Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Lamentations 3 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 I am the man who has seen affliction under the rod of his wrath. याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे.
2 He has driven me away and made me walk in darkness without any light. त्यांनी मला हाकलून लावले व प्रकाशात नव्हे तर निबिड अंधारात मला चालविले आहे;
3 Surely against me he turns his hand again and again, all day long. निश्चितच त्यांनी परत परत, दिवसभर माझ्याविरुद्ध त्यांचा हात उगारला आहे.
4 He has worn away my flesh and my skin; he has broken my bones. त्यांनी माझे मांस व माझी त्वचा जीर्ण केली आहेत आणि त्यांनी माझी हाडे मोडली आहेत.
5 He has besieged me and surrounded me with bitterness and hardship. विषारी व कठीण परिश्रमाने हाल आणि यातना यांच्या कोंडीत पकडून माझ्याभोवती वेढा दिला आहे.
6 He has made me dwell in darkness like those long dead. जसे दीर्घकालापूर्वीच मृत झाल्यागत त्यांनी मला अंधकारात राहण्यास सोडले आहे.
7 He has walled me in so I cannot escape; he has weighed down my chains. त्यांनी माझ्याभोवती भिंत बांधली, म्हणजे मी सुटून जाऊ शकणार नाही; त्यांनी मला अवजड साखळदंडानी जखडले आहे.
8 Even when I call out and cry for help, he shuts out my prayer. जरी मी एवढा धावा करतो व मदतीसाठी ओरडतो, तरी ते माझ्या प्रार्थना ऐकत नाहीत.
9 He has blocked my ways with cut stones; he has made my paths crooked. मोठमोठे दगड ठेऊन माझ्या मार्गात बाधा घातली आहे. त्यांनी माझी वाट आडवळणांची केली आहे.
10 He is a bear lying in wait for me, a lion in hiding. दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे
11 He drove me off my path and tore me to pieces; he has made me desolate. त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले.
12 He bent his bow and set me as the target for his arrow. त्यांनी आपले धनुष्य ताणून मला आपल्या बाणाचे लक्ष्य बनविले आहे.
13 He drove the arrows of his quiver into my vitals. आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे.
14 I have become the laughingstock of all my people, their mocking song all day long. मी माझ्या लोकांच्या उपहासाचा विषय झालो आहे; ते दिवसभर माझ्या चेष्टेची गीते गातात.
15 He has filled me with bitterness; he has sated me with bitterness. प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे.
16 He has made my teeth grind on gravel, and made me cower in the dust. त्यांनी माझे दात खड्यांनी पाडले आहेत. त्यांनी मला धुळीत तुडविले आहे.
17 My soul has lost all peace; I have forgotten what happiness is. माझी शांती हिरावून गेली आहे; समृद्धी म्हणजे काय असते हे मी विसरलो आहे.
18 So I say, "My endurance has perished, and so has my hope from our Father." म्हणून मी म्हणतो, “माझे वैभव निघून गेले आहे व याहवेहकडून काहीही मिळण्याची आशा नष्ट झाली आहे.”
19 Remember my affliction and my wandering, the bitterness and the gall! माझी पीडा व भटकंतीची, विषारी वनस्पती व कडू दवणा यांची मला आठवण येते.
20 My soul continually remembers it and is bowed down within me. ते माझ्या चांगलेच स्मरणात आहे, आणि त्याने माझा आत्मा अत्यंत खिन्न होतो.
21 But this I call to mind, and therefore I have hope: तरीपण आशेचा हा एक किरण उरला आहे:
22 The covenant love of our Father never ceases; his mercies never come to an end; याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.
23 they are new every morning; great is your faithfulness. त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते; तुमची विश्वसनीयता महान आहे.
24 "Our Father is all I need," says my soul, "therefore I will hope in him." मी स्वतःस म्हणतो, “याहवेह माझा वाटा आहेत; म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन.”
25 Our Father is good to those who wait for him, to the soul who seeks him. जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात, आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
26 It is good to wait quietly for the salvation of our Father. याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे हितकारक आहे.
27 It is good for a man to bear the yoke in his youth. मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.
28 Let him sit alone in silence when it is laid on him; कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.
29 let him put his mouth in the dust—there may yet be hope; त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल.
30 let him give his cheek to the one who strikes, and be filled with insults. जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.
31 For the Sovereign Father will not abandon forever. कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत.
32 Though he causes grief, he will have compassion according to the abundance of his covenant love; जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.
33 for he does not willingly afflict or grieve people. ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत व त्यांना दुखवित नाहीत.
34 To crush underfoot all the prisoners of the earth, जगातील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडवून चिरडणे,
35 to deny a man justice in the sight of the Most High, परमोच्चांनी दिलेले हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणे,
36 to deprive a man of justice in his case—the Sovereign Father does not approve. कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय?
37 Who has spoken and it came to pass, unless the Sovereign Father has commanded it? प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?
38 Is it not from the mouth of the Most High that both calamity and good come? अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय?
39 Why should a living man complain about the punishment for his sins? आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?
40 Let us examine and test our ways, and return to our Father! आपण स्वतःच्या आचरणांचे निरीक्षण करू व त्यांची परीक्षा घेऊ, आणि परत याहवेहकडे वळू.
41 Let us lift up our hearts and our hands to our Father in heaven: आपण स्वर्गातील परमेश्वराकडे आपले अंतःकरण आणि आपले हात उंच करू व म्हणू:
42 "We have sinned and rebelled, and you have not forgiven. आम्ही पाप केले आणि बंड केले आणि तुम्ही त्याची क्षमा केली नाही.
43 You have wrapped yourself in anger and pursued us, killing without pity; “तुम्ही आपल्या संतापाने स्वतःला वेष्टिले आणि आमचा पाठलाग केला; तुम्ही निर्दयपणे संहार केला.
44 you have wrapped yourself with a cloud so that no prayer can pass through. तुम्ही स्वतःस मेघाने आच्छादून घेतले आहे जेणेकरून कोणतीही प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचू नये.
45 You have made us scum and refuse among the peoples. तुम्ही आम्हाला राष्ट्रांमध्ये केरकचरा गाळ व उकिरडा केले आहे.
46 All our enemies open their mouths against us; “सर्व शत्रूंनी आपले मुख आमच्याविरुद्ध खूप रुंद उघडले आहे.
47 panic and pitfall have come upon us, devastation and destruction." आम्ही दहशत व जोखिम, विनाश आणि विध्वंस यातून गेलो आहोत.”
48 My eyes flow with streams of water over the destruction of my people. माझ्या लोकांच्या विनाशामुळे माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह निघत आहेत.
49 My eyes will flow without ceasing, without respite, माझे डोळे अखंडपणे, न थांबता, अश्रुपात करीत राहतील,
50 until our Father looks down and sees from heaven. याहवेह स्वर्गातून खाली दृष्टी करून पाहीपर्यंत ते वाहत राहतील.
51 My eyes bring grief to my soul at the fate of all the daughters of my city. माझ्या नगरातील स्त्रियांना बघून माझे अंतःकरण पीडित होत आहे.
52 I have been hunted like a bird by those who were my enemies without cause; जे विनाकारण माझे शत्रू बनले होते, त्यांनी एखाद्या पक्ष्याप्रमाणे माझी शिकार केली आहे.
53 they flung me alive into a pit and cast stones on me; त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला;
54 water closed over my head; I said, "I am lost." पाणी माझ्या डोक्याच्या वरपर्यंत आले, आणि मला वाटले की आता माझा नाश होणार.
55 I called on your name, my Father, from the depths of the pit; याहवेह, त्या खोल डोहातून मी तुमच्या नावाचा धावा केला,
56 you heard my plea: "Do not turn a deaf ear to my cry for help!" तुम्ही माझी विनंती ऐकली: “माझ्या विनवणीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.”
57 You came near on the day I called on you; you said, "Do not fear!" मी धावा करताच तुम्ही मजजवळ आले आणि म्हणाले, “भिऊ नकोस.”
58 You have taken up my cause, Sovereign Father; you have redeemed my life. हे प्रभू, तुम्हीच माझा वाद चालविला; तुम्ही माझ्या जीवनाची खंडणी दिली.
59 You have seen the wrong done to me, my Father; judge my cause. याहवेह, माझ्यावर झालेला अन्याय तुम्ही पाहिला आहे. तुम्हीच माझी बाजू उचलून धरा!
60 You have seen all their vengeance, all their plots against me. तुम्ही माझ्याविरुद्ध असलेली सुडाची गहनता, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान तुम्ही पाहिले आहे.
61 You have heard their taunts, my Father, all their plots against me, याहवेह, त्यांनी केलेले अपमान तुम्ही ऐकले आहेत, त्यांनी रचलेले सर्व कारस्थान—
62 the lips and thoughts of my assailants against me all day long. माझे शत्रू माझ्याविरुद्ध दिवसभर काय बोलतात व काय कुजबुजतात, हे सर्व तुम्ही ऐकले आहे.
63 Watch their every move; I am the object of their mocking song. त्यांच्याकडे बघा! उभे राहून वा बसून, ते माझ्या उपहासाची गाणी गातात.
64 You will repay them, my Father, according to the work of their hands. हे याहवेह, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल ते ज्यास पात्र आहेत, असे प्रतिफळ त्यांना द्या.
65 You will give them hardness of heart; your curse will be on them. त्यांच्या हृदयावर आवरण टाका, तुमचा शाप त्यांच्यावर पडो!
66 You will pursue them in anger and destroy them from under the heavens of our Father. क्रोधाने त्यांचा पाठलाग करा आणि याहवेहच्या आकाशाखालून त्यांना पूर्णपणे नाहीसे करा.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]