Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 Chronicles 5 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The sons of Reuben, Israel's firstborn—he was indeed the firstborn, but since he violated his father's bed, his birthright went to the sons of Joseph son of Israel, so he could not be listed as the firstborn in the genealogy. रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.
2 Though Judah grew strong among his brothers and a ruler came from him, the birthright was Joseph's. जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला.
3 The sons of Reuben the firstborn of Israel: Hanoch, Pallu, Hezron, and Carmi. इस्राएलचा ज्येष्ठपुत्र रऊबेनचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.
4 The sons of Joel: Shemaiah his son, Gog his son, Shimei his son, योएलाचे वंशज: त्याचा पुत्र शमायाह, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी,
5 Micah his son, Reaiah his son, Baal his son, शिमीचा पुत्र मीखाह, त्याचा पुत्र रेआयाह, त्याचा पुत्र बाल,
6 and Beerah his son, whom Tiglath-pileser king of Assyria exiled—he led the Reubenites. बालाचा पुत्र बैरा रऊबेन वंशाचा सरदार असून त्याला अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ने कैद करून नेले.
7 His relatives by their clans, as listed in the genealogical records: Jeiel the chief, Zechariah, त्याच्या भावांची वंशावळी त्यांच्या कुळांप्रमाणे लिहिली ती अशी: प्रमुख ईयेल, जखर्‍याह,
8 and Bela son of Azaz, son of Shema, son of Joel. They settled in Aroer, to Nebo and Baal-meon. बेलाचा पिता आजाजचा पिता शमा व त्याचा पिता योएल. हा वंश नबो व बआल-मेओन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला.
9 They also settled eastward to the edge of the desert that stretches to the Euphrates, since their livestock had multiplied in Gilead. पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते.
10 In Saul's days they fought the Hagrites, who fell to them; they lived in the Hagrites' tents across the whole region east of Gilead. शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्‍यात ते वस्ती करू लागले.
11 The sons of Gad lived next to them in the land of Bashan as far as Salcah: गादाचे वंशज त्यांच्यासमोर सलेकाह येथवर बाशान प्रदेशात राहत होते:
12 Joel the chief, Shapham the second-in-command, then Janai and Shaphat in Bashan. त्यात योएल प्रमुख होता व दुसरा शाफाम, याखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते.
13 Their relatives, by their fathers' households, were Michael, Meshullam, Sheba, Jorai, Jacan, Zia, and Eber—seven. त्यांच्या पितृकुळाप्रमाणे त्यांचे बांधव: मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर; असे सर्व मिळून सात.
14 These were sons of Abihail son of Huri, son of Jaroah, son of Gilead, son of Michael, son of Jeshishai, son of Jahdo, son of Buz. अबीहाईल हूरीचा पुत्र, जो दूरीचा पुत्र, जो यारोहचा पुत्र, जो गिलआदाचा पुत्र, जो मिखाएलचा पुत्र, जो यशीशायचा पुत्र, जो यहदोचा पुत्र, जो बूजचा पुत्र.
15 Ahi son of Abdiel, son of Guni, was the head of their fathers' households. अही जो अबदीएलचा पुत्र, जो गूनीचा पुत्र हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख होता.
16 They lived in Gilead, in Bashan and its villages, and across all Sharon's pasturelands to their borders. गादचे लोक गिलआदात व बाशानात व तेथील गावात आणि शारोनच्या शिवारात आपल्या सीमेत वस्ती करून राहिले.
17 All these were listed in genealogies during the reigns of Jotham king of Judah and Jeroboam king of Israel. या सर्वांची वंशावळी यहूदीयाचा राजा योथाम व इस्राएलचा राजा यरोबोअम यांच्या कारकिर्दीत संग्रहित करण्यात आली होती.
18 The Reubenites, Gadites, and half-tribe of Manasseh had capable men bearing shield and sword, drawing the bow, trained for war—44,760 ready for battle. रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे.
19 They waged war against the Hagrites, and against Jetur, Naphish, and Nodab. त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले.
20 They were helped against them; the Hagrites and all their allies were given into their hand, because they cried out to our Father in battle. He answered them, for they trusted in him. त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली.
21 They captured the Hagrites' livestock: 50,000 camels, 250,000 sheep, 2,000 donkeys, and 100,000 people. त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले.
22 Many fell dead, for the battle was our Father's; they lived there until the exile. बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.
23 Manasseh's half-tribe lived in the land, growing numerous from Bashan to Baal-hermon, Senir, and Mount Hermon. मनश्शेहच्या अर्ध्या वंशातील लोक असंख्य होते. त्यांनी बाशानपासून बआल-हर्मोन, सनीरपर्यंत (हर्मोन पर्वत) वस्ती केली.
24 Heads of their fathers' households: Epher, Ishi, Eliel, Azriel, Jeremiah, Hodaviah, and Jahdiel—mighty warriors, famous men, heads of their fathers' households. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पुरुष: एफेर, इशी, एलीएल, अज्रीएल, यिर्मयाह, होदव्याह व यहदीएल. हे महावीर व नामांकित पुरुष असू कुलप्रमुख होते.
25 But they were unfaithful to their ancestors' God and prostituted themselves to the gods of the land's peoples, whom our Father had destroyed before them. ते आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराशी अविश्वासू झाले आणि परमेश्वराने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता, त्यांच्या दैवतांच्या नादी लागून ते व्यभिचारी बनले.
26 So our Father of Israel stirred up the spirit of Pul king of Assyria—Tiglath-pileser king of Assyria—and he exiled the Reubenites, Gadites, and half-tribe of Manasseh to Halah, Habor, Hara, and the river Gozan, where they remain to this day. यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]