Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Romans 3 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 What advantage, then, does the Jew have? Or what is the value of circumcision? तर यहूदी असून फायदा काय, किंवा सुंतेला काही मोल आहे का?
2 Much in every way. First of all, they were entrusted with the very words of our Father. सर्व बाबतीत आहे! सर्वात प्रथम यहूदीयांना परमेश्वराने आपले वचन सोपवून दिले होते.
3 What then? If some were unfaithful, will their unfaithfulness nullify the faithfulness of our Father? जर काहीजण अविश्वासू होते तर मग काय? त्यांचा अविश्वासूपणा हा परमेश्वराच्या विश्वासूपणाला रद्द करेल का?
4 No! Let our Father be true, though every person is a liar. As it is written: "You are proven right in your words, and win when judged." नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.”
5 But if our wrongdoing highlights our Father's righteousness, what do we say? Is our Father unjust to bring wrath on us? (I speak in human terms.). परंतु जर आमच्या अनीतीमुळे परमेश्वराचे नीतिमत्व अधिक स्पष्ट होत असेल तर आम्ही काय म्हणावे? परमेश्वर आपल्यावर क्रोध आणतात तर ते अन्यायी आहेत काय? (मी तर हे मानवी रीतीने बोलतो.)
6 Certainly not! For then how could our Father judge the world? पण असे कदापि नाही! कारण मग परमेश्वर जगाचा न्याय कसा करतील?
7 But if my lie makes our Father's truth overflow to his glory, why am I still judged as a sinner? कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?”
8 Why not say, as some slander us as saying, "Let's do evil so good may come"? Their judgment is deserved. किंवा, “चला आपण वाईट करू म्हणजे यामधून काही चांगले निष्पन्न होईल” आम्ही असेच म्हणालो, असा काहीजण आमच्यावर आरोप लावतात. त्यांची दंडाज्ञा तर योग्यच आहे!
9 What then? Are we better off? Not at all—we've already charged that Jews and Greeks alike are all under sin's grip, तर मग काय? यात आम्हाला काही फायदा आहे का? मुळीच नाही! कारण आम्ही आधी यहूदी आणि गैरयहूदी सर्वजण पापाच्या सत्तेखाली आहेत असा आरोप केला आहे.
10 as it is written: "There is no one righteous, not even one; असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही;
11 no one understands; no one seeks our Father. समंजस असा कोणी नाही; परमेश्वराला शोधणारा कोणी नाही.
12 All have turned away; together they have become worthless; no one does good, not even one. प्रत्येकजण भटकून गेले आहेत; सर्वजण निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीच नाही, एकही नाही.”
13 Their throat is an open grave; they use their tongues to deceive." "The venom of snakes is under their lips. “त्यांची मुखे उघड्या थडग्यासारखी आहेत” त्यांच्या जिभेने ते खोटे बोलतात. “नागाचे विष त्यांच्या ओठांवर असते.”
14 Their mouth is full of cursing and bitterness. “त्यांची मुखे तर शापाने व कडूपणाने भरलेली आहेत.”
15 Their feet are swift to shed blood; “रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात,
16 ruin and misery mark their ways, दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,
17 and the way of peace they have not known. आणि शांतीचा मार्ग त्यांना माहीत नाही.”
18 There is no fear of our Father before their eyes." “त्यांच्या दृष्टीत परमेश्वराचे मुळीच भय नसते.”
19 We know whatever the law says applies to those under it, so every mouth is silenced and the whole world stands accountable to our Father. आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्‍यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.
20 No one is made right before him by works of the law; the law brings awareness of sin. नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.
21 But now, apart from the law, our Father's righteousness has been revealed, testified to by the Law and the Prophets. पण आता नियमशास्त्राव्यतिरीक्त परमेश्वराचे नीतिमत्त्व प्रकट झाले आहे, याविषयीची साक्ष नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांनी दिली आहे.
22 This righteousness of our Father comes through faith in Jesus Christ, to all who believe, for there's no distinction, परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही,
23 since all have sinned and fall short of the glory of our Father, कारण सर्वांनी पाप केले आहे, आणि परमेश्वराच्या गौरवाला अंतरले आहेत,
24 and are justified freely by his grace through the redemption that is in Christ Jesus. आता परमेश्वराच्या कृपेने, ख्रिस्त येशूंच्याद्वारे खंडणी भरून आपल्याला मुक्त केले आणि विनामूल्य नीतिमान म्हणून जाहीर केले आहे.
25 Our Father presented him as the atoning sacrifice, through faith in his blood, to show his righteousness, since in his patience he had passed over sins committed before, ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे.
26 to show his righteousness now, so he is both just and the justifier of whoever trusts in Jesus. आता सध्याच्या काळात देखील ते आपले नीतिमत्व प्रकट करीत आहेत, यासाठी की त्यांनी स्वतःवर आणि येशूंवर विश्वास ठेवणार्‍यांना नीतिमान म्हणून घोषित करावे.
27 Where then is boasting? Excluded. By what law? Of works? No—by the law of faith. तर मग आमचा गर्व कशासाठी? तो वगळण्यात आला आहे. कोणत्या नियमानुसार? नियमाला कर्माची जोड हवी का? नाही, नियमाला विश्वासाची गरज आहे.
28 For we maintain that a person is justified by faith apart from works of the law. आमची मान्यता ही आहे की मनुष्य विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो, नियमशास्त्रातील कर्मामुळे नाही.
29 Or is our Father the Father of Jews only? Not the Father of Gentiles too? Yes, of Gentiles too, किंवा परमेश्वर केवळ यहूदीयांचाच परमेश्वर आहे का? तो गैरयहूदीयांचा परमेश्वर नाही का? तो गैरयहूदीयांचा सुद्धा आहेच,
30 since our Father is one, he will justify the circumcised by faith and the uncircumcised through faith. परमेश्वर एकच आहे, मग सुंता झालेले वा सुंता न झालेले, विश्वासाच्याद्वारे सर्वजण निरपराधी ठरतात.
31 Do we cancel the law through this faith? Never—we confirm the law. आता आपण नियमशास्त्राला विश्वासाने निरुपयोगी करतो का? मुळीच नाही! उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]