Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Matthew 14 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 At that time Herod the tetrarch heard the reports about Jesus. त्यावेळी प्रांताधिकारी हेरोदाने येशूंविषयी ऐकले,
2 He told his attendants, "This is John the Baptist, raised from the dead—that's why these powers are at work in him." तो आपल्या सेवकांना म्हणाला, “हा मेलेल्यातून जिवंत होऊन आलेला बाप्तिस्मा करणारा योहानच आहे! म्हणूनच आश्चर्यकर्म करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये दिसत आहे.”
3 For Herod had arrested John, chained him, and locked him in prison over Herodias, his brother Philip's wife, आता हेरोदाने आपली पत्नी हेरोदिया, जी पूर्वी त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी होती हिच्या मागणीनुसार योहानाला बांधून तुरुंगात ठेवले होते.
4 because John had been telling him, "It is not lawful for you to have her." कारण योहान त्याला म्हणत असे: “तू तिला ठेवावे हे नियमाने योग्य नाही.”
5 Herod wanted to kill him but feared the crowd, since they held John as a prophet. म्हणून हेरोद त्याचा जीव घेण्यास पाहत होता, पण लोकांना तो भीत होता, कारण योहान संदेष्टा आहे असे लोक मानत होते.
6 But when Herod's birthday came, the daughter of Herodias danced before them and pleased Herod, हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले.
7 so he promised with an oath to give her whatever she asked. त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली.
8 Prompted by her mother, she said, "Give me John the Baptist's head here, on a platter." तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.”
9 The king was grieved, but because of his oaths and his dinner guests, he gave the order, तेव्हा राजा अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे त्याने मुलीची मागणी अंमलात आणण्यासाठी हुकूम दिला,
10 and he sent and had John beheaded in the prison. आणि योहानाचा तुरुंगात शिरच्छेद करण्यात आला.
11 His head was brought on a platter, given to the girl, who brought it to her mother. त्याचे शिर एका तबकात आणून त्या मुलीला देण्यात आले व तिने ते आपल्या आईला दिले.
12 Then John's disciples came, took the body, and buried it; and they went and told Jesus. योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि पुरले. नंतर जे घडले ते त्यांनी येशूंना सांगितले.
13 Hearing this, Jesus withdrew by boat to a remote place alone. But the crowds heard and followed him on foot from the towns. जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतील लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले.
14 When he went ashore, he saw a big crowd, felt compassion for them, and healed their sick. जेव्हा येशू होडीतून उतरले, त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला व त्यांनी आजार्‍यांना बरे केले.
15 When evening came, the disciples said to him, "This is an isolated place, and the hour is already late. Send the crowds away to go into the villages and buy themselves food." संध्याकाळ झाल्यावर शिष्य येशूंकडे येऊन म्हणाले, “ही ओसाड जागा आहे शिवाय उशीरही होत आहे. लोकांना आसपासच्या गावात जाऊन काही अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.”
16 But Jesus told them, "They don't need to leave. You feed them." यावर येशूंनी उत्तर दिले, “त्यांना जाण्याची गरज नाही; तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
17 They said to him, "We have nothing here but five loaves and two fish." त्यांनी उत्तर दिले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
18 He said, "Bring them here to me." येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.”
19 He told the crowds to sit on the grass. Taking the five loaves and two fish, he looked up to heaven, gave thanks, broke the loaves, and gave them to the disciples, who gave them to the crowds. येशूंनी लोकांना गवतावर बसावयास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.
20 They all ate and were satisfied, and they picked up twelve baskets full of the leftover pieces. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले आणि शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या उचलल्या.
21 Those who ate were about 5,000 men, besides women and children. जेवणार्‍या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती. यात स्त्रिया व मुले यांची संख्या धरलेली नाही.
22 Immediately he made the disciples board the boat and go ahead of him to the other side, while he sent the crowds away. लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे सरोवराच्या पैलतीराला जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले.
23 After sending the crowds away, he went up the mountain privately to pray. When evening came, he was there alone. त्यांना निरोप दिल्यावर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली तरी तिथे ते एकांती होते.
24 The boat was already far from land, battered by waves, the wind against them. तेव्हा होडी किनार्‍यापासून बरीच दूर गेली होती आणि वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे लाटांनी हेलकावे खात होती.
25 About three o'clock in the morning he came to them, walking on the sea. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले.
26 Seeing him walking on the sea, the disciples were terrified, saying, "A ghost!" and cried out in fear. शिष्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते फार घाबरले आणि ओरडून म्हणाले, “हे भूत आहे.”
27 But Jesus spoke to them at once: "Take courage! It is I; do not be afraid." पण येशू त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
28 Peter answered him, "Lord, if it is you, command me to come to you on the water." मग पेत्र म्हणाला, “प्रभूजी, जर आपण असाल, तर पाण्यावरून चालत आपल्याकडे येण्यास मला सांगा.”
29 He said, "Come." Peter got out of the boat, walked on water, and went toward Jesus. ते म्हणाले “ये.” तेव्हा पेत्र होडीतून उतरला आणि पाण्यावरून येशूंकडे चालत जाऊ लागला.
30 But seeing the strong wind, he was afraid, and beginning to sink, he cried out, "Lord, save me!" परंतु उंच लाटांकडे त्याचे लक्ष गेले, तेव्हा तो घाबरला आणि लागला, “प्रभूजी, मला वाचवा!” त्याने आरोळी मारली.
31 Jesus immediately reached out his hand, caught him, and said, "You of little faith, why did you doubt?" तत्क्षणी येशूंनी हात पुढे करून त्याला धरले. येशू म्हणाले, “अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
32 And when they got into the boat, the wind died down. मग जेव्हा ते होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले.
33 Then those in the boat worshiped him, saying, "Truly you are the Son of our Father." होडीत असलेले दुसरे शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, “खरोखर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात.”
34 When they had crossed over, they came to land at Gennesaret. ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले.
35 When the men of that place recognized him, they sent word through that whole region and brought him all who were sick. तेथील लोकांनी येशूंना ओळखले व आसपासच्या सर्व भागात संदेश पाठविला. लोकांनी सर्व आजारी लोकांना त्यांच्याकडे आणले.
36 They begged him to let them just touch the fringe of his robe, and all who touched it were healed. “तुमच्या झग्याच्या काठाला तरी आम्हाला शिवू द्या.” अशी त्यांनी त्यांना विनंती केली आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]