Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 Chronicles 4 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

यहूदाहची इतर कुळे

1यहूदाहचे वंशज: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर व शोबाल.

2शोबालचा पुत्र रेआयाहला यहथ, यहथाला अहूमय व लाहाद झाला, ही सोराथी कुळे होत.

3एटामाचे पुत्र: येज्रील, इश्मा, इद्बाश व त्यांची बहीण हस्सलेलपोनी होती.

4पेनुएल गदोरचा पिता होता, आणि एजेरला हूशा झाला. हूरचे वंशज: ज्येष्ठपुत्र एफ्राथाह आणि तो बेथलेहेमाचा पिता होता.

5तकोवाचा पिता अश्हूरला हेला व नाराह अशा दोन पत्नी होत्या.

6नाराहच्या पोटी त्याला अहुज्जाम, हेफेर, तेमानी व अहष्टारी झाले. ही नाराहची संतती होती.

7हेलाचे पुत्र: सेरथ, जोहर व एथ्नान

8व कोस, जो आनूब व हस्सोबेबाह यांचा पिता होता, तसेच त्याच्यापासून हारूमाचा पुत्र अहरहेल याची कुळे निपजली.

9याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक आदरणीय होता; “त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले” असे म्हणत त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. 10याबेसाने इस्राएलाच्या परमेश्वराजवळ प्रार्थना केली, “तुम्ही मला आशीर्वादित करा, माझ्या क्षेत्राचा विस्तार करा! माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन, मला क्लेश वाटू नये म्हणून तुमचा हात माझ्यावर राहो.” परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली.

11शूहाहचा भाऊ कलूबला महीर झाला; हा एष्टोनाचा पिता होता. 12एष्टोनास बेथ-राफा, पासेआह आणि ईर-नाहाश चा पिता तहिन्ना झाले. हे रेकाह नगरवासी होते.

13केनाजचे पुत्र: ओथनिएल व सेरायाह. ओथनिएलाचे पुत्र: हथथ आणि मेयोनोथाय.

14मेयोनोथाय ओफराहचा पिता होता. सेरायाह योआबाचा पिता होता, हा योआब गे-हाराशीम चा पिता. हे यासाठी म्हटले कारण तेथील लोक निपुण कारागीर होते.

15यफुन्नेहचा पुत्र कालेबाचे पुत्र: इरु, एलाह व नाआम. एलाहचा पुत्र: केनाज.

16यहल्लेलेलचे पुत्र: जीफ, जीफा, तिर्‍या व असरेल.

17एज्राहचे पुत्र: येथेर, मेरेद, एफेर व यालोन. मेरेदची एक पत्नी बिथ्याने मिर्याम, शम्मय व इश्बह यास जन्म दिला. इश्बह एष्टमोवाचा पिता होता.

18मेरेदने इजिप्तचा राजा फारोहची राजकन्या बिथ्याशी विवाह केला होता. यहूदाह गोत्रातील त्याच्या पत्नीने गदोरचा पिता येरेद, सोकोहचा पिता हेबेर आणि जानोहाचा पिता यकूथिएल यांना जन्म दिला.

19नहमाची बहीण, होदीयाहची पत्नी झाली; तिला: गार्मी येथील कईलाहचा पिता व माकाथी येथील एष्टमोवा झाले.

20शिमओनाचे पुत्र: अम्नोन, रिन्नाह, बेन-हानान व तिलोन. इशीचे वंशज: जोहेथ व बेन-जोहेथ.

21यहूदाहचा पुत्र शेलाहचे पुत्र: लेकाहचा पिता एर, मारेशाहचा पिता लादाह आणि बेथ-अश्बे येथील तलम कापडाचे विणकाम करणारी कुळे उत्पन्न झाली.

22तसेच शेलापासून योकीम, कोजेबा येथील लोक, योआश, मोआबावर सत्ता चालविणारे साराफ व यशूबी-लेहेम हे निपजले. (हा वृतांत प्राचीन नोंदवहीतील आहे.) 23हे कुंभार असून नताईम व गेदेराह येथे राहत असत; ते राजाचे कामकाज करून त्याच्याजवळ राहत असत.

शिमओन

24शिमओनाचे वंशज: नेमूएल, यामीन, यारीब, जेरह व शौल;

25शौलाचा पुत्र शल्लूम, शल्लूमाचा पुत्र मिबसाम आणि मिबसामचा पुत्र मिश्मा.

26मिश्माचा वंशज: त्याचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलाचा पुत्र जक्कूरचा पुत्र शिमी.

27शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाहच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही. 28त्यांनी वस्ती केलेली गावे ही: बेअर-शेबा, मोलादाह, हसर-शुआल, 29बिल्हा असेम, तोलाद, 30बेथुएल, होरमाह सिकलाग, 31बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती. 32त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि 33या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते. त्यांच्या वंशावळीत असे नमूद केलेले आहे:

34मेशोबाब, यामलेख, अमस्याहाचा पुत्र योशाह,

35योएल. येहू योशिब्याहचा पुत्र, जो सेरायाहचा पुत्र, जो असिएलाचा पुत्र होता.

36एलिओएनाइ, याकोबाह, येशोहाइयाह, असायाह, अदिएल, यशीमिएल, बेनाइयाह.

37जीजा हा शिफीचा पुत्र, जो अल्लोनचा पुत्र, जो यदायाहचा पुत्र, जो शिम्रीचा पुत्र व जो शमायाहचा पुत्र होता.

38नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. या कुटुंबांचा खूप विस्तार झाला.

39ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्‍यापर्यंत गेले. 40तिथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला. तो देश विस्तीर्ण असून शांत व निवांत होता; तिथे पूर्वी हामाचे वंशज राहत असत.

41ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्‍यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता. 42त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले. 43तिथे जे पळून गेलेले अमालेकी उरले होते, त्यांचा संहार करून ते आजवर तिथे राहतात.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]