Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Daniel 11 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 And I, in the first year of Darius the Mede, stood up to support and strengthen him. मेदिया राजा दारयावेशच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, त्याला साहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास मी उभा राहिलो.)
2 Now I'll tell you the truth: look, three more kings will rise in Persia, then a fourth far richer than all. Strengthened by his wealth, he will stir up everyone against Greece's kingdom. “आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्‍या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.
3 Then a mighty king will arise, who will rule with great dominion and do as he pleases. तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल.
4 Once he rises, his kingdom will break apart and split toward the four winds of heaven—not to his descendants, nor with the power he held, for his kingdom will be uprooted and given to others besides them. त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्‍यांना दिले जाईल.
5 The king of the south will grow strong; one of his commanders will grow stronger than him and rule—his dominion will be vast. “दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल.
6 After some years they will ally: the daughter of the king of the south will come to the king of the north to make an agreement. But she won't keep her strength, nor will he or his arm stand. She will be handed over—with her escort, her father, and her supporter—in those times. काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.
7 A shoot from her roots will rise in his place, attack the army, enter the north king's fortress, act against them, and prevail. “तिच्या कुळातील एकाचा उदय होईल जो तिची जागा घेईल. तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करेल आणि त्याच्या किल्ल्यात प्रवेश करेल; तो त्यांच्याशी युद्ध करेल आणि विजयी होईल.
8 He will take their gods captive to Egypt, with their metal images and precious silver and gold vessels; for years he will stay away from the king of the north. तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल.
9 The king of the north will invade the king of the south's realm, then return home. मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल.
10 His sons will arm for war, gather a vast army that keeps coming, overflows, sweeps through, then renews war to his stronghold. त्याचे पुत्र युद्धाची तयारी करतील आणि प्रचंड सैन्य गोळा करतील. जे एका अप्रतिकार्य पुरासारखे पुढे जातील आणि युद्ध त्याच्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातील.
11 The southern king, enraged, will march out to fight the northern king, who musters a vast army; but the army is given into the southern king's hand. “नंतर दक्षिणेचा राजा क्रोधिष्ट होऊन पुढे जाईल आणि उत्तरेच्या राजाशी युद्ध करेल, जो एक मोठे सैन्य उभारेल, परंतु त्याचा पराभव होईल.
12 When the crowd is carried off, his heart grows proud; he strikes down tens of thousands, yet fails. जेव्हा सैन्याचा नाश होईल, तेव्हा दक्षिणेचा राजा गर्वाने धुंद होऊन जाईल आणि अनेक हजारो लोकांचा वध करेल, तरीही तो विजयी होणार नाही.
13 The king of the north will again raise a horde bigger than before, then after years come with a great army and vast supplies. कारण उत्तरेचा राजा दुसरे सैन्य उभे करेल, जे त्याच्या आधीच्या सैन्यापेक्षा मोठे असेल; आणि बर्‍याच वर्षानंतर तो पूर्ण तयारीने मोठ्या सैन्यासह पुढे जाईल.
14 In those times many will rise against the king of the south; violent men of your people will lift themselves up to fulfill the vision, but fail. “त्या काळात अनेक दक्षिणेच्या राजाविरुद्ध उभे राहतील. तुझ्या स्वतःच्या लोकांपैकीच काही बंडखोर विचारांचे हिंसक लोकसुद्धा दृष्टान्त पूर्णतेसाठी विद्रोह करतील, परंतु ते अपयशी होतील.
15 The king of the north will come, raise a siege ramp, and take a fortified city; the south's forces will not stand, nor its elite troops—no strength remains to stand. नंतर उत्तरेचा राजा येईल आणि आणि वेढा बांधून तटबंदी असलेले शहर ताब्यात घेईल. दक्षिणेकडील सैन्यांना प्रतिकार करण्यास शक्ती राहणार नाही; त्यांच्या सर्वोत्तम सैन्यालाही सामना करण्याची ताकद नसेल.
16 His invader does as he pleases; none can stand before him. He will stand in the splendid land, destruction in his hand. आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल.
17 He will set out to enter with his kingdom's full strength, and make terms with him; he will give him a daughter of women to ruin it, but it will not stand or benefit him. तो आपल्या राज्याच्या सर्व सामर्थ्याने येण्याचा निर्धार करेल आणि तो दक्षिणेच्या राजाबरोबर करार करेल. त्याचे राज्य जिंकण्यासाठी तो आपली एक मुलगी विवाहात देईल, परंतु त्याची ही योजना यशस्वी होणार नाही वा त्याला काही मदत मिळणार नाही.
18 Then he'll turn to the coastlands and take many, but a commander will end his arrogance, turning it back on him. यानंतर तो आपले लक्ष किनारपट्टीवरील शहरांकडे वळवील व त्यातील अनेक जिंकून घेईल. परंतु एक सेनापती त्याला प्रतिकार करेल व त्याला लाजिरवाणी माघार घ्यावी लागेल.
19 Then he will turn his face toward the fortresses of his own land, stumble, fall, and be found no more. यानंतर तो आपल्या स्वतःच्या देशातील दुर्गाकडे मोर्चा फिरवेल, पण तो ठेच लागून पडेल व त्याचे अस्तित्व सापडणार नाही.
20 In his place will rise one who sends a tax collector for the glory of the kingdom; within a few days he'll be broken—not in anger, not in battle. “त्याच्या जागी एकजण येईल, जो त्या वैभवी देशात कर वसूल करणार्‍यास पाठवेल. काही वर्षात, त्याचा नाश केला जाईल, तरीही त्याचा नाश क्रोधाने किंवा युद्धात होणार नाही.
21 A despised man will rise in his place, denied royal honor. He'll come in a time of ease and seize the kingdom through flattery. “त्याच्या जागी असा नीच मनुष्य येईल ज्याला राजघराण्याचा मान मिळालेला नाही. जेव्हा जनतेला सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो राज्यावर आक्रमण करेल आणि कट रचून राज्य आपल्या ताब्यात घेईल.
22 Armies will be swept away before him and broken, and the prince of the covenant as well. मग त्याच्यापुढे मोठ्या सैन्याचा नाश होईल; तो आणि कराराचा राजपुत्र दोघेही नष्ट होतील.
23 Once allied with him, he will act dishonestly and grow strong with only a few people. त्याच्यासोबत करार केल्यानंतर तो कपटाने वागेल, आणि काही मोजक्या लोकांसह तो समर्थ होईल.
24 In a time of security, he will enter the province's richest regions and do what neither his fathers nor their fathers did—scattering plunder, spoil, and goods among them, devising schemes against fortresses, but only for a time. जेव्हा श्रीमंतांना राज्य सुरक्षित वाटत असेल, तेव्हाच तो त्यांच्यावर आक्रमण करेल आणि असे यश प्राप्त करेल की, त्याच्या पित्याने किंवा त्याच्या पित्याच्या पित्याने प्राप्त केले नसेल. तो धन, लूट आणि संपत्ती आपल्या अनुयायांमध्ये वाटून देईल. तो किल्ले पाडण्याचा कट रचेल—पण फक्त काही काळासाठी.
25 He will rouse his strength and courage against the king of the south with a great army. The king of the south will fight with a very great, mighty army—but won't stand, for plots will be devised against him. “प्रचंड सैन्य घेऊन तो दक्षिणेच्या राजाविरुद्ध आपले सामर्थ्य आणि धाडस उत्तेजित करेल. दक्षिणेचा राजाही प्रचंड आणि बलाढ्य सैन्यासह लढेल, परंतु त्याच्याविरुद्ध रचलेल्या कटामुळे तो तोंड देऊ शकणार नाही.
26 Those who eat his food will break him; his army is swept away, and many fall slain. जे राजाच्या मेजावर भोजन करीत असे ते त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतील; त्याच्या सैन्याचा नाश होईल आणि बरेच लोक युद्धात मारले जातील.
27 Both kings' hearts bent on evil will speak lies at one table, but it will fail—the end awaits its appointed time. दोन्ही राजे मनात वाईट गोष्टी घेऊन एकाच मेजावर बसतील आणि एकमेकांशी खोटे बोलतील, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, कारण अंत ठरलेल्या वेळी होईल.
28 He returns to his land with great wealth, heart against the holy covenant; he acts, then returns to his land. उत्तरेचा राजा पुष्कळ धनसंपत्ती घेऊन आपल्या देशात परत येईल, परंतु त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध राहील. त्याच्या मनाला वाटेल तसा तो वागेल आणि मग आपल्या देशात परत येईल.
29 At the appointed time he will return and head south, but this time won't match the earlier or the latter. “निर्धारित वेळी तो पुन्हा दक्षिणेवर आक्रमण करेल, परंतु पहिल्या दोन प्रसंगी झाले त्याहून अगदी वेगळे परिणाम आता होतील.
30 For ships of Kittim will come against him; he loses heart, turns back, rages against the holy covenant, and acts. He returns and favors those who abandon the holy covenant. पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्‍यांवर कृपा दाखवेल.
31 His forces will rise, defile the sanctuary fortress, end the daily sacrifice, and set up the abomination that causes desolation. “त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील.
32 He will corrupt those who violate the covenant with flattery, but people who know their Father will stand firm and act. जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील.
33 The wise among the people will teach many, but will fall for a time by sword, flame, captivity, and plunder. “जे ज्ञानी आहेत ते पुष्कळांना शिक्षण देतील, जरी काही काळासाठी, ते तलवारीने मारले जातील किंवा जाळले जातील किंवा पकडले जातील किंवा लुटले जातील.
34 When they fall, they will receive a little help, and many will join them with flattery. जेव्हा ते पडतील तेव्हा त्यांना खूप कमी मदत मिळेल आणि प्रामाणिक नसलेले बरेच लोक त्यांच्यात सामील होतील.
35 Some of the wise will stumble, to be refined, purified, and cleansed until the end time, for it still awaits the set time. सुज्ञानी लोकांपैकी काही अडखळतील, यासाठी की शेवटच्या वेळेपर्यंत ते स्वच्छ, शुद्ध आणि निर्दोष राहतील, कारण अंत नेमलेल्या वेळी होईल.
36 The king will do as he pleases, lifting and enlarging himself above every god, speaking shocking things against our Father. He will flourish until the wrath is spent, since what is decreed will happen. “राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल.
37 He will disregard his fathers' gods, women's desired one, and every god—he will set himself above them all. तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांचा आदर करणार नाही, किंवा स्त्रियांच्या इच्छांची पर्वा करणार नाही, किंवा कोणत्याही दैवताचा आदर करणार नाही, परंतु तो स्वतःला त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरवेल.
38 Instead he'll honor a god of fortresses, unknown to his fathers, with gold, silver, precious stones, and costly gifts. पण त्यांच्याऐवजी तो दुर्गदैवतांचा सन्मान करेल; जे दैवत त्याच्या पूर्वजांना माहीत नव्हते त्यांचा सन्मान तो सोने, चांदी, मौल्यवान रत्ने आणि किमती देणग्या यांनी करेल.
39 With a foreign god he attacks the strongest fortresses. He greatly honors those who acknowledge him, gives them rule over many, and divides land for a price. तो या परकीय दैवतांच्या साहाय्याने मजबूत किल्ल्यांवर आक्रमण करेल आणि जे त्याचा राजा म्हणून स्वीकार करतील त्यांचा आदर करेल. तो त्यांना अनेक लोकांवर अधिकारी म्हणून नियुक्त करेल आणि बक्षीस म्हणून त्यांना जमीन वाटून देईल.
40 At the end time, the king of the south will engage him, and the king of the north will storm against him with chariots, horsemen, and many ships. He will invade the lands, overflow, and pass through. “अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्‍या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल.
41 He enters the beautiful land; many fall, but Edom, Moab, and Ammon's chief sons escape his hand. तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील.
42 He will stretch out his hand against the lands, and the land of Egypt will not escape. तो अनेक देशांवर आपल्या शक्तीचा विस्तार करेल; इजिप्त देश देखील सुटणार नाही.
43 He will rule gold and silver treasures, and all Egypt's riches, with Libyans and Cushites at his heels. तो इजिप्त देशामधील सोन्याच्या व चांदीच्या खजिन्यांवर व सर्व मौल्यवान वस्तूंवर ताबा मिळवेल, लिबिया व कूशी हे देश त्याचे दास होतील.
44 But news from the east and north will terrify him, and he'll set out in great rage to destroy and annihilate many. परंतु पूर्वेकडून व उत्तरेकडून येणार्‍या बातम्यांनी तो अस्वस्थ होईल आणि मोठ्या क्रोधाने पुष्कळांचा नाश आणि अनेकांना नाहीसे करण्यास बाहेर पडेल.
45 He will pitch his palace tents between the seas and the beautiful holy mountain, then come to his end with no helper. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सुंदर पवित्र पर्वताजवळ तो आपला शाही तंबू उभारेल. तरीही त्याचा अंत होईल आणि त्याच्या साहाय्यासाठी कोणीही नसेल.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]