Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Exodus 39 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 From the blue, purple, and scarlet yarn they made finely woven garments for serving in the holy place; they made the holy garments for Aaron, as our Father commanded Moses. पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
2 He made the ephod of gold, of blue, purple, and scarlet yarn, and of finely woven linen. मग त्यांनी एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा वापर करून बनविला.
3 They hammered gold into sheets, cut it into threads, and worked them into the blue, purple, and scarlet yarn and fine linen—the work of a skilled designer. त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे बनविले आणि निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या धाग्यात आणि रेशमी ताग कातून—कुशल कारागिराच्या हातांनी बनविले.
4 They made shoulder pieces for it, joined together at its two edges. एफोदासाठी त्यांनी दोन खांदेपट्ट्या बनविल्या, ज्या त्याच्या दोन कोपर्‍यांना बांधता येतील अशा जोडल्या.
5 The ephod's woven band was one piece with it, made the same way: gold, blue, purple, and scarlet yarn, and finely twisted linen, as our Father commanded Moses. कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच होता; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे तो बनविला होता.
6 They made the onyx stones, mounted in gold filigree settings, engraved like seal engravings, with the names of Israel's sons. त्यांनी गोमेद रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविले आणि त्यावर मुद्रा कोरावी अशी इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरली.
7 He put them on the ephod's shoulder pieces as memorial stones for Israel's sons, as our Father had commanded Moses. मग त्यांनी इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून ती रत्ने एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर लावली, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे त्यांनी हे केले.
8 He made the breastpiece—skilled work like the ephod's—of gold, blue, purple, scarlet yarn, and finely twisted linen. कुशल कारागिरांच्या हस्तकृतीने त्यांनी ऊरपट बनविला. त्यांनी तो एफोदाप्रमाणेः सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांचे सूत व कातलेल्या रेशमी तागाचा बनविला.
9 Square and doubled, they made the breastpiece—about nine inches long and nine inches wide, doubled. तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला होता व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत होती.
10 They set in it four rows of stones. The first row was carnelian, topaz, and emerald; मग त्यांनी त्यात चार रांगेत मोलवान रत्ने लावली. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज, व माणिक
11 the second row, turquoise, sapphire, and emerald; दुसर्‍या रांगेत पाचू, नीलमणी व हिरे,
12 the third row, jacinth, agate, and amethyst; तिसर्‍या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
13 the fourth row, beryl, onyx, and jasper. They were enclosed in gold filigree settings. आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे. त्यांना नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या कोंदणात लावले होते.
14 Twelve stones, one per name of Israel's sons, each engraved like a seal with its own name, for the twelve tribes. इस्राएलाच्या पुत्रातील प्रत्येकाच्या नावाने एक अशी बारा रत्ने होती. प्रत्येक रत्नावर इस्राएलाच्या बारापैकी एका गोत्राचे नाव मुद्रेप्रमाणे कोरले.
15 For the breastpiece they made braided chains of pure gold, like cords. त्यांनी ऊरपटासाठी पीळ घातलेल्या दोरीप्रमाणे शुद्ध सोन्याच्या साखळ्या तयार केल्या.
16 They made two gold filigree settings and two gold rings, fastening the two rings to the breastpiece's two ends. त्यांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनविल्या, त्या दोन कोंदणांमध्ये घालून ऊरपटाच्या दोन्ही टोकास बसविल्या.
17 They fastened the two gold cords to the two rings at the ends of the breastpiece. त्यांनी त्या सोन्याच्या दोन साखळ्या ऊरपटाच्या टोकाला असलेल्या कड्यांमध्ये बसविल्या,
18 They put the two ends of the two cords on the two filigree settings, and put them on the ephod's shoulder pieces, at its front. आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडले.
19 They made two gold rings and put them on the breastpiece's two ends, on its inner edge facing the ephod. त्यांनी सोन्याच्या दोन कड्या तयार केल्या व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडल्या.
20 They made two gold rings and put them on the two shoulder pieces of the ephod, low on the front, near the seam above its woven band. मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनविल्या व त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून जोडल्या, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडल्या.
21 They fastened the breastpiece's rings to the ephod's rings with a blue cord, so it would rest on the ephod's woven band and not come loose from the ephod, as our Father commanded Moses. त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.
22 Bezalel made the robe of the ephod entirely of blue, the work of a weaver. त्यांनी एफोदाचा झगा संपूर्ण निळ्या कापडाने बनविला—विणकाम करणार्‍याच्या कामाप्रमाणे विणला.
23 Its opening was in the center, like a collar's opening, with a woven binding around it so it wouldn't tear. त्याच्या मधोमध चिलखताच्या गळ्याप्रमाणे त्या झग्याचे तोंड होते. तो फाटू नये म्हणून त्याच्या तोंडाला गळपट्टीप्रमाणे गोट होता.
24 They made pomegranates of blue, purple, and scarlet yarn and twisted linen on the robe's hem. त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेर्‍यावर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या सुताची डाळिंबे बनविली.
25 They made pure gold bells and set them between the pomegranates on the robe's hem, all around between the pomegranates. डाळिंबांच्या मध्ये झग्याच्या घेरावर शुद्ध सोन्याच्या घंट्या बनवून लावल्या.
26 Bell and pomegranate, bell and pomegranate, around the robe's hem for serving, as our Father commanded Moses. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले.
27 For Aaron and his sons they made the tunics of fine linen, the work of a weaver, यानंतर त्यांनी अहरोन व त्याचे पुत्र यांच्यासाठी रेशमी तागाचे विणलेले अंगरखे तयार केले.
28 the fine-linen turban, the beautiful fine-linen caps, and linen undergarments of finely twisted linen. आणि रेशमी तागाचा फेटा व रेशमी तागाची टोपी आणि रेशमी तागाची अंतर्वस्त्रे केली.
29 The sash: finely woven linen, blue, purple, and scarlet yarn, embroidered work, as our Father commanded Moses. कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.
30 They made the holy crown's plate from pure gold, engraved like a seal: "Holy to our Father." त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले: याहवेहसाठी पवित्र.
31 They tied a blue cord to it, fastening it on the turban above, as our Father commanded Moses. ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.
32 All the work of the tabernacle, the tent of meeting, was finished. Israelites did everything our Father commanded Moses—so they did. याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.
33 They brought Moses the tabernacle: the tent, all its furnishings, clasps, frames, crossbars, posts, and bases; मग त्यांनी निवासमंडप मोशेकडे आणला: तंबू व त्याचे सर्व सामान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;
34 the covering of red-dyed ram skins, the covering of fine leather, and the screening curtain, मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा;
35 the ark of the testimony with its poles and the mercy seat; कराराच्या नियमाचा कोश, त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण;
36 the table with all its utensils and the bread of the Presence; मेज व त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;
37 the pure gold lampstand, its arranged lamps, all its utensils, and oil for the light; शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्याच्या दिव्यांची रांग व त्याची सर्व उपकरणे आणि प्रकाशासाठी जैतुनाचे तेल;
38 the gold altar, anointing oil, fragrant incense, and the tent entrance screen; सोन्याची धूपवेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप व तंबूच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;
39 the bronze altar with its bronze grate, poles, and all its utensils, the basin and its stand; कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; गंगाळ व त्याची बैठक;
40 the courtyard's curtains, posts, and bases, the courtyard entrance screen, ropes, pegs, and all the equipment for the tabernacle's service, the tent of meeting; अंगणाचे पडदे, खुंट्या व त्यांच्या बैठका आणि अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदे; दोर्‍या व अंगणासाठी तंबूच्या मेखा; निवासमंडप व सभामंडपा साठी लागणारे सर्व साहित्य;
41 and the finely woven garments for serving in the holy place, the holy garments for Aaron the priest, and his sons' garments for priestly service. पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.
42 The people of Israel had done all the work just as our Father had commanded Moses. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.
43 Moses inspected all the work: they had done it as our Father commanded—so they had done it. Moses blessed them. मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]