Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 Chronicles 9 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 All Israel was registered by genealogy, recorded in the Book of the Kings of Israel. And Judah was exiled to Babylon for their unfaithfulness. याप्रकारे सर्व इस्राएली लोकांच्या वंशावळ्या इस्राएलच्या व यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेल्या आहेत; या लोकांच्या अविश्वासूपणामुळे त्यांना बंदिवान करून बाबिलोन देशी नेले.
2 The first to resettle their own property in their cities were Israel, the priests, the Levites, and the temple servants. जे सर्वप्रथम स्वतःच्या वतनातील आपल्या नगरात राहण्यास आले, त्यातील काही इस्राएली, याजक, लेवी व मंदिराचे सेवक होते.
3 And in Jerusalem lived some of the people of Judah, of Benjamin, and of Ephraim and Manasseh: यहूदाह, बिन्यामीन, एफ्राईम व मनश्शेह यांच्यापैकी जे यरुशलेममध्ये राहण्यास आले:
4 Uthai son of Ammihud son of Omri son of Imri son of Bani, of the sons of Perez son of Judah. ऊथय जो अम्मीहूदाचा पुत्र, जो ओमरीचा पुत्र, जो इम्रीचा पुत्र व जो बानीचा पुत्र, हा यहूदाहचा पुत्र पेरेसचा वंशज होता.
5 And of the Shilonites: Asaiah the firstborn, and his sons. शिलोनी वंश: त्याचा ज्येष्ठपुत्र असायाह व त्याचे पुत्र.
6 From Zerah's sons: Jeuel and their relatives, 690. जेरही वंश: यऊवेल. यहूदाहचे 690 लोकही आले.
7 And of Benjamin's sons: Sallu son of Meshullam, son of Hodaviah, son of Hassenuah, बिन्यामीन वंशातून: सल्लू जो मशुल्लामाचा पुत्र, जो होदव्याहचा पुत्र व जो हस्सनुआहाचा पुत्र;
8 Ibneiah son of Jeroham; Elah son of Uzzi son of Michri; Meshullam son of Shephatiah son of Reuel son of Ibnijah, इबनीयाह जो यरोहामाचा पुत्र; एलाह जो उज्जी पुत्र, जो मिकरीचा पुत्र; मशुल्लाम जो शफाट्याहचा पुत्र, जो रऊएलाचा पुत्र व जो इबनीयाहचा पुत्र;
9 and their relatives, listed by family line, 956. All these were heads of their ancestral families. वंशावळीत नोंद झालेल्या बिन्यामीन लोकांची एकूण संख्या 956 होती. हे सर्व लोक कुटुंबप्रमुख होते.
10 And of the priests: Jedaiah, Jehoiarib, Jachin, याजकातील: यदायाह; यहोयारीब; याखीन;
11 and Azariah son of Hilkiah, son of Meshullam, son of Zadok, son of Meraioth, son of Ahitub, chief officer of our Father's house. अजर्‍याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता;
12 Adaiah son of Jeroham, of Pashhur, of Malchijah; and Maasai son of Adiel, of Jahzerah, of Meshullam, of Meshillemith, of Immer; अदायाह याजकही परतला. तो यरोहामाचा पुत्र जो पशहूराचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र होता; मआसाई जो अदिएलाचा पुत्र, जो यहजेराचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो मेशिल्लेमीथाचा पुत्र, जो इम्मेराचा पुत्र.
13 and their relatives—heads of their families—1,760, capable men for serving in the house of our Father. जे कुटुंबप्रमुख होते, त्या 1,760 याजकांची नोंद झाली. परमेश्वराच्या मंदिराच्या सेवाकार्यास हे पुरुष जबाबदार होते.
14 Of the Levites: Shemaiah son of Hasshub, son of Azrikam, son of Hashabiah, of the sons of Merari, लेवींमधून: शमायाह जो हश्शूबचा पुत्र, जो अज्रीकामचा पुत्र, जो हशब्याहाचा पुत्र. हे मरारी वंशाचे होते;
15 and Bakbakkar, Heresh, Galal, and Mattaniah son of Mica, son of Zichri, son of Asaph; बकबक्कार, हेरेश, गालाल, आणि मत्तन्याह जो मीखाहचा पुत्र, जो जिक्रीचा पुत्र, जो आसाफचा पुत्र;
16 and Obadiah son of Shemaiah, son of Galal, son of Jeduthun, and Berechiah son of Asa, son of Elkanah, who lived in the villages of the Netophathites. ओबद्याह जो शमायाहचा पुत्र, जो गालालचा पुत्र, जो यदूथूनचा पुत्र; जो बेरेख्याहचा पुत्र, जो आसाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो नटोफाथीच्या वस्तीत राहत असे.
17 The gatekeepers: Shallum, Akkub, Talmon, Ahiman, and their relatives; Shallum was chief. द्वारपाल: शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान व त्यांचे लेवी भाऊबंद. शल्लूम त्यांचा प्रमुख होता;
18 To this day they stand at the King's Gate, on the east side. These were the gatekeepers of the Levite camps. आजवर ते राजाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर कार्यरत आहेत; लेवींच्या छावणीचे द्वारपाल हेच होते.
19 Shallum son of Kore, of Ebiasaph, of Korah, and his relatives of his father's house, the Korahites, oversaw the work of service, guarding the tent's thresholds; their fathers oversaw the camp of our Father, guarding the entrance. शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत.
20 Phinehas son of Eleazar was leader over them formerly; our Father was with him. पूर्वीच्या काळी एलअज़ारचा पुत्र फिनहास या सर्वांवर द्वारपालांचा अधिकृत अधिकारी होता. याहवेहचे सानिध्य त्यांच्याबरोबर होते.
21 Zechariah the son of Meshelemiah was gatekeeper at the entrance of the tent of meeting. मशेलेम्याहचा पुत्र जखर्‍याह सभामंडपाचा द्वारपाल होता.
22 All of them, chosen as gatekeepers of the gates, numbered 212, registered by genealogy in their villages. David and Samuel the seer had appointed them to this trusted office. द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते.
23 They and their sons guarded the gates of the house of our Father, the house of the tent, as guards. ते व त्यांचे वंशज याहवेहच्या भवनाच्या म्हणजे सभामंडपाच्या द्वारपालाचे काम पाहत असत.
24 The gatekeepers were posted on the four sides: east, west, north, and south. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना द्वारपाल ठेवण्यात आले होते.
25 Their relatives in their villages were to come every seven days, from time to time, to be with them. त्यांच्या गावात राहणारे त्यांचे भाऊबंद सात दिवसात पाळीपाळीने कार्य करीत.
26 The four chief gatekeepers, Levites, were entrusted with the chambers and treasuries of the house of our Father. परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती.
27 They stayed the night around our Father's house, since the guard duty was theirs, and the opening, morning by morning. परमेश्वराच्या भवनाचे रक्षण त्यांच्याकडे सोपविले असल्यामुळे रात्री ते मंदिराच्या आसपास राहत असत आणि दररोज सकाळी परमेश्वराचे भवन उघडण्यासाठी चावी त्यांच्याच ताब्यात असे.
28 Some were in charge of the service vessels, counting them in and out. सेवेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काहीजणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते मोजून आत ठेवीत व मोजून बाहेर काढीत.
29 Others were in charge of the furnishings, sacred utensils, fine flour, wine, oil, incense, and spices. त्यांच्यापैकी काहीजणांकडे सामानसुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये यांची व्यवस्था असे.
30 And some of the priests' sons blended the spices. याजकांपैकी काहीजण सुगंधी मसाले तयार करीत असत.
31 Mattithiah, one of the Levites, firstborn of Shallum the Korahite, was in charge of baking the flat cakes. तव्यावर विश्वासयोग्यतेने ज्या वस्तू भाजण्यात येत, त्यावर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी कोरही शल्लूमचा ज्येष्ठपुत्र मत्तिथ्याहला नेमले.
32 Some Kohathite relatives were responsible for preparing the rows of bread every Sabbath. कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती.
33 These singers, heads of Levite families, stayed in the temple chambers, exempt from other duties—on duty day and night. काही लेवी कुटुंबप्रमुख जे मंदिरातील संगीतासाठी जबाबदार होते, ते मंदिराच्या काही खोल्यात राहत असत आणि त्यांना संगीताशिवाय इतर कामे नव्हती, कारण त्या कामाची त्यांना रात्रंदिवस जबाबदारी देण्यात आली होती.
34 These were heads of Levite families, leaders listed by family line; and they lived in Jerusalem. हे सर्व लेवी वंशातील कुटुंबप्रमुख असून त्यांची प्रमुख म्हणून वंशावळीत नोंद झाली होती, ते यरुशलेमात राहात.
35 In Gibeon lived Jeiel the father of Gibeon, and the name of his wife was Maacah, गिबोनचा पिता ईयेल गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह होते.
36 and his firstborn son was Abdon, then Zur, Kish, Baal, Ner, Nadab, त्याच्या पुत्रांची नावे अशी: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब,
37 Gedor, Ahio, Zechariah, and Mikloth. गदोर, अहियो, जखर्‍याह आणि मिकलोथ.
38 Mikloth fathered Shimeam; they too lived with their relatives in Jerusalem, opposite their relatives. मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली.
39 And Ner fathered Kish, Kish fathered Saul, and Saul fathered Jonathan, Malchi-shua, Abinadab, and Esh-baal. नेराला कीश झाला; कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले.
40 And the son of Jonathan was Merib-baal, and Merib-baal fathered Micah. योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल. मरीब-बाल याला मीखाह.
41 The sons of Micah: Pithon, Melech, Tahrea, and Ahaz. मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तहरेया व आहाज.
42 And Ahaz fathered Jarah, and Jarah fathered Alemeth, Azmaveth, and Zimri; and Zimri fathered Moza. आहाजास येरह, यादाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री झाले, जिम्रीस मोसा.
43 And Moza fathered Binea, and Rephaiah was his son, Eleasah his son, and Azel his son. मोसाला बिना, बिनाला रफायाह, रफायाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले.
44 Azel had six sons, named Azrikam, Bocheru, Ishmael, Sheariah, Obadiah, and Hanan—these were Azel's sons. आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र होते.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]