1Our Father spoke to Moses and Aaron, saying:OMRCVयाहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,
2"When someone has a swelling, rash, or bright spot on their skin that turns into a skin disease, he must be brought to Aaron the priest or one of his priest sons.OMRCV“जेव्हा एखाद्या मनुष्याच्या त्वचेवर सूज, पुरळ किंवा पुटकुळी आली आणि त्यामुळे त्याची त्वचा पांढरी झाली असली, तो कुष्ठरोगाचा चट्टा असेल, त्याला अहरोन याजकाकडे किंवा याजक असलेले त्याचे पुत्र यापैकी एकाकडे आणावे.
3The priest examines the mark on the skin. If the hair in it has turned white and it looks deeper than the skin, it is a contaminating skin disease; the priest examines him and declares him unclean.OMRCVयाजकाने त्या व्यक्तीच्या त्वचेवरील चट्टा तपासावा आणि चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील व तो त्वचेपेक्षा खोल गेलेला असेल, तर हा कुष्ठरोग समजावा; आणि याजकाने त्या व्यक्तीचा तपासणी केल्यावर, त्याला विधिनियमानुसार अशुद्ध म्हणून जाहीर करावे.
4But if the bright spot on his skin is white, not deeper than the skin, and its hair hasn't turned white, the priest must isolate the person seven days.OMRCVजर त्वचेवरील चट्टा पांढरा असेल, परंतु तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नसेल व त्यावरील केस पांढरे झाले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे.
5On the seventh day the priest examines him; if the mark hasn't changed or spread on the skin, he isolates him seven more days.OMRCVसातव्या दिवशी, याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवरील चट्टा अधिक पसरलेला नसेल, तर याजकाने त्याला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
6On the seventh day the priest examines him again. If the sore faded and didn't spread on the skin, he declares him clean—just a rash. He washes his clothes and is clean.OMRCVसातव्या दिवशी, याजकाने त्याची पुन्हा तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला आहे व तो त्वचेवर पसरला नसेल, तर तो शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे; कारण तो साधारण खवंद होय. त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत आणि पूर्ववत शुद्ध व्हावे.
7But if the rash spreads on his skin after showing himself to the priest for cleansing, he must show himself to the priest again.OMRCVपरंतु याजकापुढे शुद्ध सिद्ध झाल्यावर, तो चट्टा त्वचेवर पसरू लागला, तर त्या व्यक्तीने स्वतःला पुन्हा याजकासमोर हजर करावे.
8The priest examines him: if the rash has spread on the skin, he declares him unclean—it is a skin disease.OMRCVयाजकाने त्या व्यक्तीची तपासणी करावी आणि खवंद त्वचेवर पसरलेला दिसून आल्यास, त्याला अशुद्ध असे जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.
9"When a defiling skin disease appears on someone, he is to be brought to the priest.OMRCV“एखाद्या मनुष्याला कुष्ठरोग झाला असेल, तर त्याला याजकाकडे न्यावे.
10The priest examines him: if a white swelling on the skin has turned the hair white, with raw flesh in it.OMRCVयाजकाने त्याची तपासणी करावी आणि त्वचेवर पांढरी सूज येऊन आणि तेथील केस पांढरे झाले असतील आणि सूजेवर उघडी जखम आढळल्यास,
11It is a chronic skin disease; the priest will pronounce him unclean. He must not isolate him, since he is unclean.OMRCVतर हा जुना कुष्ठरोग असून याजकाने त्या व्यक्तीला अशुद्ध म्हणून जाहीर करावे, यापुढे त्याला अधिक तपासणीसाठी वेगळे ठेवू नये; कारण तो अशुद्धच आहे.”
12"But if the disease breaks out and covers all his skin, head to foot, wherever the priest looks,OMRCVजर कुष्ठरोग सर्व त्वचेवर पसरलेला असेल आणि याजक जितके पाहू शकतो तितके म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पसरलेला असेल तर,
13the priest examines him; if the disease covers his whole body, he pronounces him clean—since it's all turned white, he is clean.OMRCVयाजकाने त्याची तपासणी करावी आणि ते कोड संपूर्ण शरीरावर पसरलेले असेल तर त्याने त्याला शुद्ध म्हणून जाहीर करावे. कुष्ठरोगापासून बरा झाला आहे, असे जाहीर करावे; कारण तो संपूर्ण शुभ्र झाला आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.
14But on the day raw flesh appears on him, he is to be unclean.OMRCVपरंतु त्यांच्यावर उघडी जखम आढळल्यास, ते अशुद्ध समजावे.
15The priest sees the raw flesh and pronounces him unclean; the raw flesh is unclean—a skin disease.OMRCVयाजकाने त्वचेवरील जखम पाहून त्या व्यक्तीला अशुद्ध जाहीर करावे; त्वचा नसलेले मांस अशुद्ध असून ते कुष्ठरोग आहे; हा गंभीर आजार आहे.
16But if the raw flesh changes and turns white, he is to come to the priest.OMRCVपरंतु उघडी जखम फिरून पांढरी पडली तर त्या कुष्ठरोग्याने याजकाकडे यावे.
17The priest examines him; if the mark has turned white, he declares him clean—he is clean.OMRCVयाजकाने त्यांना तपासावे, जर तो भाग खरोखर पूर्णपणे पांढरा झालेला असेल, तर तो मनुष्य शुद्ध झाला आहे, असे याजकाने जाहीर करावे.
18"When someone has a boil on their skin and it heals,OMRCVज्या माणसाच्या त्वचेवर फोड येऊन पुढे तो फोड बरा झाला
19if a white swelling or reddish-white bright spot forms on the boil, show it to the priest.OMRCVव फोडाच्या जागी तांबूस पांढरा चट्टा राहिला, तर त्याने याजकाकडे तपासणीसाठी गेले पाहिजे.
20The priest examines it; if it looks lower than the skin and the hair has turned white, he pronounces him unclean—a skin disease has broken out in the boil.OMRCVयाजकाने त्याची तपासणी करावी आणि जर तो चट्टा त्वचेखाली खोलवर गेला असेल आणि त्याच्यावरील केस पांढरे झाले असतील, तर याजकाने त्याला अशुद्ध म्हणून जाहीर करावे; कारण फोडामधून कुष्ठरोग निर्माण झाला आहे.
21But if the priest sees no white hair in it, it is not below the skin, and has faded, he is to isolate him seven days.OMRCVपण तपासणीनंतर त्या चट्ट्यामध्ये पांढरे केस नाहीत आणि चट्टा त्वचेत खोल गेला नाही व त्याचा रंग करडा आहे, असे याजकाला दिसून आले असेल, तर याजकाने त्याला सात दिवस वेगळे ठेवावे.
22If it spreads further on the skin, the priest declares him unclean; it is diseased.OMRCVत्या कालावधीत तो चट्टा पसरत गेला आहे असे दिसले, तर याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो गंभीर आजार आहे.
23But if the bright spot stays put, hasn't spread, it's the scar of the boil, and the priest must pronounce him clean.OMRCVपण पांढरा चट्टा वाढला नाही किंवा पसरला नाही. तर तो केवळ फोडाचा व्रण आहे; म्हणून याजकाने तो मनुष्य शुद्ध आहे असे जाहीर करावे.
24"Or when skin has a fire burn, and the burn's raw flesh becomes a reddish-white or white bright spot,OMRCVएखादा काही कारणाने भाजला व जळालेली जागा लालसर पांढरी किंवा नुसती पांढरी झाली असे दिसून आले,
25the priest examines it: if hair in the bright spot turned white and it looks deeper than the skin, it is a skin disease broken out in the burn—he declares him unclean; it is a skin disease.OMRCVतर याजकाने तो चट्टा अवश्य तपासावा. जर चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील, आणि तो त्वचेपेक्षा खोल गेला आहे असे दिसून आले, तर त्या जळालेल्या भागी कुष्ठरोग फुटला असे समजावे; याजकाने त्यास अशुद्ध जाहीर करावे; तो मनुष्य कुष्ठरोगी आहे.
26If the priest examines it and finds no white hair in the bright spot, and it's no deeper than the skin but faded, he is to isolate him seven days.OMRCVपण तपासणीनंतर त्या पांढर्या चट्ट्यावरील केस पांढरे झालेले नाहीत, आणि पांढरेपणा त्वचेच्या खोलवर गेलेला नाही व तो हळूहळू कमी होत आहे, असे जर याजकाला दिसून आले, तर याजकाने त्याला सात दिवसापर्यंत वेगळे ठेवावे;
27On day seven the priest examines him. If it spread on the skin, the priest pronounces him unclean—a defiling skin disease.OMRCVसातव्या दिवशी याजकाने त्याची तपासणी करावी आणि जर चट्टा त्वचेवर पसरत गेला असेल, तर याजकाने त्यास अशुद्ध म्हणून जाहीर करावे; तो कुष्ठरोग आहे.
28But if the bright spot stays in place, hasn't spread on the skin, and has faded, it's the burn's swelling; the priest is to declare him clean—it is only the burn's scar.OMRCVपण पांढरा चट्टा त्वचेवर पांगून परसला नाही आणि तो हळूहळू कमी होत आहे, असे दिसून आले, तर याजकाने त्याला शुद्ध जाहीर करावे; तो जळालेल्या जागेत केवळ व्रण आहे आणि त्याला कुष्ठरोग नाही.
29"When a man or a woman has a mark on the head or in the beard,OMRCVएखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल
30the priest examines the mark; if deeper than the skin, with thin yellow hair, he pronounces them unclean—an itch, a skin disease of the head or beard.OMRCVतर याजकाने त्याची तपासणी करावी. चट्टा त्वचेखाली खोलवर आहे असे वाटत असेल आणि चट्ट्यावर पिवळे केस सापडले असतील, तर याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे; हा डोक्याचा अथवा हनुवटीचा कुष्ठरोग आहे.
31But if the priest examines the itch mark and it looks no deeper than the skin and has no black hair in it, the priest is to isolate the person for seven days.OMRCVपण तो चट्टा त्वचेपेक्षा खोल गेलेला नाही आणि त्यामध्ये काळे केस नाहीत, असे याजकाच्या तपासणीत दिसून आले तर याजकाने त्या व्यक्तीला सात दिवस वेगळे ठेवावे.
32On the seventh day the priest examines the mark: if the itch hasn't spread, has no yellow hair, and looks no deeper than the skin.OMRCVसातव्या दिवशी याजकाने तपासणी करावी आणि चट्टा जर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेमध्ये खोलवर गेला नसेल किंवा पिवळसर केस दिसून येत नसतील,
33The man is to shave, but not the sore area; the priest isolates him another seven days.OMRCVतर व्रणाभोवतीचे केस काढून टाकावे; व्रणावरचे केस मात्र काढू नयेत. मग याजकाने त्या व्यक्तीला आणखी सात दिवस वेगळे ठेवावे.
34On the seventh day the priest examines the itch. If it hasn't spread on the skin and looks no deeper than the skin, the priest declares him clean. He washes his clothes and is clean.OMRCVमग याजकाने सातव्या दिवशी तपासणी करावी, आणि व्रण त्वचेवर पसरला नसेल आणि संसर्ग त्वचेखाली खोलवर गेला नसेल, तर याजकाने त्या व्यक्तीला शुद्ध म्हणून जाहीर करावे आणि ती व्यक्ती कपडे धुतल्यानंतर शुद्ध व्हावी.
35But if the itch spreads further on the skin after his cleansing,OMRCVपण तो शुद्ध जाहीर केल्यानंतर तो चट्टा पसरू लागला,
36the priest examines him; if the itch spread on the skin, the priest need not look for yellow hair—the man is unclean.OMRCVतर याजकाने तपासणी करावी आणि चट्ट्याभोवतालचे केस पिवळे होतात की नाही याची वाट न पाहता, ती व्यक्ती अशुद्ध असे जाहीर करावे.
37But if the priest sees it unchanged, with black hair grown in it, it's healed; he's clean—the priest pronounces him clean.OMRCVपण चट्टा पसरण्याची क्रिया थांबली असून तिच्यावर काळे केस सापडले, तर ती व्यक्ती बरी झाली असून शुद्ध आहे आणि याजकाने त्याला शुद्ध असे जाहीर करावे.
38"When a man or a woman has white bright spots on their skin,OMRCVएखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या त्वचेवर पांढरे चट्टे असतील,
39the priest examines them; if the bright spots on their skin are dull white, it is a harmless rash that has broken out on the skin; he is clean.OMRCVतर याजक तपासणी करेल आणि त्वचेवरील चट्ट्याचा रंग पांढरट असेल, तर इसब हा चर्मरोग झाला आहे, असे जाहीर करेल; ती व्यक्ती शुद्ध आहे.
40"When a man loses the hair on his head, he is bald, but he is clean.OMRCVकोणा माणसाच्या डोक्यावरील केस गळून टक्कल झाले असेल तर तो शुद्ध आहे.
41If hair falls from the front of his head, his forehead is bald, but he is clean.OMRCVजर त्याच्या मस्तकाच्या पुढच्या भागावरील केस गळून पडले असतील, तर ते केवळ साधे टक्कल आहे, तो शुद्ध होय.
42But if a reddish-white sore is on his bald head or forehead, it is a skin disease breaking out on his bald head or forehead.OMRCVतरी टक्कलावर तांबूस पांढरा डाग असेल तर तो त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर कुष्ठरोग असण्याचा संभव आहे.
43The priest examines him; if a reddish-white swelling is on his bald head or forehead, like skin disease on the body's skin.OMRCVयाबाबतीत याजक त्याची तपासणी करेल आणि डोक्याच्या टक्कल पडलेल्या भागावर अंगावरील त्वचेवर कुष्ठरोगासारखा दिसणारा तांबूस पांढरा चट्टा असेल,
44A man with a skin disease is unclean; the priest must declare him unclean, his mark on his head.OMRCVतर त्या व्यक्तीच्या डोक्यावर पडलेला चट्टा कुष्ठरोगाचा आहे; ती व्यक्ती अशुद्ध आहे; याजकाने त्यास अशुद्ध असे जाहीर करावे.
45"Anyone with the skin disease must wear torn clothes, let their hair hang loose, cover their upper lip, and cry, 'Unclean, unclean!'OMRCVअसा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीने फाटलेले कपडे घालावेत, त्यांच्या केसात फणी न फिरविता ते तसेच वाढू द्यावेत; त्यांनी तोंडाखालील भाग झाकून घ्यावा आणि अशुद्ध! अशुद्ध! असे ओरडावे.
46While the mark remains, they are unclean—unclean; they must live alone, outside the camp.OMRCVजोपर्यंत कुष्ठरोग टिकून आहे, तोपर्यंत तो मनुष्य अशुद्ध असून त्याने छावणीबाहेर एकटे राहावे.
47"When a garment has a mark of mildew in it, whether a wool or a linen garment,OMRCVएखाद्या लोकरीच्या वा तागमिश्रित सुताच्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला रोगाचा संसर्ग झाला आहे,
48in fabric of linen or wool, woven or knitted, or in leather or anything of leather,OMRCVसुताच्या, लोकरीच्या ताण्याने विणलेले वस्त्र वा तागमिश्रित चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोग झाला आहे, असा संशय आला
49if a mark on garment, leather, warp, or weft, or any leather article, is greenish or reddish, it is mildew and must be shown to the priest.OMRCVआणि जर ते चामड्याच्या, विणलेल्या वस्त्रावर, अथवा चामड्याच्या वस्तूवर हिरवट किंवा तांबूस चट्टा असला, तर तो कुष्ठरोगच आहे, म्हणून तपासणीसाठी ती वस्तू याजकाकडे अवश्य घेऊन जावी.
50The priest is to examine the mark and isolate the affected article for seven days.OMRCVयाजक ती वस्तू सात दिवसापर्यंत वेगळी ठेवील व सातव्या दिवशी त्या चट्ट्याची पुन्हा तपासणी करेल. तो चट्टा पसरला असेल, तर त्या विणलेल्या किंवा चामड्याच्या वस्त्राला वा वस्तूला संसर्गजन्य कुष्ठरोग झाला आहे असे समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.
51On the seventh day he examines the mark. If it has spread in the garment, warp or weft, or in leather or anything made of leather, it is destructive mildew—unclean.OMRCVNot in this edition
52Burn the garment—warp or weft, wool or linen—or any leather article with the mark, for it is a destructive mildew; burn it in the fire.OMRCVतेव्हा याजकाने ती वस्त्रे, ते कापड किंवा ती विणलेली लोकरीची वा चामड्याची वस्तू संसर्गजन्य आहे असे म्हणून अग्नीत जाळून टाकावी.
53"But if the priest examines it and the sore hasn't spread in the garment, or warp, or weft, or any leather article,OMRCVपण सातव्या दिवशी ते विणलेले वस्त्र किंवा चामड्याची वस्तू तपासली असता तो चट्टा पसरला नाही, असे याजकाला दिसून आले, तर त्याने कुष्ठरोगाची शंका असलेली वस्तू धुऊन टाकण्याचा आदेश द्यावा व नंतर आणखी सात दिवस ती वेगळी ठेवावी.
54the priest will order the marked article washed, and isolate it another seven days.OMRCVNot in this edition
55After the affected fabric is washed, the priest examines it. If the mark's look hasn't changed, though it hasn't spread, it is unclean. Burn it in the fire—it is a corroding spot, inside or outside.OMRCVमग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो पसरला नाही. तरी तो अशुद्ध आहे असे समजावे; ती वस्तू जाळून टाकावी कारण तिला आतून, बाहेरून, सगळीकडून कुष्ठरोगाचा संसर्ग पोहोचला आहे असे समजावे.
56If the priest sees the mark has faded after washing, he must tear it from the garment, leather, or woven or knitted material.OMRCVपण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा.
57If it reappears in the garment, woven or knitted, or any leather, it's spreading; burn what has the mark in fire.OMRCVइतके करूनही जर तो चट्टा या विणलेल्या वस्त्रावर किंवा चामड्याच्या वस्तूवर पुन्हा फुलून निघाला, तर याजकाने ती वस्तू अवश्य जाळून टाकावी, कारण तिला कुष्ठरोग आहे.
58But if the mark leaves the garment, warp, weft, or leather item you washed, wash it again—it is clean.OMRCVपण ती विणलेल्या कापडाची किंवा चामड्याची वस्तू धुतल्यानंतर तिच्यावरील चट्टा नाहीसा झाला, तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी, म्हणजे ती शुद्ध होईल.
59"This is the law for a mildew mark on a wool or linen garment, warp or weft, or any leather item—to pronounce it clean or unclean."OMRCVलोकरीच्या व तागमिश्रित सुताच्या विणलेल्या वस्त्राला किंवा कापडाच्या ताग्याला, चामड्याला किंवा चामड्याच्या वस्तूला कुष्ठरोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरविण्याचे हे नियम आहे.