Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Genesis 27 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 When Isaac grew old and his eyes were too dim to see, he called Esau his older son and said, "My son." "Here I am," he answered. इसहाक वृद्ध झाला, त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले, तेव्हा एके दिवशी त्याने आपला ज्येष्ठपुत्र एसाव याला हाक मारली व म्हटले, “माझ्या मुला.” “बाबा, काय आज्ञा,” तो उत्तरला.
2 Isaac said, "Look—I am old; I do not know the day of my death. तेव्हा इसहाक त्याला म्हणाला, “मी आता वृद्ध झालो आहे, आणि माझ्या मृत्यूचा दिवस मला माहीत नाही.
3 Now take your gear—quiver and bow—go out to the field and hunt game for me. तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण.
4 Then make me the tasty food I love, bring it to eat, so my soul may bless you before I die." मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर आणि मला खाण्यासाठी ते इकडे घेऊ ये, म्हणजे मरण्यापूर्वी मी माझा आशीर्वाद तुला देईन.”
5 Rebekah listened as Isaac spoke to his son Esau. Esau went out to the field to hunt game and bring it back. इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला,
6 Rebekah said to her son Jacob, "I heard your father tell your brother Esau, रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले,
7 'Bring me game, make me a tasty meal to eat, so I may bless you before our Father before I die.' एखाद्या वनपशूची शिकार करून आण, मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर, म्हणजे मरण्यापूर्वी याहवेहच्या सानिध्यात जो आशीर्वाद आहे, तो मी तुला देईन, हे सांगताना मी ऐकले.”
8 Now then, my son, listen to my voice and do exactly what I tell you. ती म्हणाली, “आता माझ्या मुला, नीट लक्ष देऊन ऐक व मी सांगते तसेच कर:
9 Go to the flock and get me two good young goats from there, so I can make your father tasty food, just as he loves. बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन,
10 Then take it to your father to eat, so that he may bless you before he dies." मग ते तू आपल्या वडिलांकडे घेऊन जा. म्हणजे मृत्यूपूर्वी ते तुला आशीर्वाद देतील.”
11 Jacob said to his mother Rebekah, "Look, Esau my brother is a hairy man, and I'm smooth. याकोब त्याची आई रिबेकाहला म्हणाला, “पण माझा भाऊ एसाव तर केसाळ आहे आणि माझी कातडी अगदी केसरहित आहे.
12 What if my father feels me? I'll seem a deceiver to him, and bring on myself a curse, not a blessing." वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.”
13 His mother said, "My son, let your curse fall on me—just listen to my voice: go, bring them to me." तेव्हा रिबेकाह म्हणाली, “माझ्या बाळा, ते शाप माझ्यावर पडोत. मी सांगते त्याप्रमाणे तू कर, बाहेर जा आणि करडे घेऊन ये.”
14 So Jacob went, took the goats, and brought them to his mother, who made the tasty food his father loved. तेव्हा याकोबाने करडे कापून, स्वच्छ करून आपल्या आईकडे आणली, आणि तिने त्याच्या वडिलांना आवडणारे रुचकर भोजन तयार केले.
15 Then Rebekah took Esau her older son's best clothes, kept with her in the house, and dressed Jacob her younger son. मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले.
16 She covered his hands and smooth neck with the goat skins. तिने त्याचा हात आणि मानेवरचा गुळगुळीत भाग करडांच्या कातड्याने झाकला.
17 Then she handed her son Jacob the tasty meal and the bread she had made. नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली.
18 Jacob came to his father and said, "My father." He said, "Here I am. Who are you, my son?" आपल्या वडिलाजवळ जाऊन याकोब म्हणाला, “बाबा.” तो म्हणाला, “काय माझ्या बाळा? तू कोण आहेस?”
19 Jacob said to his father, "I am Esau, your firstborn. I've done as you told me. Please sit up and eat my game, so your soul may bless me." तेव्हा याकोबाने उत्तर दिले, “मी एसाव, तुमचा ज्येष्ठपुत्र आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. कृपया उठून बसा आणि तुमच्यासाठी शिकार करून आणलेले भोजन खा, म्हणजे तुम्ही मला तुमचे आशीर्वाद द्या.”
20 Isaac asked his son, "How did you find it so fast, my son?" He said, "Because your Father granted me success." त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.”
21 Isaac said to Jacob, "Please come closer, my son, so I can feel you, to know whether you really are my son Esau or not." मग इसहाक याकोबास म्हणाला, “माझ्या मुला, जरा माझ्याजवळ ये. तू खरोखरच एसाव आहेस की नाही ते मला चाचपून पाहू दे.”
22 Jacob went to his father Isaac, who felt him and said, "The voice is Jacob's voice, but the hands are Esau's hands." तेव्हा याकोब आपला पिता इसहाकाजवळ गेला व त्यांनी त्याला चाचपून म्हटले, “वाणी तर याकोबाची आहे, पण हात एसावाचे आहेत.”
23 Isaac didn't recognize him, since Jacob's hands were as hairy as his brother Esau's hands, so Isaac blessed him. त्याने त्याला ओळखले नाही, कारण त्याचे हात एसावाच्या हातांसारखे केसाळ होते. तो याकोबाला आशीर्वाद देण्यासाठी तयार झाला,
24 He asked, "Are you really my son Esau?" And he said, "I am." त्याने विचारले, “तू खरोखर माझा पुत्र एसावच आहेस काय?” तो म्हणाला “होय, मीच आहे.”
25 Isaac said, "Serve me my son's game, so my soul may bless you." Jacob served him, and he ate; he brought him wine, and he drank. मग इसहाक त्यास म्हणाला, “त्या शिकारीचे भोजन इकडे आण. मी ते खाईन आणि माझे आशीर्वाद तुला देईन.” तेव्हा याकोबाने जेवणाचे ताट आणले, तो जेवला आणि मग द्राक्षारस त्याच्याकडे आणले, तेही तो प्याला.
26 Then his father Isaac said to him, "Come closer, my son, and kiss me." मग इसहाक त्याला म्हणाला, “माझ्या मुला इकडे ये आणि माझे चुंबन घे.”
27 So Jacob came closer and kissed him. Isaac smelled the scent of his clothes, blessed him, and said, "See—the scent of my son is like the scent of a field that our Father has blessed. तो आपल्या पित्याजवळ गेला आणि त्याने त्याचे चुंबन घेतले. जेव्हा इसहाकाला त्याच्या वस्त्रांचा वास आला, तेव्हा त्याला आशीर्वाद देत तो म्हणाला, “अहा, माझ्या पुत्राचा सुगंध, जसा याहवेहने आशीर्वादित केलेल्या शेताचा.
28 May our Father give you the dew of heaven and the richness of the earth, and an abundance of grain and new wine. परमेश्वर तुला आकाशातील दव आणि पृथ्वीची समृद्धी देतील, भरपूर धान्य आणि नवीन द्राक्षारस देतील.
29 Let peoples serve you and nations bow to you. Rule your brothers, and let your mother's sons bow to you. Cursed be all who curse you, and blessed all who bless you." राष्ट्रे तुझी सेवा करोत, आणि लोक तुझ्यापुढे नमोत. तू तुझ्या भाऊबंदाचा धनी हो. तुझ्या आईची मुले तुझ्यापुढे लवून तुला मुजरा करोत. जे तुला शाप देतात ते सर्व शापित होवोत, आणि जे तुला आशीर्वाद देतात ते सर्व आशीर्वादित होवोत.”
30 Just as Isaac finished blessing Jacob, and Jacob had barely left his father Isaac's presence, his brother Esau returned from the hunt. इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला
31 He also made a tasty dish, brought it to his father, and said to his father, "Let my father get up and eat some of his son's game, so your soul may bless me." त्यानेही आपल्या पित्यासाठी रुचकर भोजन तयार केले आणि त्याच्याकडे ते घेऊन आला व म्हणाला, “बाबा, हे पाहा मी शिकार घेऊन आलो आहे. उठून बसा आणि हे खा म्हणजे मला तुम्ही तुमचे आशीर्वाद देऊ शकाल.”
32 His father Isaac asked him, "Who are you?" He said, "I am your son, your firstborn, Esau." हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.”
33 Isaac shook violently and said, "Who, then, hunted game and brought it to me? I ate it all before you came and blessed him—yes, blessed he will be!" त्याचवेळी इसहाकाच्या शरीराला भयंकर कंप सुटला आणि तो म्हणाला, “तर मग आताच शिकार घेऊन माझ्याकडे आला होता तो कोण होता? तू येण्यापूर्वी मी तर ते खाल्ले आणि माझे आशीर्वादही त्याला दिले. होय, त्याला ते आशीर्वाद आता मिळणारच.”
34 When Esau heard his father's words, he let out a very loud, bitter cry and said to his father, "Bless me too, my father!" जेव्हा एसावाने आपल्या पित्याचे हे शब्द ऐकले, तेव्हा तो अतिदुःखाने हंबरडा फोडून आपल्या पित्यास म्हणाला, “बाबा, बाबा, मलाही आशीर्वाद द्या.”
35 Isaac said, "Your brother came dishonestly and took your blessing." परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.”
36 Esau said, "Isn't he rightly named Jacob? He's cheated me twice: he took my birthright, and now he's taken my blessing." Then he asked, "Haven't you reserved a blessing for me?" यावर एसावाने म्हटले, “त्याचे नाव याकोब योग्यच नाही काय? त्याने दुसर्‍यांदा मला फसविले आहे. त्याने माझा जन्मसिध्द हक्क घेतला आणि आता माझा आशीर्वादही चोरला आहे.” नंतर त्याने विचारले, “माझ्यासाठी तुम्ही एकही आशीर्वाद राखून ठेवला नाही काय?”
37 Isaac answered Esau, "Look, I have made him lord over you, given him all his brothers as servants, and sustained him with grain and new wine. What then can I do for you, my son?" परंतु इसहाकाने एसावास उत्तर दिले, “मी त्याला तुझा धनी आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना त्याचे नोकर करून ठेवले आहे. मी त्याला भरपूर धान्य आणि द्राक्षारस यांची हमी दिली आहे. आता देण्याचे काय शिल्लक राहिले आहे, माझ्या मुला?”
38 Esau said to his father, "Do you have only one blessing, my father? Bless me too, my father!" Esau wept aloud. एसाव आपल्या वडिलांना म्हणाला, “तुमच्याकडे एकच आशीर्वाद आहे काय? अहो बाबा, मलाही आशीर्वाद द्या!” मग एसाव मोठ्याने रडू लागला.
39 Then his father Isaac replied to him, "Look—your dwelling will be away from the richness of the earth, and away from the dew of heaven above. त्याचे वडील इसहाक त्याला उत्तर देत म्हणाले, “तुझे वास्तव्य सुपीक प्रदेशापासून दूर आकाशातील दहिवर पडते तिथून दूर असेल.
40 By your sword you will live, and you will serve your brother. But when you grow restless, you will break his yoke from your neck." तलवारीच्या जोरावर तू जगशील तू आपल्या भावाची सेवा करशील, परंतु जेव्हा अस्वस्थ होशील, तेव्हा तुझ्यावर असलेले त्याचे जू तू तुझ्यावरून झुगारून देशील.”
41 Esau bore a grudge against Jacob for the blessing his father gave him, and said to himself, "My father's mourning days are near; then I will kill my brother Jacob." एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.”
42 Told what her older son Esau had said, Rebekah sent for her younger son Jacob and said, "Your brother Esau is consoling himself over you—he intends to kill you. परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे.
43 Now, my son, listen to my voice: get up, flee to my brother Laban in Haran. तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा.
44 Stay with him a while—until your brother's fury subsides, तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा.
45 until your brother's anger turns from you and he forgets what you did to him. Then I'll send and bring you back from there. Why lose both of you in one day?" तू जे काही केलेस याचा त्याला विसर पडेपर्यंत तू तिथेच राहा. मग मी तुला बोलाविणे पाठवेन. एकाच दिवशी मी तुम्हा दोघांनाही का मुकावे?”
46 Rebekah said to Isaac, "I loathe my life because of these Hittite women. If Jacob takes a wife from the daughters of Heth, from this land, why should I live?" नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]