1After this, Jesus crossed the Sea of Galilee, also called the Sea of Tiberias.OMRCVकाही वेळानंतर, येशू गालील समुद्रापलीकडे गेले. या समुद्राला (तिबिर्यास सरोवर) असेही म्हणत
2A large crowd followed him, because they saw the signs he performed on the sick.OMRCVलोकांचा मोठा समुदाय त्यांच्यामागे चालला होता, कारण त्यांनी आजार्यांना अद्भुत चिन्हे करून बरे केलेले पाहिले होते.
3Jesus went up on the mountainside and sat down there with his disciples.OMRCVयानंतर येशू डोंगरावर त्यांच्या शिष्यांसह जाऊन बसले.
4Now the Passover, the feast of the Jews, was near.OMRCVयहूद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता.
5Looking up, Jesus saw a large crowd approaching and asked Philip, "Where can we buy bread for these people to eat?"OMRCVजेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, “या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?”
6He said this to test Philip, for he himself already knew what he was going to do.OMRCVते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात आधी ठरविले होते.
7Philip answered him, "200 days' wages of bread isn't enough for each of them to get a little."OMRCVफिलिप्पाने उत्तर दिले, “प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक तरी लागेल!”
8One of his disciples, Andrew, Simon Peter's brother, said to him,OMRCVमग शिमोन पेत्र जो येशूंचा शिष्य होता, त्याचा भाऊ आंद्रिया म्हणाला,
9"A boy here has five barley loaves and two fish—but what's that for so many?"OMRCV“येथे एक मुलगा आहे त्याच्याजवळ जवाच्या पाच लहान भाकरी आणि दोन लहान मासे आहेत, परंतु त्या इतक्या लोकांना कशा काय पुरतील?”
10Jesus said, "Have the people sit down." Much grass grew there, so about 5,000 men sat down.OMRCVयेशूंनी म्हटले, “लोकांना खाली गटागटाने बसावयास सांगा.” त्या ठिकाणी भरपूर गवत होते व ते खाली बसले. तिथे पुरुषांचीच संख्या अंदाजे पाच हजार होती.
11Jesus then took the loaves, gave thanks, and distributed them to those seated; likewise with the fish, as much as they wanted.OMRCVमग येशूंनी त्या भाकरी घेतल्या, आभार मानले व जे बसले होते ते खाऊन तृप्त होईपर्यंत वाटल्या. त्यानंतर मासळ्यांचेही त्यांनी तसेच केले.
12When they were full, he told his disciples, "Gather the leftover pieces, so nothing is lost."OMRCVसर्वांनी भरपूर जेवण केल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “आता उरलेले तुकडे गोळा करा. काहीही वाया जाऊ देऊ नका.”
13So they gathered the fragments left over from the five barley loaves after the people ate, filling twelve baskets.OMRCVमग त्यांनी उरलेले तुकडे गोळा केले आणि जवाच्या पाच भाकरींपैकी जेवून उरलेल्या तुकड्यांनी बारा टोपल्या भरल्या.
14So when the people saw the sign he did, they said, "This really is the Prophet coming into the world!"OMRCVयेशूंनी हे चिन्ह केल्याचे पाहून लोक म्हणू लागले, “खरोखर, या जगात जो येणार होता तो संदेष्टा हाच आहे.”
15Knowing they meant to come and seize him to make him king, Jesus withdrew again to the mountain alone.OMRCVलोक आपल्याला जबरदस्तीने राजा करण्याच्या उद्देशाने आले आहेत हे येशूंना माहीत होते, तेव्हा ते पुन्हा एकटेच डोंगरावर निघून गेले.
16When evening came, his disciples went down to the sea,OMRCVसंध्याकाळ झाल्यावर, त्यांचे शिष्य खाली सरोवराकडे गेले,
17got in a boat and headed across the sea to Capernaum. It was already dark, and Jesus had not yet reached them.OMRCVते होडीत बसून सरोवरा पलीकडे कफर्णहूमास जाण्यास निघाले. रात्र झाली तरी येशू यद्यपि त्यांच्याकडे परतले नव्हते.
18A strong wind was blowing, and the sea grew rough.OMRCVपरंतु वादळी वारा सुटला व लाटा खवळून वाहू लागल्या.
19After rowing three or four miles, they saw Jesus walking on the water, approaching the boat, and were afraid.OMRCVते तीन किंवा चार मैल अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले.
20But he said to them, "It is I; do not be afraid."OMRCVपरंतु ते त्यांना म्हणाले, “मीच आहे; भिऊ नका.”
21So they were glad to take him into the boat, and instantly it reached the shore they were heading toward.OMRCVते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्यास पोहोचली.
22The next day, the crowd remaining on the far shore saw that only one boat had been there, that Jesus had not boarded it with his disciples, but that his disciples had gone off alone.OMRCVमग दुसर्या दिवशी सकाळी सरोवराच्या पलीकडच्या किनार्यावर लोकांचा समुदाय थांबला होता, तिथे केवळ एक होडी होती आणि येशू शिष्यांसहित त्यामध्ये गेले नव्हते, तरी शिष्य होडीत बसून निघून गेले होते.
23Other boats came from Tiberias near the place where they ate bread after the Lord gave thanks.OMRCVकाही होड्या तिबिर्याहून ज्या ठिकाणी आभार मानून प्रभूने त्यांना भाकर खाऊ घातली होती त्या ठिकाणी आल्या.
24So when the crowd saw Jesus and his disciples weren't there, they got in boats and went to Capernaum to look for Jesus.OMRCVसमुदायाच्या लक्षात आले की येशू आणि त्यांचे शिष्य तिथे नाहीत, हे पाहून ते नावेमध्ये बसून येशूंच्या शोधार्थ कफर्णहूमास निघाले.
25Finding him across the sea, they asked, "Rabbi, when did you get here?"OMRCVते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?”
26Jesus answered them, "Truly, truly, I tell you: you seek me not because you saw signs, but because you ate the loaves and were filled.OMRCVयेशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात.
27Don't work for food that spoils, but for food that lasts to eternal life, which the Son of Man will give you. For on him our Father has set his seal."OMRCVनाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.”
28Then they said to him, "What must we do to be doing the works of our Father?"OMRCVत्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?”
29Jesus answered them, "This is our Father's work: that you believe in the one he sent."OMRCVयेशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्यांना त्यांनी पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.”
30So they asked him, "What sign will you give, so we may see and believe you? What work will you do?OMRCVत्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल?
31Our ancestors ate manna in the wilderness, as it is written: 'He gave them bread from heaven to eat.'"OMRCVआमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’”
32Jesus told them, "Truly, truly, I tell you: Moses didn't give you the bread from heaven—my Father gives you the true bread from heaven.OMRCVयेशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे.
33For the bread of our Father is he who comes down from heaven and gives the world life."OMRCVही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.”
34So they said to him, "Lord, give us this bread always."OMRCVते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.”
35Jesus told them, "I am the bread of life. Whoever comes to me will never hunger; whoever believes in me will never thirst.OMRCVत्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.
36But as I told you, you have seen me and still do not believe.OMRCVपरंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही.
37All the Father gives me will come to me, and the one who comes to me I will never drive away.OMRCVजे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही.
38For I came down from heaven not to do my own will, but the will of him who sent me.OMRCVकारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे.
39This is the will of him who sent me: that I lose none of all he has given me, but raise them up on the last day.OMRCVआणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे.
40For this is the will of my Father: that everyone who looks to the Son and believes in him should have eternal life, and I will raise them up on the last day."OMRCVकारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”
41So the Jews grumbled about him because he said, "I am the bread that came down from heaven."OMRCVमी, “स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,” या त्यांच्या विधानामुळे यहूदी पुढारी त्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले.
42They said, "Isn't this Jesus, Joseph's son, whose father and mother we know? How can he now say, 'I have come down from heaven'?"OMRCVते म्हणाले, “हा योसेफाचा पुत्र येशू आहे ना, ज्याच्या आईवडिलांना आपण चांगले ओळखतो नाही का? ‘आपण स्वर्गातून आलो आहोत.’ हे कसे म्हणतो?”
43Jesus answered them, "Stop grumbling among yourselves.OMRCVहे ऐकून येशू त्यांना म्हणाले, “आपसात कुरकुर करू नका,
44"No one can come to me unless the Father who sent me draws him, and I will raise him on the last day.OMRCVज्यांनी मला पाठविले त्या पित्याने आकर्षून घेतल्यावाचून कोणीही मजकडे येऊ शकत नाही आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.
45It is written in the Prophets: 'And they will all be taught by our Father.' Everyone who has heard and learned from the Father comes to me.OMRCVसंदेष्ट्यांच्या ग्रंथात असा शास्त्रलेख आहे: ‘त्या सर्वांना परमेश्वर शिकवतील.’ जो कोणी पित्याचे ऐकून त्यांच्यापासून शिकला आहे तो मजकडे येतो.
46Not that anyone has seen the Father except the one from him; he has seen the Father.OMRCVजो परमेश्वरापासून आहे त्याच्याशिवाय पित्याला कोणीही पाहिले नाही.
47Truly, truly, I tell you, whoever believes has eternal life.OMRCVमी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालेच आहे.
48I am the bread of life.OMRCVमीच जीवनाची भाकर आहे.
49Your ancestors ate the manna in the wilderness, yet they died.OMRCVतुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला, तरी ते मरण पावले.
50This is the bread that comes down from heaven, so anyone may eat it and not die.OMRCVपरंतु ही भाकर जी स्वर्गातून उतरलेली आहे, ती जे कोणी खातील ते मरणार नाही.
51I am the living bread come down from heaven. Whoever eats this bread will live forever. The bread I will give is my flesh, for the life of the world."OMRCVमी ती स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जे कोणीही भाकर खातील, ते सदासर्वकाळ जगतील. ही भाकर माझे शरीर आहे, जी जगाच्या जीवनासाठी मी देणार आहे.”
52Then the Jews argued sharply among themselves, "How can this man give us his flesh to eat?"OMRCVयास्तव यहूदी पुढारी आपसात तीव्र वाद करू लागले, “हा मनुष्य त्याचा देह आम्हास कसा खावयास देऊ शकेल?”
53Jesus told them, "Truly, truly, I tell you, unless you eat the flesh of the Son of Man and drink his blood, you have no life in yourselves.OMRCVयेशू म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, जोपर्यंत तुम्ही मानवपुत्राचा देह खात नाही व त्याचे रक्त पीत नाही, तोपर्यंत तुम्हामध्ये जीवन नाही.
54Whoever feeds on my flesh and drinks my blood has eternal life, and I will raise him on the last day.OMRCVजो कोणी माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन मिळते आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवेन.
55For my flesh is true food, and my blood is true drink.OMRCVकारण माझा देह हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे.
56Whoever feeds on my flesh and drinks my blood remains in me, and I in him.OMRCVजे माझा देह खातात व माझे रक्त पितात, ते माझ्यामध्ये राहतात आणि मी त्यांच्यामध्ये राहतो.
57As the living Father sent me and I live because of the Father, so whoever feeds on me will live because of me.OMRCVमला पाठविणार्या जिवंत पित्यामुळे मी जगतो. तसेच ज्यांचे पोषण माझ्यावर होते तो प्रत्येकजण माझ्यामुळे जगेल.
58This is the bread that came down from heaven. It is not like the bread your ancestors ate and still died. Whoever feeds on this bread will live forever."OMRCVमी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला आणि मरण पावले, परंतु ज्या कोणाचे पोषण या भाकरीवर होते ते सदासर्वकाळ जगतील.”
59He said these things while teaching in the synagogue at Capernaum.OMRCVयेशूंनी हे शिक्षण कफर्णहूमातील सभागृहामध्ये दिले.
60On hearing it, many of his disciples said, "This is a hard teaching. Who can accept it?"OMRCVहे ऐकून, त्यांच्या शिष्यांपैकी पुष्कळजण म्हणाले, “ही शिकवण अवघड आहे. हे कोण स्वीकारू शकेल?”
61Aware that his disciples were grumbling about this, Jesus said to them, "Does this offend you?OMRCVत्यांचे शिष्य कुरकुर करीत आहेत, हे ओळखून येशू त्यांना म्हणाले, “यामुळे तुम्ही दुखविले गेले आहात का?
62"Then what if you see the Son of Man ascending to where he was before?OMRCVतर मग मानवपुत्राला, जिथे ते पूर्वी होते तिथे वर चढून जाताना पाहाल!
63The Spirit gives life; the flesh helps nothing. The words I have spoken to you are spirit and life.OMRCVफक्त आत्माच सार्वकालिक जीवन देतो; देहाचे काही महत्त्व नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत, ती आत्मा व जीवन यांनी पूर्ण आहेत.
64But some of you don't believe." For Jesus knew from the start who didn't believe, and who would betray him.OMRCVतरी, तुमच्यापैकी काहीजण माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत.” आपणावर कोण विश्वास ठेवतो व कोण आपला विश्वासघात करणार हे येशूंना सुरुवातीपासून माहीत होते.
65And he said, "This is why I told you: no one can come to me unless the Father enables him."OMRCVपुढे येशू म्हणाले, “यासाठीच मी तुम्हाला सांगितले होते की, पित्याने शक्य केल्याशिवाय कोणालाही माझ्याकडे येता येत नाही.”
66From this time many of his disciples turned back and no longer walked with him.OMRCVहे ऐकून त्यांचे अनेक शिष्य मागे फिरले व त्यांना अनुसरले नाहीत.
67So Jesus asked the Twelve, "Do you want to leave too?"OMRCVयेशू आपल्या बारा शिष्यांना म्हणाले, “तुम्ही सुद्धा सोडून जाणार नाही ना?”
68Simon Peter answered him, "Lord, to whom should we go? You have the words of eternal life.OMRCVत्यावर शिमोन पेत्राने उत्तर दिले, “प्रभूजी, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळच आहेत.
69We have believed and known you are the Holy One of our Father."OMRCVआम्ही विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही परमेश्वराचे पवित्र पुरुष आहात हे ओळखले आहे.”
70Jesus answered them, "Have I not chosen you, the Twelve? Yet one of you is a devil."OMRCVयेशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हा बाराजणांस निवडून घेतले नव्हते काय? तरी तुम्हातील एकजण सैतान आहे!”
71He meant Judas, son of Simon Iscariot, one of the Twelve, who was about to betray him.OMRCVहे शिमोन इस्कर्योत याचा पुत्र यहूदाह याच्यासंबंधात ते बोलले, कारण तो बारा शिष्यांपैकी एक असून त्यांचा विश्वासघात करणार होता.