Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Numbers 1 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 Our Father spoke to Moses in the Sinai wilderness, in the tent of meeting, on the first day of the second month of the second year after they left the land of Egypt. He said: इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आल्यावर, दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानात सभामंडपामध्ये याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले:
2 "Count the whole community of Israel's people, by clans and fathers' houses—every male, by name, head by head. “संपूर्ण इस्राएली समुदायाची त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार, प्रत्येक पुरुषाच्या नावाने एकएक करून जनगणना करा.
3 Register everyone in Israel twenty and older who can serve in the army—you and Aaron—by their divisions. तू आणि अहरोनाने त्यांच्या विभागानुसार जे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि सैन्यात सेवा करण्यास सक्षम असलेल्या सर्व इस्राएली पुरुषांची गणना करावी.
4 A man from each tribe is to be with you, each one the head of his family. प्रत्येक कुळा मधून जो मनुष्य कुटुंबप्रमुख आहे त्याने तुला मदत करावी.
5 "Names of the men who will stand with you: from Reuben, Elizur son of Shedeur. “तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;
6 "From Simeon, Shelumiel son of Zurishaddai; शिमओन वंशातील, सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल;
7 "From Judah, Nahshon son of Amminadab; यहूदाह वंशातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन;
8 "From Issachar, Nethanel son of Zuar; इस्साखार वंशातील सूवाराचा पुत्र नथानेल;
9 "From Zebulun, Eliab son of Helon; जबुलून वंशातील हेलोनाचा पुत्र एलियाब;
10 "From the sons of Joseph: from Ephraim, Elishama son of Ammihud; from Manasseh, Gamaliel son of Pedahzur; योसेफाचे पुत्र: एफ्राईम वंशातील अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा; मनश्शेह वंशातील पदहसूरचा पुत्र गमलीएल;
11 "From Benjamin, Abidan son of Gideoni; बिन्यामीन वंशातील गिदोनाचा पुत्र अबीदान;
12 "From Dan, Ahiezer son of Ammishaddai; दान वंशातील अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर;
13 "From Asher, Pagiel son of Ochran; आशेर वंशातील आक्रानाचा पुत्र पगीयेल;
14 "From Gad, Eliasaph son of Deuel; गाद वंशातील देउएलाचा पुत्र एलीआसाफ;
15 "From Naphtali, Ahira son of Enan. नफतालीचा वंशातील एनानाचा पुत्र अहीरा.”
16 "These were the community's called ones, leaders of their ancestral tribes, heads of Israel's clans." हे सर्व वंशांतून निवडलेले पुरुष त्यांच्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार आहेत. ते इस्राएली गोत्रप्रमुख होते.
17 So Moses and Aaron took these men who had been designated by name, मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,
18 on the first day of the second month they gathered the whole community. The people registered their ancestry by clan and family—every male twenty years old and older, listed by name, one by one, आणि दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली.
19 as our Father had commanded Moses. So Moses counted them in the wilderness of Sinai. याहवेहने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणेच सीनायच्या रानात त्याने त्यांची गणती केली:
20 From Reuben's descendants, Israel's firstborn: recorded by clan and family, name by name, every male twenty years old and up, able to serve in war. इस्राएलचा पहिला पुत्र रऊबेनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे, सैन्यात सेवा करण्यास सक्षम असणाऱ्या सर्व पुरुषांची नावे, त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
21 Those counted from the tribe of Reuben were 46,500. रऊबेनाच्या गोत्रांची संख्या 46,500 होती.
22 Simeon's descendants, by clans and families, counted by name, head by head: every male twenty years old and up, fit for the army. शिमओनाच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष व जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंबानुसार नोंदण्यात आली.
23 Those counted from the tribe of Simeon were 59,300. शिमओनाच्या गोत्रांची संख्या 59,300 होती.
24 From Gad's descendants: by clans, families, and names, every man twenty and older fit for military service. गादच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
25 Those counted from the tribe of Gad were 45,650. गाद गोत्रांची संख्या 45,650 होती.
26 Judah's descendants, listed by clans and families, by name, every man twenty and older able to serve in the army: यहूदाहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
27 those counted from the tribe of Judah were 74,600. यहूदाहच्या गोत्रांची संख्या 74,600 होती.
28 Issachar's descendants, listed by clan and family, by name, every man twenty years and older fit for war: इस्साखारच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
29 those counted from the tribe of Issachar were 54,400. इस्साखार गोत्रांची संख्या 54,400.
30 Zebulun's descendants: registered by clan and family, by name, every man twenty years old or older fit for military service. जबुलूनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
31 Those counted from the tribe of Zebulun were 57,400. जबुलून गोत्रांची संख्या 57,400.
32 Sons of Joseph, Ephraim's line: recorded by clan and family, by name, every man twenty and older fit for military service. योसेफाच्या पुत्रांमधून: एफ्राईमच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
33 Those counted from the tribe of Ephraim were 40,500. एफ्राईमच्या गोत्रांची संख्या 40,500.
34 Manasseh's descendants, listed by clans and families, by name, each man twenty years or older able to serve in the army: मनश्शेहच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
35 those counted from the tribe of Manasseh were 32,200. मनश्शेहच्या गोत्रांची संख्या 32,200 होती.
36 From Benjamin's descendants, recorded by clan and family, by name, every man twenty years old and older, fit for military service: बिन्यामीनच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
37 those counted from the tribe of Benjamin were 35,400. बिन्यामीन गोत्रांची संख्या 35,400 होती.
38 From Dan's descendants, listed by clan and family, by name, every man twenty years old and older fit for war: दानच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
39 those counted from the tribe of Dan were 62,700. दान गोत्रांची संख्या 62,700 होती.
40 Asher's descendants, listed by clan and family, by name: every man twenty years old and up, fit for military service. आशेरच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
41 Those counted from the tribe of Asher were 41,500. आशेर गोत्रांची संख्या 41,500 होती.
42 Naphtali's descendants: by clan and family, counted by name, every man twenty and older fit for war. नफतालीच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.
43 Those counted from the tribe of Naphtali were 53,400. नफताली गोत्रांची संख्या 53,400 होती.
44 Moses, Aaron, and Israel's twelve leaders counted these men, each for his family. मोशे आणि अहरोन आणि इस्राएलच्या प्रत्येक घराण्याच्या बारा पुढार्‍यांनी मोजलेले पुरुष ते हेच.
45 All Israel's people were counted by families, every man twenty years old and older, fit to serve in Israel's army. सर्व इस्राएलातील वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांच्या कुटुंबानुसार नोंदण्यात आली.
46 All those counted came to 603,550. एकूण संख्या 6,03,550 होती.
47 But the Levites were not counted among them by their ancestral tribe. परंतु लेवी पूर्वजांच्या गोत्रांची गणना मात्र इतरांबरोबर करण्यात आली नाही.
48 For our Father had said to Moses: याहवेहने मोशेला सांगितले होते:
49 "Do not count the tribe of Levi or list them among the Israelites. “लेवी गोत्राची गणती करू नये किंवा इस्राएलच्या जनगणनेमध्ये त्यांचा समावेश करू नये.
50 Instead, put the Levites in charge of the tabernacle of the testimony, all its furnishings, and everything belonging to it. They must carry the tabernacle and its furnishings, care for it, and camp around it. परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.
51 When the tabernacle sets out, Levites take it down; when it is pitched, Levites set it up. Any outsider who comes near is to be put to death. ज्यावेळी निवासमंडप पुढे जायचा असेल, त्यावेळी लेव्यांनीच तो खाली काढावा आणि ज्यावेळी निवासमंडप उभारावयाचा असेल त्यावेळी लेव्यांनीच तो उभारावा. इतर कोणी निवासमंडपाच्या जवळ गेल्यास त्याला जिवे मारावे.
52 Israel's people are to camp, each by his own camp, each under his own banner, by their companies. इस्राएली लोकांनी आपआपल्या दलानुसार, प्रत्येकाने आपआपल्या छावणीत, आपआपल्या झेंड्याखाली आपले डेरे द्यावे.
53 The Levites must camp around the tabernacle of the testimony, so no wrath falls on the Israelite community; the Levites are to guard the tabernacle of the testimony." परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”
54 The people of Israel did everything our Father had commanded Moses; that is exactly what they did. याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]