आहे; खाली इजिप्त देशात जाण्यास भिऊ नको, कारण तिथे मी तुझे एक मोठे राष्ट्र करेन.
4 I myself will go down with you to Egypt, and I will surely bring you back; and Joseph's own hand will close your eyes." मी स्वतः तुझ्याबरोबर खाली इजिप्तला जाईन, आणि तुला तिथून निश्चितच परत आणेन. योसेफाचे हात तुझे डोळे बंद करतील.”
5 Jacob set out from Beersheba. Israel's sons carried their father Jacob, their little ones, and their wives in the wagons Pharaoh had sent for him. तेव्हा याकोब बेअर-शेबाहून निघाला; त्याला नेण्यासाठी फारोहने पाठविलेल्या गाड्यांमधून इस्राएलाच्या पुत्रांनी, त्याला व आपल्या पत्नींना आणि मुलांबाळांना इजिप्तमध्ये आणले.
6 They took their livestock and the goods they had acquired in the land of Canaan, and came to Egypt—Jacob and all his offspring with him. मग याकोब त्याची सर्व संतती आणि आपली गुरे व कनान देशामध्ये मिळविलेली संपत्ती घेऊन इजिप्तला गेला.
7 His sons and grandsons, daughters and granddaughters—all his offspring he brought with him to Egypt. याप्रमाणे याकोबाने त्याचे पुत्र, नातवंडे आणि त्याच्या मुली आणि नातवंडांना—त्याची सर्व संतती इजिप्तमध्ये आणली.
8 These are the names of Israel's sons who came into Egypt—Jacob and his sons: Reuben, Jacob's firstborn. इजिप्तला गेलेल्या इस्राएलाच्या पुत्रांची (याकोब आणि त्याचे वंशज) ही नावे आहेत: रऊबेन हा याकोबाचा प्रथम जन्मलेला.
9 The sons of Reuben: Hanoch, Pallu, Hezron, and Carmi. रऊबेनाचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.
10 The sons of Simeon: Jemuel, Jamin, Ohad, Jachin, Zohar, and Shaul the son of a Canaanite woman. शिमओनाचे पुत्र: यमुवेल, यामीन, ओहाद, याखीन, जोहर आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.
11 The sons of Levi: Gershon, Kohath, and Merari. लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
12 Judah's sons: Er, Onan, Shelah, Perez, Zerah; but Er and Onan died in Canaan. Perez's sons: Hezron and Hamul. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.
13 The sons of Issachar: Tola, Puvah, Iob, and Shimron. इस्साखारचे पुत्र: तोला, पुवाह, योब व शिम्रोन.
14 The sons of Zebulun: Sered, Elon, and Jahleel. जबुलूनाचे पुत्र: सेरेद, एलोन व याहलेल हे होते.
15 These are Leah's sons, born to Jacob in Paddan-aram, with his daughter Dinah; his sons and daughters numbered thirty-three. म्हणजे याकोब आणि लेआ यांची सर्व संतती मिळून तेहतीस होती. यातच त्यांना पद्दन-अराम येथे झालेली कन्या दीना हिचाही समावेश आहे.
16 The sons of Gad: Ziphion, Haggi, Shuni, Ezbon, Eri, Arodi, and Areli. गादाचे पुत्र: सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी, अरोदी व अरेली.
17 Asher's sons: Imnah, Ishvah, Ishvi, Beriah, and their sister Serah. Beriah's sons: Heber and Malchiel. आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह; त्यांची बहीण सेराह. बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल.
18 These are the sons of Zilpah, whom Laban gave to his daughter Leah; she bore these to Jacob—sixteen in all. हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले.
19 The sons of Rachel, Jacob's wife: Joseph and Benjamin. याकोबाची पत्नी राहेल हिचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन.
20 Manasseh and Ephraim were born to Joseph in Egypt by Asenath, daughter of Potiphera, priest of On. योसेफाचे पुत्र मनश्शेह व एफ्राईम हे इजिप्तमध्ये ओन नगरचा याजक पोटीफेरा याची कन्या आसनथपासून जन्मले.
21 The sons of Benjamin: Bela, Becher, Ashbel, Gera, Naaman, Ehi, Rosh, Muppim, Huppim, and Ard. बिन्यामीनचे पुत्र: बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम व आर्द हे होते.
22 These are the sons of Rachel who were born to Jacob—fourteen persons in all. हे चौदाजण म्हणजे याकोब व राहेल यांची संतती होती.
23 The sons of Dan: Hushim. दानचा पुत्र: हुशीम.
24 The sons of Naphtali: Jahzeel, Guni, Jezer, and Shillem. नफतालीचे पुत्र: याहसेल, गूनी, येसेर आणि शिल्लेम.
25 These are Bilhah's sons, whom Laban gave to his daughter Rachel; she bore these to Jacob—seven in all. लाबानाने आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिलेली स्त्री बिल्हा हिच्यापासून याकोबाला सात पुत्र झाले.
26 Jacob's direct descendants who came to Egypt—excluding his sons' wives—totaled sixty-six. याप्रमाणे याकोबाच्या पुत्राच्या स्त्रियांच्या व्यतिरिक्त इजिप्तमध्ये गेलेल्या त्याच्या संतानात एकूण सहासष्ट व्यक्ती होत्या.
27 Joseph had two sons born in Egypt. Jacob's household that came to Egypt numbered seventy in all. योसेफाला इजिप्तमध्ये झालेल्या दोन पुत्रांचा यामध्ये समावेश केला तर इजिप्तमध्ये आलेल्या याकोबाच्या कुटुंबाचे एकूण सत्तरजण होते.
28 Jacob sent Judah ahead to Joseph to lead the way to Goshen; they reached the land of Goshen. याकोबाने गोशेनला जाण्याचा मार्ग विचारण्याकरिता यहूदाहला त्यांच्या पुढे योसेफाकडे पाठविले. मग जेव्हा ते गोशेन प्रांतात पोहोचले,
29 Joseph readied his chariot and went up to Goshen to meet his father Israel. He appeared to him, fell on his neck, and wept on his neck a long time. योसेफाने आपला रथ तयार केला आणि आपला पिता इस्राएल यांना भेटण्याकरिता गोशेन प्रांतात गेला. भेट होताच त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते बराच वेळ रडले.
30 Israel said to Joseph, "Now let me die, since I've seen your face and you're still alive." मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “आता मला खुशाल मरण येवो, कारण तू जिवंत आहेस हे मी स्वतः पाहिले आहे.”
31 Joseph told his brothers and his father's household, "I will go up and tell Pharaoh, and say to him, 'My brothers and my father's household, who were in Canaan, have come to me. योसेफ आपल्या भावांना आणि पित्याच्या कुटुंबातील सर्वांना म्हणाला, “मी वर जाऊन फारोहला सांगेन की, ‘माझे भाऊ व माझ्या पित्याचे संपूर्ण कुटुंब कनान देशातून मजकडे आले आहेत.
32 The men are shepherds, for they have been keepers of livestock; they've brought their flocks, herds, and all they have.' मी त्याला सांगेन, हे मेंढपाळ आहेत; त्यांनी त्यांच्याबरोबर आपली शेरडेमेंढरे, गुरे व त्यांचे सर्वस्व आणले आहे.’
33 When Pharaoh calls you and says, 'What is your occupation?' म्हणून फारोह जेव्हा तुम्हाला बोलावून विचारेल, ‘तुमचा व्यवसाय काय आहे?’
34 you will say, 'Your servants have raised livestock from our youth until now, we and our fathers,' so you may settle in Goshen; for every shepherd is detestable to the Egyptians." तेव्हा तुम्ही असे उत्तर द्यावे, ‘आमच्या वडीलांप्रमाणे तुझ्या सेवकांनी लहानपणापासून गुरे पाळली आहेत.’ म्हणजे तो तुम्हाला येथेच गोशेन प्रांतात राहू देईल, कारण इजिप्तमध्ये मेंढपाळांना तुच्छ मानले जाते.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]