Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Haggai 1 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 In King Darius's second year, in the sixth month, on the first day, the word of our Father came through Haggai the prophet to Zerubbabel son of Shealtiel, governor of Judah, and to Joshua son of Jehozadak, the high priest: दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, सहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहचे वचन हाग्गय संदेष्ट्याला यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, व प्रमुख याजक, यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ यांना उद्देशून आला:
2 This is what the Father of heaven's armies says: "These people say it isn't yet time to rebuild the house of our Father." सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे लोक म्हणतात, ‘याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीची योग्य वेळ अजून आलेली नाही.’ ”
3 Then the word of our Father came through Haggai the prophet: मग हाग्गय संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:
4 "Should you be living in your paneled houses while this house lies in ruins?" “भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?”
5 So then, this is what the Father of heaven's armies says: "Consider carefully how you have lived. सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या.
6 You have sown much, but harvested little. You eat, but never have enough. You drink, but never have your fill. You put on clothes, but no one keeps warm. And the one who earns wages earns them only to put them into a purse with holes." तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.”
7 This is what the Father of heaven's armies says: "Consider carefully how you have lived. सर्वसमर्थ याहवेह म्हणतात ते असे: “तुम्ही तुमच्या आचरणाकडे नीट लक्ष द्या.
8 Go up into the hills, bring down timber, and rebuild the house, so that I may take pleasure in it and be honored," says our Father. पर्वतावर जा आणि लाकडे घेऊन या आणि माझे भवन बांधा. म्हणजे मी त्यात संतोष पावेन आणि गौरवित होईन,” असे याहवेह म्हणतात.
9 "You expected much, but it amounted to so little. What you brought home, I blew away. Why?" declares the Father of heaven's armies. "Because of my house, which still lies in ruins, while each of you is busy with his own house. “तुम्ही पुष्कळाची आशा केली, परंतु पाहा, तुम्हाला किती थोडेसे मिळाले. तुम्ही जे घरी आणले, मी ते फुंकर घालून उडविले का? सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, कारण माझे भवन ओसाड पडलेले आहे आणि तुम्ही स्वतःच्या घरात व्यस्त आहात.
10 Therefore, because of you the heavens have withheld their dew, and the earth has withheld its produce. म्हणून तुमच्यामुळे आकाशाने त्याचे दव आणि पृथ्वीने तिची उपज आवरून धरले आहे.
11 I called for a drought on the fields and the hills, on the grain, the new wine, the olive oil, on whatever the ground produces, on people and livestock, and on all the labor of your hands." मी शेतावर, डोंगराळ भागांवर, धान्यावर, नव्या द्राक्षारसावर, जैतुनाच्या तेलावर व इतर सर्व ज्यांची भूमीतून उपज होते, लोकांवर आणि पशूंवर, तसेच तुमच्या हाताच्या कष्टाच्या कमाईवर मी अवर्षण बोलाविले आहे.”
12 Then Zerubbabel son of Shealtiel, Joshua son of Jehozadak the high priest, and all the remnant of the people obeyed our Father's voice and the words of Haggai the prophet, since our Father had sent Haggai; and the people feared before our Father. तेव्हा यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेल, आणि यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजक, आणि देशातील अवशिष्ट लोकांनी त्यांचे परमेश्वर याहवेहच्या वाणीचे व हाग्गयाला मिळालेल्या संदेशाचे पालन केले, कारण त्यांचे परमेश्वर याहवेहनेच त्याला पाठविले होते आणि लोकांना याहवेहचे भय वाटू लागले.
13 Then Haggai, our Father's messenger, gave the people this message: "I am with you, declares our Father." मग याहवेहचा संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहने लोकांना संदेश पाठविला: “मी तुम्हाबरोबर आहे,” याहवेह जाहीर करतात.
14 So our Father stirred the spirit of Zerubbabel son of Shealtiel, governor of Judah, the spirit of Joshua son of Jehozadak the high priest, and the spirit of all the remnant of the people. They came and worked on the house of the Father of heaven's armies, याहवेहने यहूदीयाचा राज्यपाल, शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेलच्या आत्म्याला व यहोसादाकाचा पुत्र यहोशुआ, प्रमुख याजकच्या आत्म्याला आणि सर्व अवशिष्ट लोकांच्या आत्म्याला जागृत करून प्रेरित केले. ते आले व त्यांनी त्यांचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवेहचे भवन बांधण्यास सुरुवात केली.
15 on the twenty-fourth day of the sixth month in the second year of Darius the king. हे सहाव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी घडले. दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे घडले.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]