Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 Chronicles 16 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 They brought the ark of our Father and set it inside the tent that David had pitched for it, and they offered burnt offerings and peace offerings before our Father. त्यांनी देवाचा कोश आणला आणि दावीदाने त्यासाठी जो तंबू तयार केला होता त्या ठिकाणी तो ठेवला आणि परमेश्वरासमोर होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केली.
2 When David had finished offering the burnt offerings and peace offerings, he blessed the people in the name of our Father. होमार्पणे व शांत्यर्पणे सादर केल्यानंतर दावीदाने लोकांना याहवेहच्या नावाने आशीर्वाद दिला.
3 And he distributed to every Israelite, both men and women, a loaf of bread, a date cake, and a raisin cake. नंतर त्याने इस्राएल लोकांच्या प्रत्येक स्त्री व पुरुषास एक भाकर, खजुराची एक ढेप व मनुक्यांची एक वडी वाटप केली.
4 He appointed some of the Levites to minister before the ark of our Father, to invoke, to give thanks, and to praise our Father. इस्राएलच्या याहवेह परमेश्वराचे गौरव, स्तुतिगान व त्यांचे उपकारस्मरण करण्याकरिता दावीदाने कोशापुढे सेवा करणार्‍या काही लेवी लोकांची नेमणूक केली:
5 Asaph was the chief, and second to him were Zechariah, then Jeiel, Shemiramoth, Jehiel, Mattithiah, Eliab, Benaiah, Obed-edom, and Jeiel, with harps and lyres; and Asaph sounded the cymbals. वादकांचा प्रमुख आसाफ, पुढच्या श्रेणीत जखर्‍याह, येइएल, शमिरामोथ, यहीएल, मत्तिथ्याह, एलियाब, बेनाइयाह, ओबेद-एदोम व ईयेल हे सतार व वीणा वाजवित, व आसाफ उंच स्वरात झांज वाजवित असे.
6 Benaiah and Jahaziel the priests were to blow the trumpets regularly before the ark of the covenant of our Father. बेनाइयाह व यहजिएल हे याजक परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे नियमितपणे कर्णे वाजवित.
7 On that day David first appointed Asaph and his brothers to give thanks to our Father: त्या दिवसापासून दावीदाने याहवेहची अशा प्रकारे उपकारस्तुती करण्यासाठी आसाफ व त्याचे सहायक नेमले:
8 Give thanks to our Father; call upon his name; proclaim his deeds among the peoples! याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.
9 Sing to him; sing praises to him; tell of all his wondrous works! त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा.
10 Exult in his holy name; let the hearts of those who seek our Father rejoice! त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो.
11 Seek our Father and his strength; seek his presence continually! याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.
12 Remember the wondrous works that he has done, his miracles and the judgments he pronounced. परमेश्वराने केलेली अद्भुत कार्ये, त्यांचे चमत्कार, आणि त्यांनी केलेले न्याय यांचे स्मरण करा.
13 You children of Israel his servant, you sons of Jacob, his chosen ones! अहो त्यांचे सेवक, इस्राएलच्या वंशजांनो, त्यांच्या निवडलेल्या लोकांनो, याकोबाच्या संतानांनो, तुम्ही या सर्वांचे स्मरण करा.
14 He is our Father; his judgments are in all the earth. कारण याहवेह आमचे परमेश्वर आहेत. त्यांचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.
15 Remember his covenant forever, the word he commanded for 1,000 generations, ते आपला करार सर्वदा स्मरणात ठेवतात, ती अभिवचने त्यांनी हजारो पिढ्यांना दिली होती,
16 the covenant he made with Abraham, his sworn oath to Isaac, हा करार त्यांनी अब्राहामाशी केला, आणि इसहाकाशी शपथ वाहिली,
17 which he confirmed to Jacob as a statute, to Israel as an everlasting covenant, आणि त्यांनी याकोबासाठी नियम व इस्राएलसाठी सदासर्वकाळचा करार या रूपाने कायम केला:
18 saying, "To you I will give the land of Canaan as your allotted inheritance." “मी तुम्हाला कनान देश तुमचे वतन म्हणून देईन.”
19 When you were few in number, of little importance, and strangers in the land, त्यावेळी इस्राएली लोक अगदी मोजके होते निश्चितच थोडे, वचनदत्त देशात ते परके होते.
20 wandering from nation to nation, from one kingdom to another people, ते एका देशातून दुसर्‍या देशात, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात भटकत असताना,
21 he allowed no one to oppress them; he rebuked kings on their account, याहवेहने कोणालाही त्यांच्यावर जुलूम करू दिला नाही; त्यांच्याकरिता त्यांनी राजांना दटाविले:
22 "Do not touch my anointed ones, and do my prophets no harm!" “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका; माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”
23 Sing to our Father, all the earth! Proclaim his salvation day after day. हे सर्व पृथ्वी, याहवेहस्तव स्तुतिस्तोत्रे गा, दररोज त्यांच्या तारणाची घोषणा करा.
24 Publish his glorious deeds among the nations; tell every people the amazing things he has done! सर्व राष्ट्रांमध्ये त्यांचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्यांची अद्भुत कृत्ये जाहीर करा.
25 For great is our Father, and most worthy of praise; he is to be feared above all gods. कारण याहवेह थोर आणि स्तुतीस पात्र आहेत; सर्व दैवतांपेक्षा त्यांचे भय बाळगणे यथायोग्य आहे.
26 For all the gods of the peoples are idols, but our Father made the heavens. इतर देशांची दैवते केवळ मूर्ती आहेत. परंतु याहवेहनी आकाशमंडलांची रचना केली आहे.
27 Splendor and majesty are before him; strength and joy are in his dwelling. राजवैभव आणि ऐश्वर्य त्यांच्या पुढे चालतात. त्यांच्या उपस्थितीत सामर्थ्य आणि हर्ष असतो.
28 Ascribe to our Father, all families of the peoples, ascribe to our Father glory and strength! अहो राष्ट्रातील सर्व कुळांनो याहवेहला गौरव द्या, याहवेहला गौरव आणि सामर्थ्य द्या.
29 Ascribe to our Father the glory due his name; bring an offering and come before him! Worship our Father in the splendor of holiness. याहवेहच्या नावाला योग्य तो गौरव द्या; अर्पणे आणून त्यांच्या समक्षतेत या. त्यांच्या पवित्रतेच्या ऐश्वर्याने याहवेहची उपासना करा;
30 Tremble before him, all the earth! Indeed, the world is firmly established; it will never be moved. त्यांच्या उपस्थितीत हे पृथ्वी कंपित हो! सर्व सृष्टी दृढपणे स्थिर झालेली आहे; ती डळमळत नाही.
31 Let the heavens be glad, and let the earth rejoice, and let them say among the nations, "Our Father reigns!" आकाशे हर्ष करोत, पृथ्वी उल्लास करो; त्यांनी राष्ट्रांना हे सांगावे, “याहवेह राज्य करतात!”
32 Let the sea roar, and all that fills it; let the fields exult, and everything in them! सागर व त्यातील सर्वकाही गर्जना करोत; शेते व त्यातील सर्वकाही हर्षित होवो!
33 Then the trees of the forest will sing for joy before our Father, for he comes to judge the earth. वनातील सर्व झाडे गुणगान करो, आनंदाने याहवेहची स्तुती करा, कारण ते पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहेत.
34 Give thanks to our Father, for he is good; for his covenant love endures forever! याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
35 Say also: "Save us, our Father; gather us and rescue us from among the nations, that we may give thanks to your holy name and exult in your praise." यांचा धावा करून म्हणा, हे आमच्या परमेश्वरा, आमचे तारण करा; परमेश्वरा, आम्हाला या देशातून सोडवून एकत्र करा, जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून, तुमच्या स्तवनात गौरव मानावे.
36 Blessed be our Father, from everlasting to everlasting! Then all the people said, "Amen!" and praised our Father. इस्राएलचे परमेश्वर याहवेहची, अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो. मग सर्व लोकांनी म्हटले “आमेन! याहवेहची स्तुती होवो.”
37 So David left Asaph and his brothers there before the ark of the covenant of our Father, to minister regularly before the ark as each day required, दररोज गरजेप्रमाणे आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांची याहवेहच्या कोशाची नियमितपणे करारबद्ध सेवा करण्यासाठी दावीदाने नेमणूक केली.
38 and Obed-edom with his sixty-eight brothers; Obed-edom son of Jeduthun and Hosah were to be gatekeepers. तसेच ओबेद-एदोम आणि त्याचे अडुसष्ट नातलग आणि यदूथूनाचा पुत्र ओबेद-एदोम आणि होसाह यांचा द्वारपाल म्हणून समावेश केला.
39 And Zadok the priest and his fellow priests served before the tabernacle of our Father at the high place that was at Gibeon, दावीदाने गिबोन टेकडीवरील याहवेहच्या सभामंडपात सादोक याजक आणि त्याचे याजक भाऊबंद सेवा करण्यासाठी ठेवले.
40 to offer burnt offerings to our Father on the altar of burnt offering regularly, morning and evening, according to all that is written in the law of our Father, which he commanded Israel. ते दररोज, सकाळ व संध्याकाळ, याहवेहने इस्राएली लोकांना दिलेल्या आज्ञेनुसार होमवेदीवर नियमितपणे होमार्पणे करीत होते.
41 With them were Heman and Jeduthun and the rest of those chosen and designated by name to give thanks to our Father, for his covenant love endures forever. त्यांच्यासोबत हेमान, यदूथून आणि नावे घेऊन निवडलेल्या इतर अनेकांची नेमणूक केली. या सर्वांना “याहवेहची प्रीती सनातन आहे” अशी त्यांची उपकारस्तुती करण्यासाठी नेमण्यात आले होते.
42 Heman and Jeduthun had with them trumpets and cymbals to sound, and instruments for the sacred songs of our Father. The sons of Jeduthun were stationed at the gate. त्यांच्याबरोबर हेमान आणि यदूथून यांना कर्णे, झांजा व इतर वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करण्याची जबाबदारी दिली. यदूथूनच्या पुत्रांची द्वारपाल म्हणून नेमणूक करण्यात आली.
43 Then all the people departed, each to his home, and David turned to bless his own household. नंतर सर्व लोक आपापल्या नगरास परत गेले आणि दावीदही आपल्या कुटुंबीयांना आशीर्वाद देण्यासाठी घरी परतला.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]