Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Exodus 15 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

मोशे व मिर्यामचे गीत

1नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले:“मी याहवेहला गीत गाईन,कारण ते अत्युच्च आहेत.घोडे व त्यांचे स्वारत्यांनी समुद्रात फेकले आहेत.

2“याहवेह माझे सामर्थ्य व माझे संरक्षण आहेत;याहवेह माझे तारण झाले आहेत.तेच माझा परमेश्वर आहेत आणि मी त्यांची स्तुती करेन,माझ्या पूर्वजांचे परमेश्वर, मी त्यांचा महिमा वर्णीन.

3याहवेह योद्धा आहेत;याहवेह त्यांचे नाव आहे.

4फारोहचे रथ व सैन्यत्यांनी समुद्रात उलथून टाकले.फारोहचे सर्वोत्तम अधिकारीतांबड्या समुद्रात बुडून गेले.

5खोल पाण्याने त्यांना झाकून टाकले;दगडाप्रमाणे ते खोल तळाशी बुडून गेले.

6हे याहवेह, तुमचा उजवा हात,सामर्थ्याने ऐश्वर्यमान आहे.हे याहवेह तुमच्या उजव्या हाताने,शत्रूला हादरून टाकले.

7“तुमच्या ऐश्वर्याच्या महानतेनेतुमच्या विरोधकांना तुम्ही खाली पाडले.स्वैर सोडलेल्या तुमच्या क्रोधाने;भुशाप्रमाणे त्यांना भस्म केले.

8तुमच्या नाकपुड्यांच्या श्वासानेजले एकत्र आली.पाण्याचे प्रवाह भिंतीप्रमाणे उभे राहिले;डोहातील पाणी समुद्राच्या मध्यभागी गोळा झाले.

9शत्रूने फुशारकी मारीत म्हटले,‘मी पाठलाग करून त्यांच्यावर मात करेन.मी लूट वाटून घेईन;त्यांच्या जिवावर मी तृप्त होईन.मी माझी तलवार उपसेनआणि माझ्या हाताने त्यांचा नाश होईल.’

10पण तुम्ही आपला श्वास फुंकला,आणि समुद्राने त्यांना झाकून टाकले.ते शीसाप्रमाणेमहाजलात बुडून गेले.

11सर्व दैवतांमध्येहे याहवेह तुमच्यासारखे कोण आहे?पवित्रतेत ऐश्वर्यमान;वैभवात अद्वितीय,आश्चर्यकर्मे करणारे,असे तुमच्यासारखे कोण आहे?”

12तुम्ही आपला उजवा हात उगारला,आणि पृथ्वीने तुमच्या शत्रूंना गिळून टाकले.

13तुम्ही उद्धारलेल्या लोकांनाआपल्या प्रेमदयेने चालविणार.आपल्या सामर्थ्याने तुम्ही त्यांनातुमच्या पवित्र निवासस्थानाकडे घेऊन जाणार.

14राष्ट्रे हे ऐकून थरथर कापतील;पलिष्टी भीतीने ग्रासून जातील.

15एदोमाचे अधिकारी घाबरून जातील,मोआबाचे पुढारी थरथर कापू लागतील,कनानातील लोक वितळून जातील;

16तुमच्या बाहूच्या पराक्रमामुळेभीती व दहशत त्यांच्यावर येऊन पडेल.तुमचे लोक पार करेपर्यंत, हे याहवेह,जे लोक तुम्ही खंडून घेतले आहेत, ते पार होईपर्यंतते दगडाप्रमाणे स्तब्ध राहतील.

17तुम्ही त्यांना आत,तुमच्या वतनाच्या पर्वतावर आणून रोपणार;तेच ठिकाण याहवेह, जे तुम्ही आपल्या निवासासाठी तयार केले,ते पवित्रस्थान जे, हे प्रभू, तुमच्या हातांनी प्रस्थापित केले.

18याहवेह सदासर्वकाळराज्य करतील.

19जेव्हा फारोहचे घोडे, रथ आणि घोडेस्वार समुद्रामध्ये गेले, तेव्हा याहवेहने समुद्राचे पाणी परत त्यांच्यावर आणले; परंतु इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या वाटेवरून चालले. 20तेव्हा अहरोनाची बहीण, मिर्याम संदेष्टी, हिने हातात डफ घेतला आणि सर्व स्त्रिया तिच्यामागे हातात डफ घेऊन नाचू लागल्या. 21मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले:“याहवेहप्रीत्यर्थ गीत गा,कारण ते अत्युच्च आहेत.घोडे व त्यांचे स्वारत्यांनी समुद्रात बुडवून टाकले आहेत.”

मारा व एलीम येथील पाणी

22मग मोशेने इस्राएली लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे शूर नावाच्या रानात आणले. तीन दिवसांच्या रानातील त्यांच्या प्रवासात त्यांना पाणी मिळाले नाही. 23मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.) 24“आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.

25तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले. त्या ठिकाणी याहवेहने त्यांना पारखण्यासाठी नियम व सूचना दिल्या.

26ते म्हणाले, “जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा आहे.”

27मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]