Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Leviticus 2 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 "When anyone brings a grain offering to our Father, the offering must be fine flour. Pour oil on it, put frankincense on it, “ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.
2 and bring it to Aaron's sons, the priests. The priest will take a handful of its fine flour and oil, with all its frankincense, and burn the memorial portion on the altar—a fire offering, a pleasing aroma to our Father. आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांच्याकडे ते आणावे. याजक मूठभर पीठ आणि तेल घेतील, त्याचबरोबर सर्व धूप स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर एकत्र जाळतील, हे अन्नार्पण, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.
3 The rest of the grain offering belongs to Aaron and his sons—most holy, from the fire offerings to our Father. अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.
4 "When you bring a grain offering baked in an oven: fine flour, either loaves without yeast mixed with oil, or wafers without yeast spread with oil. “ ‘जर तुम्ही भट्टीत भाजलेले अन्नार्पण आणता, तर ते उत्तम पिठाचे असावे: बेखमीर जाड भाकरी आणि जैतुनाच्या तेलात मळलेल्या किंवा पातळ बेखमीर भाकरी आणि वर जैतुनाचे तेल लावलेले असे असावे.
5 If your offering is a grain offering on a griddle, it must be fine flour mixed with oil, without yeast. जर तुमचे अन्नार्पण तव्यावर भाजलेले असेल तर ते उत्तम पिठापासून तयार केलेले तेलात मिसळलेले आणि बेखमीर असे असावे.
6 Break it into pieces and pour oil on it; it is a grain offering. तिचा भुगा करावा आणि त्यावर तेल ओतावे; हे धान्यार्पण आहे.
7 If your offering is grain cooked in a pan, make it with fine flour and oil. जर तुमचे धान्यार्पण भांड्यात शिजविलेले असेल, तर ते उत्तम पिठाचे आणि थोडेसे जैतुनाचे तेल वापरून तयार केलेले असावे.
8 Bring the grain offering made from these to our Father; present it to the priest, who brings it to the altar. याहवेहला अर्पण करण्याचे अशा प्रकारच्या वस्तूंनी बनविलेले धान्यार्पण तुम्ही याजकास आणून द्यावे व त्याने ते वेदीवर ठेवावे.
9 The priest takes the grain offering's memorial portion and burns it on the altar—a fire offering, a pleasing aroma to our Father. स्मरणभाग म्हणून याजक ते अन्नार्पणातून काढून ठेवेल आणि याहवेहला प्रसन्न करणारे सुवासिक अन्नार्पण म्हणून वेदीवर त्याचे हवन करेल.
10 What remains of the grain offering belongs to Aaron and his sons—most holy, from the fire offerings to our Father. अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.
11 "No grain offering you bring to our Father may contain yeast, for you must not burn any yeast or honey as a fire offering to our Father. “ ‘याहवेहसाठी आणले जाणारे प्रत्येक अन्नार्पण हे खमीर न घालता तयार करावे, तुम्ही याहवेहसाठी आणलेल्या अन्नार्पणात खमीर किंवा मध जाळू नये.
12 You may bring them to our Father as a firstfruits offering, but do not offer them on the altar as a pleasing aroma. तुम्ही त्यांना प्रथमफळाचे अर्पण म्हणून याहवेहकडे आणू शकता, परंतु ते वेदीवर प्रसन्न करणारे सुवासिक अर्पण म्हणून करू नये.
13 Salt every grain offering. Don't leave out your Father's covenant salt; add salt to all your offerings. प्रत्येक अर्पण मीठ घालून रुचकर करावे, कारण तुमच्या परमेश्वराबरोबर झालेल्या कराराचे मीठ तुमच्या अन्नार्पणात असलेच पाहिजे.
14 "If you bring a firstfruits grain offering to our Father, offer new grain roasted in fire, crushed kernels, as your firstfruits offering. “ ‘जर तुम्ही याहवेहसाठी प्रथम पिकाचे धान्यार्पण आणले, तर नवीन कणसाला चिरडून भाजलेल्या दाण्याचे अर्पण करावे.
15 Put oil on it and lay frankincense on it; it is a grain offering. त्यावर जैतुनाचे तेल व धूप ठेवावे; ते धान्यार्पण आहे.
16 The priest burns the memorial portion—some of the crushed grain and oil—with all its frankincense, as a fire offering to our Father." याजकाने त्या चिरडलेल्या धान्याचा आणि तेलाचा स्मरणभाग, सर्व धूपांबरोबर एकत्र जाळावा, याहवेहसाठी अर्पण असे हे एक अन्नार्पण असावे.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]